महाराष्ट्राला लवकर मिळणार सात वंदे भारत एक्प्रेस, कोणते आहेत मार्ग
vande bharat express | देशात सर्वाधिक लोक रेल्वेने प्रवास करतात. यामुळे केंद्र सरकारने रेल्वेत बदल करण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही वर्षांत रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण केले जात आहे. त्याचवेळी सेमीहायस्पीड रेल्वेही आणली गेली आहे. देशातील पहिली सेमी हायस्पीड वंदे भारत चांगलीच लोकप्रिय झाली आहे.
नवी दिल्ली, दि.15 जानेवारी 2024 | देशात सर्वात वेगाने बदल रेल्वे मंत्रालयात सुरु आहे. भारतीय रेल्वेचे आधुनिकीकरण सुरु आहे. रेल्वेने कात टाकत सेमीहायस्पीड असलेली वंदे भारत एक्स्प्रेस आणली आहे. देशात पहिली वंदे भारत एक्स्प्रेस १५ नोव्हेंबर २०१९ रोजी सुरु झाली. नवी दिल्ली ते वाराणसी दरम्यान सुरु झालेल्या या रेल्वेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला होता. त्यानंतर महाराष्ट्रात सप्टेंबर २०२२ मध्ये पहिली वंदे भारत ट्रेन सुरु झाली. ही ट्रेन मुंबई ते गांधीनगर आहे. देशभरात वंदे भारत ट्रेनला चांगला प्रतिसाद मिळत आहे. वंदे भारत रेल्वेची मागणी वाढत आहे. वेगवान प्रवास आणि आरामदायी सुविधांमुळे रेल्वे प्रवाशांचा पसंतीला उतरली आहे.
महाराष्ट्रात या सात मार्गावर रेल्वे
महाराष्ट्रात सात मार्गांवर वंदे भारत रेल्वे सुरु आहे. राज्यात सर्वात पहिली वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई ते गांधीनगर ३० सप्टेंबर २०२२ मध्ये सुरु झाली. त्यानंतर नागपूर बिलासपूर वंदे भारत ट्रेन डिसेंबर २०२२ मध्ये सुरु झाली. मुंबई सोलापूर वंदे भारत पुणे शहरातून जाऊ लागली. मुंबई शिर्डी रेल्वेही फेब्रुवारी २०२३ मध्ये सुरु करण्यात आली.
मुंबई मडगाव आणि नागपूर-इंदूर जून महिन्यात सुरु झाली. त्यानंतर डिसेंबर महिन्यात मुंबई जालना ही रेल्वे सुरु झाली. देशात एकूण ४१ मार्गावर रेल्वे सुरु आहे.
या नवीन मार्गावर धावणार रेल्वे
वंदे भारत एक्प्रेसचा विस्तार केला जात नाही. नवीन नवीन मार्गावर ही रेल्वे धावणार आहे. महाराष्ट्रात आणखी सात मार्गावर वंदे भारत एक्प्रेस धावणार आहे. त्यात मुंबई अहमदाबाद, मुंबई शेगाव, पुणे शेगाव, पुणे बेळगाव, पुणे बडोदा, पुणे सिंकदराबाद, मुंबई कोल्हापूर या मार्गांचा समावेश आहे. येत्या वर्षभरात या सर्व मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. सध्या वंदे भारत एक्प्रेसने रोज ३४ हजार प्रवाशी प्रवास करत आहेत. या रेल्वेचा सरासरी वेग १२० किलोमीटर प्रतितास आहे.
हे ही वाचा
वेग अन् सुविधा वंदे भारतसारख्या, भाडेमात्र एक्सप्रेसपेक्षाही कमी अन् सुटसुद्धा मिळणार