येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंना पाणी पाजणार, भाजप नेत्याने दिले आव्हान…
मुंबई महानगरपालिकेची सत्ता गेल्या 25 वर्षात उद्धव ठाकरे यांच्याकडेच होती, या इतक्या वर्षात फक्त तिथे भ्रष्टाचार करण्यात आला.
मुंबईः गेल्या 25 वर्षात उद्धव ठाकरे यांना महानगरपालिकामध्ये सत्ता देण्यात आली, मात्र मुंबई महानगरपालिकेची परिस्थिती आहे तशीच आहे. तिथे फक्त भष्ट्राचार करण्यात आला असल्याची टीका भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी केली आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, भष्ट्राचाराचा पाडा वाचण्यासाठी या जागर सभा आयोजित केली असल्याचेही त्यांनी सांगितले. घाटकोपरमध्ये डोंगरावर पाणी आणि शौचालयदेखील नसल्याचे सांगत त्यांनी येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांना पाणी पाजणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला आहे.
विधानसभा लोकसभा निवडणुकीत आमच्या नेत्यांचे फोटो वापरून निवडून आले आहेत असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे गटाला लगवाला आहे
तर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी सांगितले की, बांद्रा पूर्व येथील सुरू करण्यात आलेल्या जागर मुंबईचा आता जागर जनतेचा झाला आहे.
मुंबईच्या गल्लीगल्लीमध्ये आमचा आवाज गेला असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. मत मागण्यांसाठी जागर मुंबईचा कार्यक्रम नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दिवाळीच्या अगोदर 22 ऑक्टोबर रोजी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला मराठी मुस्लिम कुटुंबीयांचा पाठींबा अशी बातमी दिली होती, तर भाजप मात्र कोणत्याही जाती धर्मावर मतदान मागत नाही फक्त आम्ही आमच्या कामावर मतदान मागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईमध्ये किती काम केले यावर मतदान मागा मात्र रडीचा डाव सुरू केला असल्याची टीका उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. उध्दव ठाकरे यांच्याकडूनच मराठी-मुस्लिम असं राजकारण केले जात आहे, तर त्यामुळे हिंदूमध्ये वाद लावत असल्याची टीका आशिष शेलार यांनी केली आहे.
टिपू सुलतान हिंदूंवर आक्रमण करणारा होता. टिपू सुलतान या देशावर आक्रमण करणारा म्हणूनच आला होता. त्या टिपू सुलतानच्या नावाने उद्यान झालं पाहिजे अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये केली जात होती असंही त्यांनी यावेळी सांगितले.
राहुल गांधींच्या यात्रेत आदित्य ठाकरे यांचा हातात हात घालून प्रचार केला जात आहे. राममंदिरवेळी याच राहुल गांधी यांनी कोर्टात राम कधी जन्मलाच नाही.
रामाची कुठली गादीच नव्हती. रामाचा कुठला इतिहास नव्हता, भगवान राम ही कल्प कल्पित कल्पना आहे या काँग्रेसच्या राहुल गांधी यांनी वक्तव्य केले होते याचीही त्यांनी आठवण करुन दिली. मालवणीमधील टिपू सुलतान मैदान नाव दिले आहे. हा वाद पुन्हा सुरू होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.