वॉशिंग मशीनमध्ये अचानक स्फोट, काय असणार कारण

वसई पश्चिममधील साई नगर येथील गौतमी बिल्डिंगमधील कुबेरा इमारत आहे. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहत्या घरात काल मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास स्फोट झाल्याचा आवाज शेजाऱ्यांना ऐकू आला.

वॉशिंग मशीनमध्ये अचानक स्फोट, काय असणार कारण
वॉशिंगमशीन स्फोट (प्रतिकात्मक)
Follow us
| Updated on: Feb 19, 2023 | 8:57 AM

मुंबई : वसईत एक वेगळीच घटना समोर आली आहे. वसई पश्चिममध्ये (vasai virar municipal corporation area) एका इमारतीत वॉशिंग मशीनमध्ये स्फोट (washing machine blast )झाला. या स्फोटात सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. स्फोट शॉर्टसर्किटमुळे झाला असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. परंतु चौकशीनंतर ते स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे इमारतीतील सर्व लोकांमध्ये घबराहट निर्माण झाली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळावर दाखल होऊन आग विझवली असल्याने मोठा अनर्थ टळला.

नेमके काय झाले

हे सुद्धा वाचा

वसई पश्चिममधील साई नगर येथील गौतमी बिल्डिंगमधील कुबेरा इमारत आहे. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहत्या घरात काल मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास स्फोट झाल्याचा आवाज शेजाऱ्यांना ऐकू आला. यावेळी काही लोकांनी स्फोटाच्या आवाजाच्या दिशेने धाव घेतली. त्यावेळी दुसऱ्या मजल्यावरील राहत्या घरात स्फोट झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर लागलीच अग्निशमन दलास फोन करण्यात आला.

वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळावर दाखल होऊन आग विझवली असल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत वॉशिंग मशीन जळून पुर्ण खाक झाले. सुदैवाने कोणतीही हानी या दुर्घटनेत झाली आहे. स्फोट कशामुळे झाला हे स्पष्ट झाले नाही. परंतु शॉर्ट सर्किटमुळे झाला असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

वॉशिंग मशीनला लागलेल्या आगीमुळे घरातील बाथरूम पूर्णपणे जळून खाक झाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट होवू शकलं नाही.

उपकरणे चेक करुन घ्या

आपणा सर्वांना सावध करणारी बातमी आहे.  आपल्या घरातील इलेक्ट्रीक वस्तू वापरताना काळजी घ्या. जुने उपकरणे  झाली असतील तर तपासून घ्या. घरातील वायरी जुन्या झाल्या असतील तर ती चेक करुन घ्या. अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यत आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.