AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरेंची शिवसेना आणि मनसेत आता व्हिडीओ वॉर, ठाकरे गटाला मनसेचं सडेतोड उत्तर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे. ठाकरे गटाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. पण त्याला उत्तर देण्यासाठी मनसेने अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत.

ठाकरेंची शिवसेना आणि मनसेत आता व्हिडीओ वॉर, ठाकरे गटाला मनसेचं सडेतोड उत्तर
MNS VS thackeray Group
| Updated on: Apr 11, 2024 | 9:22 PM
Share

ठाकरेंची शिवसेना आणि मनसेत आता व्हिडीओ वॉर सुरु झाला आहे. गुढीपाडव्याच्या मेळाव्यातून राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यावरुन केमिकल लोचा, अशा टीकेचा उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ ठाकरे गटानं ट्विट केला होता. त्याच व्हिडीओला मनसेनंही व्हिडीओनं प्रत्युत्तर दिलं आहे. राज ठाकरे यांनी मोदींना साथ देताना महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर ठाकरेंची शिवसेना आणि मनसेत व्हिडीओ वॉर सुरु झालाय.

ठाकरे गटाला संदीप देशपांडे यांचं उत्तर

राज ठाकरेंचा केमिकल लोच्या झालाय, अशी टीका करणारा उद्धव ठाकरेंचा व्हिडीओ ठाकरे गटानं ट्विट केल्यानंतर मनसेच्या संदीप देशपांडेंनीही चला आरश्यात बघून म्हणत उद्धव ठाकरेंच्या बदलेल्या भूमिकांचे व्हिडीओ ट्विट केले आहेत. अर्थात सुरुवात, ठाकरे गटानंच केली होती. 2 वर्षांआधीच्या दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंना मुन्नाभाई म्हणत, केमिकल लोचा झाल्याची टीका राज ठाकरेंवर केली होती. तोच व्हिडीओ ठाकरेंच्या शिवसेनेनं ट्विट केला आणि राज ठाकरेंना बिनशर्त पाठिंब्याच्या मुद्द्यावरुन डिवचलं.

या व्हिडीओला मनसेकडून संदीप देशपांडे यांनी ही 5-5 व्हिडीओनं उत्तर दिलंय. एक पोस्टर ट्विट करुन ठाकरेंच्या भूमिकांवरुनही निशाणा साधला.

2009 भाजपचे चांगले…काँग्रेस-राष्ट्रवादी वाईट 2014 भाजप वाईट म्हणून युती तोडून वेगळे लढले आणि निवडणुकीनंतर परत भाजप चांगले 2019 विधानसभा लढताना भाजप चांगले, काँग्रेस -राष्ट्रवादी वाईट आणि निकालानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी चांगले, भाजप वाईट 2022 उद्धव ठाकरेंना पाठींबा देणारे शिवसैनिक चांगले, शिंदेंना पाठींबा देणार शिवसैनिक वाईट

उद्धव ठाकरे यांचे व्हिडिओ ट्विट

तिसरा व्हिडीओ पुन्हा शरद पवारांवरचाच आहे. त्यावेळी सर्जिकल स्ट्राईकवरुन सवाल करणाऱ्या विरोधकांना उत्तर देताना ठाकरे पवारांवर बसरले होते. चौथा व्हिडीओ आहे, उद्धव ठाकरेंचा सोनिया गांधींवरचा…या व्हिडीओत सोनियांना ठाकरे इटालियन बाई म्हणत आहेत.

पाचवा व्हिडीओ आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींवरचा…2019 मध्ये मुंबईतल्या सभेत सर्व 6 खासदार मोदींसाठी दिल्लीत पाठवणार, असं वचन मुंबईकरांकडून उद्धव ठाकरेंनी घेतलं होतं.

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या साडे 4 वर्षात, भूमिकांमध्ये थ्री सिक्स्टी ड्रिगीत बदल झालाय. त्यामुळं राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर करताच तुटून पडणाऱ्या ठाकरे गटालाही त्यांच्याच पक्षप्रमुखांचे जुने व्हिडीओ दाखवून मनसेनं सडेतोड उत्तर दिलं आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.