MUMBAI : नवीन वर्षात मुंबईकरांसाठी पाण्यात धावणारी ‘टॅक्सी’ मुंबई ते नवी मुंबई प्रवास होणार वेगवान
नवीन वर्षात मुंबई ते नवी मुंबई वॉटर टॅक्सी सुरू होणार आहे. मुंबई ते नवी मुंबई 40 मिनिटात पोहोचण्याची शक्यता आहे. या जलमार्गामुळे प्रवास आणखी सुंदर होणार आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी नववर्षाच्या तोंडावर हे मोठं गिफ्ट आहे.
मुंबई : नवीन वर्षात मुंबईकरांना एक अनोखं गिफ्ट मिळणार आहे. मुंबईकरांचा जलप्रवास आता आणखी सुसाट होणार आहे. नवीन वर्षात मुंबई ते नवी मुंबई वॉटर टॅक्सी सुरू होणार आहे. येत्या 16 डिसेंबरपासून या मार्गावर वॉटर टॅक्सीची सेवा सुरू केली जाणार आहे. त्यासाठी दोन्हीकडे जेट्टी तयार करून ट्रायल रनही पार पडलं आहे. सध्या मुंबईकरांना नवी मुंबईत जाण्यासाठी रस्तेमार्गाचा आणि रेल्वेचा वापर करावा लागतोय. पण त्यात रोजचे काही तास घालवावे लागताहेत. त्यात दिवसेंदिवस वाढत चाललेली ट्रॅफीकची समस्या प्रवाशांची डोकेदुखी वाढवत आहे.
मुंबईत ते नवी मुंबई फक्त 40 मिनिटात
या वॉटर टॅक्सीमुळे मुंबईकरांचा आताचा तासांवरचा प्रवास मिनिटांवर येणार आहेत. मुंबई ते नवी मुंबई 40 मिनिटात पोहोचण्याची शक्यता आहे. या जलमार्गामुळे प्रवास आणखी सुंदर होणार आहे, त्याचबरोबर इंधनाची मोठी बचतही होणार होईल. मुंबईतील डोमेस्टीक क्रूज टर्मिनल प्रवाशांच्या स्वागतासाठी तयार असल्याचं मुंबई पोर्ट ट्रस्टचे चेअरमन राजीव जलोटा यांनी सांगितलं आहे. या मार्गावर टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या कंपनीची निवडही पूर्ण झाली आहे.
मुंबईला उपनगरांशी जलमार्गाद्वारे जोडणार
रोज नोकरी, कामधंद्यासाठी मुंबईत येणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आणखी वेगवान आणी सुकर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशी सेवा 12 मार्गावर तर 4 मार्गावर रोपेक्स सेवा सुरू करण्याची योजना आखण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात प्रवास आणखी वेगवान होणार आहे. प्रवाशांची वाढती संख्या आणि शहरांची वाढती व्याप्ती पाहून आणखी नव्या योजना आखण्यात येत आहेत. त्यातून या वॉटर टॅक्सीची संकल्पना आखण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी नववर्षाच्या तोंडावर हे मोठं गिफ्ट आहे.
इतर महत्वाच्या बातम्या