Piyush Goyal | ‘अशा प्रकारच्या मानसिकतेवर…’, पॅलेस्टाईनच्या समर्थनावरुन पीयूष गोयल यांचा शरद पवार यांच्यावर निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीन दिवसांपूर्वी इस्त्राईल आणि हमासच्या युद्धावर प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी यावेळी पॅलेस्टाईनचं समर्थन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांच्या या टीकेला आता केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय.

Piyush Goyal | 'अशा प्रकारच्या मानसिकतेवर...', पॅलेस्टाईनच्या समर्थनावरुन पीयूष गोयल यांचा शरद पवार यांच्यावर निशाणा
Follow us
| Updated on: Oct 18, 2023 | 11:30 PM

मुंबई | 18 ऑक्टोबर 2023 : पॅलेस्टानमधील हमास दहशतवादी संघटनेने इस्त्राईलवर 7 ऑक्टोबरला हल्ला केला. हमासच्या दहशतवाद्यांनी तब्बल 5 हजार रॉकेट इस्त्राईलवर सोडले. तसेच हमासने अनेक सैनिकांना बंदिस्त देखील केलं. हमासने या युद्धाला सुरुवात केल्यानंतर आता इस्त्राईलकडूनही प्रत्युत्तर दिलं जात आहे. या लढाईत आतापर्यंत 4000 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झालाय. खूप भीषण परिस्थिती आहे. या युद्धावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भूमिका मांडली होती. त्यांनी पॅलेस्टाईनचं समर्थन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांच्या या भूमिकेवर आता पीयूष गोयल यांनी टीका केलीय.

“जगामध्ये शांतता हवी आहे. पण सध्या इस्त्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्यात युद्ध सुरु आहे. ती पूर्ण जमीन पॅलेस्टाईनची आहे. त्यांच्या जमिनीवर इस्त्राईलने ताबा मिळवला आहे. तिथली जमीन, जागा आणि घरं सर्व पॅलेस्टाईनची आहेत. पण इस्त्राईलने नंतर तिथे ताबा घेतलाय. अतिक्रमणानंतर इस्त्राईल देश बनलाय”, असं शरद पवार म्हणाले.

शरद पवार आणखी काय म्हणाले होते?

“इंदिरा गांधी, राजीव गांधी, जवाहरलाल नेहरु, अटल बिहारी वाजपेयी या सर्व माजी पंतप्रधानांनी पॅलेस्टाईनच्यासोबत उभं राहण्याची भूमिका घेतली. भारत सरकारची नेहमी तीच भूमिका राहिली. भारत नेहमी जे मूळ रुपात उभे राहिले त्यांच्यासोबत उभा राहिलाय. पण आता दुर्दैव आहे की, पहिल्यांदाच भारताचे पंतप्रधान मुद्द्याला सोडून इस्त्राईलच्या सोबत उभे आहेत. त्यांनी मुख्य मुद्द्याकडे दुर्लक्ष केलंय. आपल्याला आपल्या भूमिकेवर स्पष्ट असलं पाहिजे. राष्ट्रवादीची देखील भूमिका स्पष्ट असली पाहिजे आम्ही जे नागरीक तिथले मूळ रहिवासी आहेत, आम्ही त्यांच्यासोबत आहोत”, अशी भूमिका शरद पवारांनी घेतली.

पीयूष गोयल नेमकं काय म्हणाले?

शरद पवार यांच्या या भूमिकेवर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी टीका केली. “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी पॅलेस्टाईनचं समर्थन केलंय. ही खूप चिंताजनक गोष्ट आहे. जगभरात कुठेही दहशतवादी घटनांची निंदा केली जायला हवी. पण ही दुर्देवाची गोष्ट आहे की, जी व्यक्ती देशाचा संरक्षण मंत्री आणि अनेकवेळा मुख्यमंत्री राहिलाय, ती व्यक्ती दहशतवादाच्या मुद्द्यावर इतका अनौपचारिक दृष्टीकोन ठेवतो?, असा सवाल पीयूष गोयल यांनी केलाय.

“शरद पवार त्या सरकारचे भाग राहिले आहेत, ज्या सरकारच्या काळात बाटला हाऊस सारखे कांड झाले आहेत. अशा प्रकारच्या मानसिकतेवर रोख लागली पाहिजे. मला आशा आहे की, शरद पवार आता कमीत कमीत कमी राष्ट्र प्रथमचा विचार बाळगतील”, असा टोला पीयूष गोयल यांनी लगावला.

देवेंद्र फडणवीस यांचीदेखील शरद पवारांवर टीका

शरद पवार यांच्या वक्तव्यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील शरद पवारांवर टीका केलीय. “इस्त्रायल-पॅलेस्टाईन वादात भारताने आपली भूमिका कधीच बदलली नाही. मात्र, त्याचवेळी भारताने दहशतवाद, मग तो कुठल्याही स्वरुपात आणि कुणाच्याही विरोधात असो, त्याला कायमच कडाडून विरोध केला आहे. इस्त्रायलमध्ये जेव्हा निष्पाप लोक मारले जातात, तेव्हा संपूर्ण जगाने त्याची कडाडून निंदा केली. तसाच निषेध भारतानेही केला”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“शरद पवार यांनीही तेच करायला हवे. कारण, दहशतवादी हल्ल्याच्या यातना मुंबईने अधिक सोसल्या आहेत. विशेषत: 26/11 च्या वेळी मुंबईने अनेक नागरिक गमावले. माझी शरद पवार यांना विनंती आहे की, केवळ मतांच्या राजकारणाचा विचार करु नका, तर दहशतवादाचा तीव्र शब्दात धिक्कार करा”, असं फडणवीस म्हणाले आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.