Video: दिलीप गांधी गेले अन् लोकांना अचानक ‘ते’ भाषण आठवले; काय कंठ दाटला होता गांधींचा, पाहा व्हिडीओ

भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांचं निधन झालं आहे. अत्यंत हुशार आणि कर्तव्यदक्ष खासदार म्हणून दिलीप गांधी सर्वपरिचित होते. (watch dilip gandhi's last speech in lok sabha election at ahmednagar)

Video: दिलीप गांधी गेले अन् लोकांना अचानक 'ते' भाषण आठवले; काय कंठ दाटला होता गांधींचा, पाहा व्हिडीओ
dilip gandhi, bjp leader
Follow us
| Updated on: Mar 17, 2021 | 11:20 AM

मुंबई: भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांचं निधन झालं आहे. अत्यंत हुशार आणि कर्तव्यदक्ष खासदार म्हणून दिलीप गांधी सर्वपरिचित होते. गांधी यांच्या निधनाची वार्ता कळताच अनेकांना धक्का बसला. अन् गांधींचं नगरमधील शेवटचं भाषणही आठवलं. गांधी यांचं भाजपनं तिकीट कापल्यानंतर भावूक झालेले गांधी भरसभेतच पंतप्रधान नरेंद्र मोदी येण्याआधी भडकले होते. त्यांचा कंठ दाटून आला होता. नगरचा आपण मोठ्या प्रमाणावर विकास केल्याचं ते सांगत होते. त्यातून त्यांनी एवढं काम करूनही माझं तिकीट का कापलं? असा सवालच भाजपला विचारला होता. गांधी यांचं ते भाषण सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. (watch dilip gandhi’s last speech in lok sabha election at ahmednagar)

भरसभेत मानापमान नाट्य

लोकसभा सभा निवडणुकीची रणधुमाळी संपूर्ण देशभर सुरू झाली होती. 12 एप्रिल 2019 रोजी नगरमध्ये भाजप उमेदवार डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या प्रचाराची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. सभेला प्रचंड गर्दी झाली होती. दिलीप गांधी यांनाही सभेसाठी पाचारण करण्यात आलं होतं. मोदी येण्याआधी नेत्यांची भाषण सुरू झाली. त्यावेळी गांधीही भाषण करण्यासाठी उभे राहिले. त्यांनी भाषणाला सुरुवात केली. त्यांनी नगरमध्ये केलेल्या कामाची जंत्रीच लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात मागून कुणी तरी आले आणि गांधींना भाषण आवरतं घेण्यास सांगितलं. भाषणाला सुरुवात करून दोन मिनिटंही झाली नव्हती, तेव्हा भाषण आटोपतं घेण्याचा निरोप आल्याने गांधी भडकले. आधीच तिकीट कापलेलं होतं, त्यात आता भरसभेत अपमान करण्यात आल्याने गांधींचा संतापाचा पारा भडकला आणि त्यांनी माईकवरूनच आयोजकांना सुनावले. त्याचा चेहरा आणि डोळे लाल झाले होते. कंठ दाटून आला होता आणि डोळ्यात पाणी आले होते. भाषण थांबवून ते निघण्याच्या तयारी होते. कॅमेऱ्यात हा सर्व प्रकार टिपल्या गेला होता. त्याचवेळी सुजय विखेंनी प्रसंगावधान राखून गांधींना बोलण्याची विनंती केली आणि गांधी बोलू लागले. मात्र, त्यांच्या चेहऱ्यावरील संताप दिसत होता.

गांधी म्हणाले…

यावेळी त्यांनी तडाखेबंद भाषण केलं. त्यांनी केलेल्या कामाची पुस्तिकाच सोबत आणली होती. ते म्हणाले, “माणसाला कमी पैशात पुण्याला जाता यावं. पुण्यातील लोकांनाही नगरमध्ये येता आलं पाहिजे. (तेवढ्यात कुणी तरी त्यांना डिस्टर्ब केल्याने, त्यामुळे गांधी भडले आणि स्टेजवरच माईकसमोरच म्हणाले, मी बोलणार आहे. दहा मिनिटं बोलणार आहे. अजून कोणी आलं नाही. नाही तर मग तुम्ही बोला. दोन मिनिटं बोलू देत नाही. मग तुम्ही बोला. आम्हीही विकास केला. ते तर लोकांना सांगू द्या. असं सांगत त्यांनी कागदपत्रं उचलली आणि माईक सोडला. त्यानंतर त्यांची समजूत काढल्याने गांधी संतापच्या भरात बोलत होते आणि हे सर्व माईकमधून सभेला आलेल्या लोकांना ऐकू जात होतं.) काही लोक विकास केला का? अशी टीका करतात. विकास केला की नाही याचं उत्तर कोणी द्यायचं? माझ्याकडं बाड आहे. कोणी विकास केला, किती विकास केला, त्याचं काळं पांढरं माझ्या हातात आहे.”

आम्ही तुम्हाला विसरणार नाही

याच सभेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांधींवर स्तुती सुमने उधळली होती. खासदार गांधींनी देखील चांगलं काम केलं होतं. आम्ही तुम्हाला विसरणार नाही. गांधीजी तुम्ही चिंता करू नका. आम्ही तुमच्यापाठी आहोत. पण कधी कधी निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसवर सर्जिकल स्ट्राईक करावा लागतो. तो सुजय विखेंच्या माध्यमातून केला आहे. या एका सर्जिकल स्ट्राईकद्वारे उभी काँग्रेस हलवून टाकली आहे, असं फडणवीस म्हणाले होते.

गांधींचं तिकीट कसं कापलं?

2019च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात अनेक घडामोडी घडल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट कायम असल्याचं दिसून आलं होतं. राज्यात आणि केंद्रात पुन्हा भाजपचंच सरकार येणार असल्याचं बोललं जात होतं. त्यामुळे अनेकांनी भाजपची वाट धरली होती. सुजय विखे-पाटील यांना नगरची जागा सोडण्यास राष्ट्रवादीने नकार दिला होता. तेव्हा सुजय विखे यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढण्याची तयारीही दर्शवली होती. तेव्हा आघाडी जो निर्णय घेईल तो मान्य असल्याचं तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं होतं. मात्र, नगरच्या जागेचा तिढा सुटत नसल्याचं पाहून सुजय विखे यांनी भाजपची वाट धरली. त्यानंतर राधाकृष्ण विखे यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. विखे पितापूत्र भाजपमध्ये आल्याने भाजपने तत्कालीन विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचं तिकीट कापून नगरची जागा सुजय विखेंना दिली होती. त्यामुळे गांधी भाजप नेतृत्वावर नाराज होते. (watch dilip gandhi’s last speech in lok sabha election at ahmednagar)

गांधींचा अल्पपरिचय

गांधी हे भाजपचे ज्येष्ठ नेते होते. ते तीन वेळा नगर दक्षिण मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आले होते. 2003 ते 2004 दरम्यान त्यांनी केंद्रीय जहाजबांधणी राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं होतं. नगर पालिकेचे नगरसेवक म्हणून त्यांच्या राजकीय कारकिर्दीस सुरुवात झाली होती. भाजपच्या युवा मोर्चाचे नगरचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. त्यानंतर भाजपचे नगर अध्यक्षही झाले. 1999मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले. त्यांनी 2000 ते 2004मध्ये केंद्राच्या ग्रामीण विकास समितीवर आणि 2000 ते 2003पर्यंत अर्थ मंत्रालयाच्या समितीवर काम केलं. 2009 आणि 2014मध्येही ते निवडून आले होते. (watch dilip gandhi’s last speech in lok sabha election at ahmednagar)

संबंधित बातम्या:

Dilip Gandhi Passed Away | भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांचं निधन

राज्य सरकारने पुणे विद्यापीठाचे जवळपास 150 कोटी थकवले!

भाजप खासदार रामस्वरुप शर्मा यांचा संशायस्पद मृत्यू, दिल्लीतील घरात मृतदेह आढळला

(watch dilip gandhi’s last speech in lok sabha election at ahmednagar)

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.