ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ दोन दिवशी शहरातील पाणीपुरवठा बंद
यामुळे या दोन दिवसांत ठाणेकरांमी पाणी जपून वापरावं आणि योग्य प्रमाणात पाणी भरून ठेवावं अशा सूचना पालिकेकडून देण्यात आल्या आहेत.
ठाणे : ठाणेकरांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. ठाणे महापालिकेच्या (Thane Municipal Corporation) 1100 मिमी व्यासाच्या जलवाहिनीवरील मेट्रो कामांतर्गत हरदासनगर इथं व्हॉल्व स्थलांतरीत करणं तसंच साकेत ब्रिजखाली मुख्य वाहिनीवरील क्रॉस कनेक्शचा व्हॉल्व बदली करण्याच्या कामासाठी पाणीपुरवठा (water supply) बंद राहणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. महानगरपालिकेचा स्वत:चा पाणी पुरवठा आणि स्टेम प्राधिकरण यांच्यामार्फत शहरास होणारा पाणी पुरवठा शुक्रवार दिनांक 04 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 9 ते शनिवार 05 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत 24 तास बंद ठेवण्यात येणार आहे. (Water supply will be cut off in some parts of Thane city)
यामुळे या दोन दिवसांत ठाणेकरांमी पाणी जपून वापरावं आणि योग्य प्रमाणात पाणी भरून ठेवावं अशा सूचना पालिकेकडून देण्यात आल्या आहेत. या दोन दिवशी शहरातील सिध्देश्वर, जॉन्सन, समतानगर, इटर्निटी, जेल परिसर, साकेत, ऋतूपार्क, घोडबंदर रोड, कोठारी कंपाउंड, इंदिरानगर , लोकमान्यनगर, गांधीनगर, किसननगर, श्रीनगर, वागळे इस्टेस्ट, कळव्याचा काही भाग पाणी पुरवठा होणार नाही.
तर मुंब्र्याचा काही भाग इत्यादी ठिकाणचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून नागरिकांनी पाण्याचा योग्यतो वापर करून पालिकेस सहकार्य करावं असं आवाहन पाणी पुरवठा विभागानं केलं आहे.
खरंतर, गेल्या काही दिवसांआधी मुंबईतही पाणी पुरवठा बंद करण्यात आला होता. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ( Mumbai Municipal Corporation) ‘जी दक्षिण’ आणि ‘जी उत्तर’ विभागातील गावडे चौक, सेनापती बापट मार्ग इथे अस्तित्वात असलेल्या ब्रिटिशकालीन 1450 मिली मीटर व्यासाच्या तानसा (पूर्व) मुख्य जल वाहिनीवरील गळती दुरुस्तीच्या कामासाठी मुंबईत दोन दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. 2 आणि 3 डिसेंबर 2020 रोजी या कामाला सुरुवात झाली होती. यामुळे सदर कालावधीत ‘जी दक्षिण’ आणि ‘जी उत्तर’ विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा (water supply) बंद करण्यात आला होता.
इतर बातम्या –
PHOTO | ठाणे, पालघरमध्ये शेतकरी-कामगार कायद्याविरोधात हजारोंचा एल्गार
Corona | कोरोनाशी दोन हात करण्यासाठी पायाभूत सुविधा अद्ययावत ठेवा; ठाणे महापालिका आयुक्तांचे निर्देश
MNS Protest Update | मुंबई, ठाणे, पुण्यात कार्यकर्ते आक्रमक, वाढीव वीजबिलविरोधात मनसेचा ‘झटका मोर्चा’ https://t.co/dhI8I1P30X @mnsadhikrut #MNSAgainstInflatedBills #MNS #Mumbai #Pune
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 26, 2020
https://www.tv9marathi.com/maharashtra/schools-in-thane-district-will-remain-closed-till-december-31-2020-322830.html> (Water supply will be cut off in some parts of Thane city)