मानखुर्द शिवाजी नगर विधानसभा: 209 कोटींची संपत्ती असलेल्या सपाच्या अबू आझमींचे वर्चस्व महायुती मोडणार?

mankhurd shivaji nagar assembly constituency: समाजवादी पक्षाचे वर्चस्व मोडण्यासाठी महायुतीला राज ठाकरे यांच्या मनसेची सोबत लागणार आहे. मुस्लिम मतदारांसह इतर मतदारांवर महायुतीला वर्चस्व करावे लागणार आहे. आता महायुतीचा फार्मूला कितीपत यशस्वी होणार हे 23 नोव्हेंबर 2024 रोजीच स्पष्ट होणार आहे.

मानखुर्द शिवाजी नगर विधानसभा:  209 कोटींची संपत्ती असलेल्या सपाच्या अबू आझमींचे वर्चस्व महायुती मोडणार?
abu azmi
Follow us
| Updated on: Oct 18, 2024 | 1:09 PM

mankhurd shivaji nagar assembly constituency: मुंबईतील काही मतदार संघावर समाजवादी पक्षाचे वर्चस्व आहे. त्यामध्ये मानखुर्द शिवाजी नगर मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदार संघातून सातत्याने समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी निवडून आले आहे. 209 कोटींची संपत्ती असलेल्या अबू आझमी यांचा पराभव करण्यासाठी महायुतीकडून कंबर कसली गेली आहे. मुस्लिम बाहुल असलेल्या या मतदार संघात अबू आझमी विरोधात महायुतीकडे उमेदवार कोण असणार? यावरच अबू आझमी यांचे भवितव्य ठरणार आहे.

असा आहे मतदार संघ

मानखुर्द शिवाजीनगर हा मुंबई उपनगर जिल्ह्यातील 26 मतदार संघापैकी एक महत्वाचा मतदार संघ आहे. हा मतदार संघ विक्रोळी, घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्व, मुलुंड आणि भांडुप पश्चिम या पाच विधानसभा क्षेत्रांसह मुंबई ईशान्य लोकसभा मतदारसंघातील भाग आहे. 2011 मधील जनगणनेनुसार या मतदार संघात अनुसूचित जातीच्या मतदारांची संख्या 32 हजार 128आहे. अनुसूचित जनजाती मतदारांची संख्या आहे. या मतदार संघात सर्वाधिक मतदार मुस्लिम आहे. त्यांची संख्या 1 लाख 57 हजार 518 आहे. यामुळेच समाजवादी पक्षाचे आमदार अबू असीम आझमी यांचे वर्चस्व या ठिकाणी राहिले आहे. के सलग तीन वेळा या ठिकाणावरुन आमदार झाले आहेत.

सपाची परिस्थिती मजबूत होणार

मानखुर्द शिवाजीनगर विधानसभेचे विद्यमान आमदार अबू आझमी यांच्याकडे 209 कोटी रुपयांची संपत्ती आहे. महाराष्ट्रात समाजवादी पक्ष पुढे नेण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. यंदा महाविकास आघाडीसोबत समाजवादी पक्ष आघाडी करण्याच्या तयारीत आहे. सपाने राज्यातील 25 जागांची मागणी केली आहे. सपा महाविकास आघाडीसोबत आल्यास त्यांची परिस्थिती अधिक चांगली होणार आहे. तसेच अबू आझमी यांनी मिळणारी मतेही वाढत आहेत.

हे सुद्धा वाचा

मागील पंचवार्षिकचा म्हणजेच 2019 च्या निकाल पाहिल्यावर समाजवादी पक्ष पक्षाचे वर्चस्व राहिले. अबू असिम आझमी 69 हजार 082 मते घेऊन विजयी झाले होते. त्यांनी शिवसेना (शिवसेना-भाजप युती होती)चे विठ्ठल गोविंद लोकरे यांचा पराभव केला होता. लोकरे यांना 25,601 मते मिळाली होती.

उमेदवार पक्ष मते टक्केवारी
अबू आझमी सपा 69082 48.2
विट्ठल गोविंद लोकारे एसएचएस 43481 30.3
सुरैया अकबर शेख वीबीए 10465 7.3
मोहम्मद सिराज मोहम्मद इकबाल शेख अपक्ष 9789 6.81
खोत रवीन्द्र कृष्ण अपक्ष 3288 2.3

समाजवादी पक्षाचे वर्चस्व मोडण्यासाठी महायुतीला राज ठाकरे यांच्या मनसेची सोबत लागणार आहे. मुस्लिम मतदारांसह इतर मतदारांवर महायुतीला वर्चस्व करावे लागणार आहे. आता महायुतीचा फार्मूला कितीपत यशस्वी होणार हे 23 नोव्हेंबर 2024 रोजीच स्पष्ट होणार आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.