धोका कुणी दिला? शिंदे गटाला मांडीवर घेऊन कोण बसलं?; संजय राऊत यांनी थेट अमित शाह यांनाच केलं लक्ष्य

भाजपसोबत राहिलं कोण? निष्ठावंत पक्ष असलेले अकाली दल आणि शिवसेनाही राहिली नाही. 2024नंतर कळेल, कोण आहे आणि कोण होतं म्हणून हे होते हे कळेल, असा सूचक इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

धोका कुणी दिला? शिंदे गटाला मांडीवर घेऊन कोण बसलं?; संजय राऊत यांनी थेट अमित शाह यांनाच केलं लक्ष्य
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 11, 2023 | 11:18 AM

मुंबई : धोका कुणी कुणाला दिला हे सर्व महाराष्ट्रातील आणि देशातील जनता जाणून आहे. तुम्ही धोका दिला नसता तर आज शिंदेंना तुम्ही मुख्यमंत्रीपदी बसवलं नसतं. अडीच वर्षापूर्वी संधी होती, तेव्हा तुम्ही शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिलं नाही. मुख्यमंत्रीपद देण्याची चर्चाच झाली नसल्याचं त्यावेळी तुम्ही म्हणाला होता. मग शिंदे गटाला मुख्यमंत्रीपद कसं दिलं? शिवसेना फोडून तुम्ही शिंदे गटाला मांडीवर का घेतलं? तुम्ही खोटं बोलत आहात, अशा शब्दात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली. ते माध्यमांशी बोलत होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे काल नांदेडमध्ये आले होते. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनी युतीत असताना वचन पाळलं नाही. धोका दिला अन् काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊ बसले, अशी टीका अमित शाह यांनी केली होती. शाह यांच्या या टीकेचा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. धोका कुणी दिला? का दिला? त्याचं उदाहरण हे आजचं सरकार आहे. अडीच वर्षापूर्वी मुख्यमंत्रीपदाबाबत काहीच बोलणी झाली नसल्याचं म्हणत होता. मग आता शिंदे गटाला कशाच्या आधारे मुख्यमंत्रीपद दिलं? गद्दार शिंदे गटाला मांडीवर घेऊन बसला. हा धोका नाही का?, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

हे सुद्धा वाचा

शाहांपेक्षा ठाकरे कुटुंबावर विश्वास

ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी वचन पाळलं नाही. शब्द फिरवला. महाराष्ट्रातील जनता ही अमित शाह यांच्यापेक्षा आजही ठाकरे कुटुंबावरच विश्वास ठेवते. आजही या राज्याची जनता इतर कोणापेक्षाही ठाकरे कुटुंबावर विश्वास ठेवते आणि ते सांगतील ते ऐकतात. शहांपेक्षा अधिक ऐकतात, अशा शब्दात संजय राऊत यांनी शाह यांना सुनावले.

भीती असणं चांगलं

अमित शाह यांनी 20 मिनिटाचं भाषण केलं. त्यात 7 ते 8 मिनिटं ते उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर बोलले. ही आनंदाची गोष्ट आहे. अजूनही त्यांच्या डोक्यात शिवसेनेचं भय आहे. शिवसेनेची भीती कायम असणं चांगलं आहे. आम्ही आमचा संघर्ष करत आहोत. आम्ही आव्हान निर्माण केलं आहे. त्यामुळे त्यांच्या मनात भीती आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

देशाची कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर

देशातील कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर सोडून फक्त निवडणुका आणि राजकीय प्रचार यातच अमित शाह गुंतले आहेत. मणिपूर पूर्ण पेटला आहे. तिथली हिंसा नियंत्रणात आणता येत नाही. महाराष्ट्रात अनेक भागात दंगे पेटवले जात आहेत. देशात अनेक ठिकाणी दंगे पेटवले जात आहे. देशाची कायदा सुव्यवस्था आणि अंतर्गत सुरक्षा व्यवस्था यापेक्षा विरोधकांवर हल्ला करणं आणि अडचण निर्माण करणं यालाच ते राज्य चालवणं समजत आहेत. तसंच राज्य राज्यात सुरू आहे, अशी टीका राऊत यांनी केली.

खरा वाघ येतो तेव्हा…

तीन पक्ष एकत्र आले म्हणून ते वाघ ठरत नाहीत, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर केली होती. या टीकेचाही राऊत यांनी समाचार घेतला. फडणवीस कधी वाघ झाले? अनेक ठिकाणी कोल्हे आणि लांडगे वाघाचं कातडं घालून फिरत असतात. पण जेव्हा खरा वाघ येतो तेव्हा कातड टाकून पळून जातात. त्यांचीच शिकार होते. शिवसेनेचं बोध चिन्हच वाघ आहे. बाळासाहेबांनी चितारलं आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला सांगू नये, असा टोला त्यांनी लगावला.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.