ऑक्सिजन टँकर आणण्यासाठी ड्रायव्हरही मिळेना, एसटीचे ड्रायव्हर आणणार टँकर; अनिल परब यांची माहिती

केंद्र सरकारने बाहेरच्या राज्यातून ऑक्सिजन आणण्यासाठी राज्य सरकारला परवानगी दिली आहे. (we will provide ST drivers for oxygen tanker, says anil parab)

ऑक्सिजन टँकर आणण्यासाठी ड्रायव्हरही मिळेना, एसटीचे ड्रायव्हर आणणार टँकर; अनिल परब यांची माहिती
अनिल परब, परिवहन मंत्री.
Follow us
| Updated on: Apr 19, 2021 | 2:22 PM

मुंबई: केंद्र सरकारने बाहेरच्या राज्यातून ऑक्सिजन आणण्यासाठी राज्य सरकारला परवानगी दिली आहे. मात्र, ऑक्सिजनचे टँकर आणण्यासाठी सरकारला ड्रायव्हरच मिळत नसल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे आता एसटीचे ड्रायव्हर हे ऑक्सिजन टँकर चालवणार आहेत. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी तशी माहिती दिली आहे. (we will provide ST drivers for oxygen tanker, says anil parab)

अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाकडून ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. त्याचं कोऑर्डिनेशन परिवहन विभाग करत आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे काही टँकर्सचे ड्रायव्हर्स गावाला निघून गेले आहेत. त्यामुळे ड्रायव्हर्सचा तुटवडा निर्माण झाला आहे. म्हणून आम्ही परिवहन विभागाचे ड्रायव्हर्स आम्ही ऑक्सिजनचे टँकर आणण्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत, असं परब यांनी सांगितलं.

ऑक्सिजनचा आजच पुरवठा होणार

आजपासूनच ऑक्सिजन पुरवठा करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी आरोग्य विभागाशी समन्वय साधला जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली. राज्य सरकारने फेरीवाला, रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी मदत पॅकेज जाहीर केले आहे. त्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली आणि या बैठकीत उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार तात्काळ मदतीसाठी राज्य सरकारने मदत सुरू केली आहे, असं ते म्हणाले.

राज्यपालांसोबत वाद नव्हता

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना गोव्याला जाण्यासाठी सरकारी विमान देण्यात आलं आहे. त्यामुळे राज्यपाल आणि सरकारमधला वाद संपला आहे का? असा सवाल करण्यात आला. त्यावर राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद नव्हता, असं ते म्हणाले. तसेच ब्रुक फार्मावर बोलण्यास त्यांनी नकार दिला. फार्माच्या संदर्भात गृहमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे मला यावर काही बोलायचं नाही, असं ते म्हणाले. (we will provide ST drivers for oxygen tanker, says anil parab)

संबंधित बातम्या:

मोठी बातमी: ठाकरे सरकार आणि राज्यपालांमध्ये दिलजमाई; कोश्यारी सरकारी विमानातून गोव्याला

क्रूरतेचा कळस! 35 वर्षीय महिलेवर 11 जणांचा गँगरेप, आठ जण कोरोनाग्रस्त, पीडितेलाही संसर्ग

LIVE | नागपूरसह विदर्भात दोन दिवसांपासून रेमडेसिव्हीरचा तुटवडा, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भाजपचं ठिय्या आंदोलन

(we will provide ST drivers for oxygen tanker, says anil parab)

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.