‘संजय राऊतांनी गैरफायदा घेऊ नये’, ‘वंचित’चा मोठा इशारा, काय घडतंय?

"आम्हाला जोपर्यंत तीनही पक्षांच्या नेत्यांच्या सह्या असलेले अधिकृत निमंत्रण प्राप्त होत नाही तोपर्यंत आम्ही कुठेही जाणार नाही. आमची शिवसेनेसोबत युती आहे पण त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न संजय राऊत यांनी करु नये", असा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.

'संजय राऊतांनी गैरफायदा घेऊ नये', 'वंचित'चा मोठा इशारा, काय घडतंय?
Follow us
| Updated on: Jan 24, 2024 | 8:25 PM

मुंबई | 24 जानेवारी 2024 : महाविकास आघाडीच्या नेत्यांची उद्या महत्त्वाची बैठक पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीचं निमंत्रण वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनाही देण्यात आल्याचं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले. पण त्यांच्या याच वक्तव्यावर वंचित बहुजन आघाडीने आक्षेप घेतला आहे. वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ता तथा प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी याबाबत भूमिका मांडली आहे. “वंचित बहुजन आघाडीला अद्याप काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षाच्या नेत्यांची स्वाक्षरी असलेले कुठलेही पत्र अथवा निमंत्रण प्राप्त झालेले नाही. त्यामुळे उद्याच्या बैठकीला “बिन बुलाए मेहमान” बनून आम्ही जाणार नाही. संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत जो दावा केला आहे तो खोटा आहे. आम्हाला जोपर्यंत तीनही पक्षांच्या नेत्यांच्या सह्या असलेले अधिकृत निमंत्रण प्राप्त होत नाही तोपर्यंत आम्ही कुठेही जाणार नाही. आमची शिवसेनेसोबत युती आहे पण त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न संजय राऊत यांनी करु नये”, असा इशारा सिद्धार्थ मोकळे यांनी दिला आहे.

“वंचित बहुजन आघाडीचा समावेश महाविकास आघाडी आणि INDIA मध्ये करावा अशी भूमिका आम्ही सातत्याने मांडत आलो आहोत. त्यासंदर्भात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षाच्या नेत्यांना आमचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्र लिहिलं आहे. मात्र अद्याप काँग्रेसकडून त्यावर कुठलेच उत्तर किंवा प्रतिसाद मिळालेला नाही. काँग्रेस वंचित बहुजन आघाडी सोबत थेट बोलणी करणे का टाळत आहे? याचा खुलासा त्यांनी केला पाहिजे. महाविकास आघाडी आणि INDIA च्या संदर्भात बोलणी करण्याचे Power of attorney सर्वाधिकार काँग्रेसने शिवसेना आणि राष्ट्रवादीला दिले आहेत का? हेही त्यांनी जाहीर करावे”, अशी मागणी सिद्धार्थ मोकळे यांनी केली आहे.

‘एकत्र येण्यात काँग्रेसला काय अडचण?’

“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांना सत्तेतून खाली खेचायचे असेल तर सर्वांनी एकत्र आले पाहिजे ही आमची भूमिका आहे. मात्र प्रत्येक वेळी काँग्रेस नेते नवनवीन कारणे सांगून वेळ मारून नेत आहेत. एकत्र येण्यात काँग्रेसला काय अडचण आहे हे त्यांनी जनतेला सांगितलं पाहिजे. आम्ही शेवटपर्यंत महाविकास आघाडी आणि INDIA मध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करीत राहणार आहोत”, अशी भूमिका सिद्धार्थ मोकळे यांनी मांडली आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.