रात्री जे करायचं ते दिवसा करत असल्याने संजय राऊतांना भान राहत नाही, नारायण राणेंचा हल्लाबोल

रात्री जे करायचं ते दिवसा करत असल्याने संजय राऊतांना भान राहत नाही, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला. संजय राऊत काहीतरी हवेतली विधाने करतं. हास्यास्पद दावे करतात, काहीही अग्रलेख लिहितात. मला वाटतं रात्री जे करायचं ते दिवसा करत असल्याने राऊतांना भान राहत नाही, असं नारायण राणे म्हणाले.

रात्री जे करायचं ते दिवसा करत असल्याने संजय राऊतांना भान राहत नाही, नारायण राणेंचा हल्लाबोल
संजय राऊत आणि नारायण राणे
Follow us
| Updated on: Nov 05, 2021 | 12:42 PM

मुंबई : रात्री जे करायचं ते दिवसा करत असल्याने संजय राऊतांना भान राहत नाही, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला. संजय राऊत काहीतरी हवेतली विधाने करतं. हास्यास्पद दावे करतात, काहीही अग्रलेख लिहितात. मला वाटतं रात्री जे करायचं ते दिवसा करत असल्याने राऊतांना भान राहत नाही, असं नारायण राणे म्हणाले.

नारायण राणे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन पवार ठाकरेंवर जोरदार आसूड ओढले. सुमारे अर्धा तास चाललेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी तुफान बॅटिंग करत दादरा नगर हवेली, इंधन दरकपात, बारामतीमधला पवार-ठाकरेंचा कार्यक्रम, ईडी सीबीआयच्या धाडी आदी विषयांवर त्यांनी फटकेबाजी केली. तर राऊतांवर टीका करताना मात्र त्यांनी हात आखडता घेतला नाही.

रात्री जे करायचं ते दिवसा करत असल्याने राऊतांना भान राहत नाही

“संजय राऊतांचे दोन दिवसांपासून वाचत होतो. देशात पोटनिवडणुका झाला. एक जागा अपक्ष उमेदवार जिंकला. शिवसेनेने मात्र डंका सुरू केला आम्ही जिंकलो. महाराष्टाच्या बाहेर आम्ही जिंकलो. सर्वस्त्र डंका पिटत आहेत, पण मला त्यांना सांगायचंय उमेदवाराची निशाणी फलंदाज होती. धनुष्यबाण नव्हती. संजय राऊत काहीही बोलतात. त्यांना हास्यास्पद दावे करण्याची सवय आहे”, असं नारायण राणे म्हणाले.

दुसऱ्यांच्या मुलांचे बारसे करण्याची शिवसेनेला सवय

“दुसऱ्यांच्या मुलांचे बारसे करण्याची सवय शिवसेनेला आहेच. डेलकर निवडून आल्यावर आम्हाला मोठं यश आलं. आम्ही दिल्ली काबीज करणार, अशा गोष्टी संजय राऊतांनी लिहिल्या. लिखाण करताना त्यांना भान राहत नाही. रात्री जे करायचं ते दिवसा करत असल्याने राऊतांना भान राहत नाही वाटतं”, असं राणे म्हणाले.

दिल्लीला धडक मारायला आलं तर डोकं जागेवर राहणार नाही

आम्ही ३०३ पेक्षा अधिक आहे. तुम्ही एकने धडक मारणार. दिल्लीला धडक मारायला आल्यावर डोकं जागेवर राहणार नाही, असा टोला त्यांनी राऊत आणि मुख्यमंत्र्यांना लगावला. तसंच दिल्लीला धडक मारण्याचा प्रयत्न केला तर संजय राऊत डोक्याविना दिसतील. त्यांचा भाजपवर टीकेचा भडीमार सुरू आहे. आता ५६ आमदार आहात. ते मोदींमुळेच निवडून आले आहेत. नाही तर 8 च्यावर खासदार जाणार नाही आणि 25 च्या वर आमदार जाणार नाही, ही सगळी मोदींची कृपा आहे.

हे ही वाचा :

तुमचा ‘तो’ खासदार काही काळाने भाजपमध्ये येईल, तेव्हा बोंबलू नका; नारायण राणेंचा राऊतांना इशारा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.