Vande Bharat Express : मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस कधी होणार सुरु? काय असणार वेळापत्रक?

Vande Bharat Express : महाराष्ट्रातून ३ जूनपासून चौथी वंदे भारत एक्स्प्रेस धावणार होती. परंतु ओडिशामधील रेल्वे अपघातानंतर रेल्वेचा हा उद्घाटन सोहळा लांब पडला. आता हा सोहळा कधी होणार? यासंदर्भात रेल्वेकडून अपडेट मिळाले नाही.

Vande Bharat Express : मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस कधी होणार सुरु? काय असणार वेळापत्रक?
vande bharat newImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jun 06, 2023 | 9:50 AM

मुंबई : ओडीशामध्ये 3 ट्रेनचा भीषण अपघात झाला होता. या अपघातामुळे शनिवारी 3 जून रोजी होणारा वंदे भारत एक्स्प्रेसचा लोकार्पणाचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कोकणातून जाणाऱ्या वंदे भारतचे उद्घाटन मडगाव येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हि़डिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार होते. मात्र, ओडिशामधील अपघातानंतर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. त्याच दिवशी रिकामी गाडी मुंबईला नेण्यात आली. त्यामुळे मंजुरी मिळालेल्या वेळापत्रकानुसारच या गाडीची नियमित सेवा सुरु होणार आहे. परंतु त्याला अजून मंजुरी मिळाली नाही. कारण केंद्रीय रेल्वेमार्ग पथक अन् रेल्वेची मोठी यंत्रणा ओडिशात येथील अपघातात व्यस्त आहे. त्यामुळे तूर्तास या गाडीला रेड सिग्नल आहे.

रेल्वेकडून अद्याप माहिती नाही

वंदे भारत एक्स्प्रेस कधीपासून धावणार याबाबतची अधिकृत माहिती अद्याप रेल्वेकडून देण्यात आलेली नाही. याबाबत लवकरच कोकण रेल्वे प्रशासनाकडून अधिकृतरित्या कळविण्यात येईल, असे कोकण रेल्वे प्रशासनातील सूत्रांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

वेळ काय असणार?

रेल्वेच्या म्हणण्यानुसार, ही ट्रेन आठवड्यातून 6 दिवस धावेल, तिची सेवा शुक्रवारी बंद असेल. जर तुम्हाला मुंबईहून गोव्याला जायचे असेल तर ही गाडी पहाटे ५.२५ वाजता सुटेल. दुपारी १.१५ वाजता गोव्याला पोहोचेल. ही गाडी गोव्याहून दुपारी २.३५ वाजता सुटून रात्री १०.२५ वाजता पोहोचेल. दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली या स्थानकावरही ती थांबणार आहे.

8 डबे अन् भाडे किती

या ट्रेनमध्ये एससी चेअरकार आणि एक्झिक्युटिव्ह क्लास असे एकूण 8 डबे आहेत. जर तुम्ही चेअर कारने प्रवास करत असाल तर तुमचे भाडे 1100 ते 1600 दरम्यान असेल, तर एक्झिक्युटिव्ह क्लासचे भाडे 2200-2800 च्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.

राज्यातील इतर वंदे भारत एक्स्प्रेसचे वेळापत्रक

मुंबई ते गांधीनगर ट्रेन

  • मुंबई सेंट्रेलवरुन सकाळी 6:00 वाजता सुटेल आणि गांधीनगरला 12:25 वाजता पोहचणार आहे.
  • गांधीनगरवरुन दुपारी 2:05 वाजता सुटेल तर मुंबईत रात्री 8:25 ला पोहचणार आहे.
  • मुंबई ते गांधीनगर अंतर : 522 km

मुंबई ते गांधीनगर भाडे

  • AC Chair car (CC) : 1255
  • Exec. Chair Car (EC) : 2435
  • गांधीनगर ते मुंबई भाडे
  • AC Chair car (CC) : 1420
  • Exec. Chair Car (EC) : 2630

मुंबई ते सोलापूर वंदे भारत

  • मुंबईवरुन दुपारी 4.05 वाजता सुटते तर सोलापूरला रात्री 10.40 वाजता पोहचते. पुण्यात ही गाडी संध्याकाळी 7.10 मिनिटांनी पोहचते.
  • सोलापूरवरुन सकाळी 6:05 वाजता सुटते तर मुंबईत दुपारी 12:35 वाजता पोहचते. पुण्यात ही गाडी सकाळी 9:15 वाजता येते.
  • मुंबई ते सोलापूर अंतर 455

मुंबई ते सोलापूर भाडे

  • AC Chair car (CC) : 1255
  • Exec. Chair Car (EC) : 2435
  • सोलापूर ते मुंबई भाडे
  • AC Chair car (CC) : 1150
  • Exec. Chair Car (EC) : 2185

मुंबई ते साईनगर (शिर्डी)

  • मुंबईवरुन सकाळी 6:20 वाजता सुटते, शिर्डीला 11:40 वाजता पोहचते.
  • शिर्डीवरुन संध्याकाळी 5:25 वाजता सुटते आणि मुंबईला रात्री 10:50 वाजता पोहचते.
  • मुंबई ते शिर्डी अंतर 343
  • मुंबई ते शिर्डी भाडे
  • AC Chair car (CC) : 975
  • Exec. Chair Car (EC) : 1840
  • शिर्डी ते मुंबई भाडे
  • AC Chair car (CC) : 1130
  • Exec. Chair Car (EC) : 2020
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...