AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shiv Sena vs Shinde: दसरा मेळाव्यावरुन का सुरु आहे रणकंदन? शिवसेना आणि शिंदे गटासाठी का महत्त्वाचा? जाणून घ्या 5 कारणे

शिवसेनेत झालेल्या फुटीमुळे अभूतपूर्व अशी स्थिती निर्माण झालेली आहे. शिवसेनेतील 40 आमदार आणि 12 खासदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने शिवसेनेला सत्तेतून पायउतार व्हावे लागले आहे. तसेच आता मूळ शिवसेना कुणाची आहे असा प्रश्नही निर्माण झाला असून, त्याचा निर्णय सुप्रीम कोर्टात होणार आहे. त्यामुळे या दसरा मेळाव्यावर दोन्ही बाजूंनी दावा करण्यात येतोय. आता हा दावा करण्यामागे काय पाच प्रमुख कारणे आहेत, हेही जाणून घेऊयात.

Shiv Sena vs Shinde: दसरा मेळाव्यावरुन का सुरु आहे रणकंदन? शिवसेना आणि शिंदे गटासाठी का महत्त्वाचा? जाणून घ्या 5 कारणे
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेImage Credit source: TV 9 marathi
| Edited By: | Updated on: Aug 30, 2022 | 4:31 PM
Share

मुंबई – राज्यात सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरु असली तरी राजकीय वातावरण तापलेले आहे ते दसरा मेळाव्यावरुन (Dasra Melava). गणपतीनंतर नवरात्र आणि नवरात्रीच्या अखेरीस होणाऱ्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यावर हक्क सांगण्यासाठी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट हे दोन्हीही प्रयत्नशील असल्याचे दिसते आहे. मुंबई महापालिकेकडे दोन वेळा याबाबतची परवानगी मागून अद्यापही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्या शिवसेनेला स्पष्ट परवानगी मिळालेली नाही. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)गटाची याबाबतही एक महत्त्वाची बैठकही पार पडली. सुप्रीम कोर्टात शिवसेना कुणाची हा वाद सुरु असतानाच दसरा मेळावा कुणाचा हे सिद्ध करण्यासाठी सध्या राज्यात शिवसेना आणि शिंदे गट एकमेकांसमोर उभे ठाकलेले दिसत आहेत.

दसरा मेळाव्याची गर्दी

काय आहे दसरा मेळाव्याचा इतिहास ?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 साली शिवसेनेची स्थापना केली. त्यानंतर 30 ऑक्टोबर 1966 साली पहिला दसरा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडला होता. या दसरा मेळाव्याला किमान 55 वर्षांचा इतिहास आहे. राज्यातील शिवसेनेची आगामी भूमिका या मेळाव्यात ठरत असे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात तर बाळासाहेब काय भूमिका मांडतात याकडे दसऱ्याच्या दिवशी सगळ्यांचे लक्ष असे. या दसरा मेळाव्यात बाळासाहेब घेत असलेल्या भूमिकेतून शिवसैनिकांना वैचारिक भूमिका आणि दिशा स्पष्ट होत राही. शिवाजी पार्कवरच हा मेळावा घेणारा शिवसेना हा एकमेव राजकीय पक्ष असावा. त्यामुळे दसरा मेळा, शिवसेना आणि शिवाजी पार्क यांचे एक अतूट नेते गेल्या काही काळात तयार झालेले आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे

यंदा मात्र शिवसेनेत झालेल्या फुटीमुळे अभूतपूर्व अशी स्थिती निर्माण झालेली आहे. शिवसेनेतील 40 आमदार आणि 12 खासदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने शिवसेनेला सत्तेतून पायउतार व्हावे लागले आहे. तसेच आता मूळ शिवसेना कुणाची आहे असा प्रश्नही निर्माण झाला असून, त्याचा निर्णय सुप्रीम कोर्टात होणार आहे. त्यामुळे या दसरा मेळाव्यावर दोन्ही बाजूंनी दावा करण्यात येतोय. आता हा दावा करण्यामागे काय पाच प्रमुख कारणे आहेत, हेही जाणून घेऊयात.

1. शिवसेना कुणाची हे ठरणार?

दसरा मेळावा आणि शिवसेना हे पक्के समीकरण आहे. शिवाजी पार्कात उद्धव ठाकरे वा एकनाथ शिंदे गट यांच्यापैकी ज्यांचा दसरा मेळावा होईल, त्यांचीच शिवसेना, असा संदेश जाणार आहे. राज्यात सत्ताधारी शिंदे आणि भाजपा असल्याने शिवाजी पार्कवर दसरा मेळावा करण्याचा शिंदे गटाचाच प्रयत्न असेल. तर उद्धव ठाकरे यांच्याकडूनही शिवसेना या मेळाव्यासाठी जोर लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्याचा दसरा मेळावा त्याची शिवसेना, असा हा चुरशीचा सामना असेल.

2. वैचारिक वारशावर हक्काची लढाई

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 55 वर्षांपूर्वी सुरु केलेल्या या वैचारिक परंपरेवरही दावा करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने शिंदे गटाकडून होईल. ज्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना सांभाळून घ्या, असे भावनिक आवाहन बाळासाहेबांनी केले होते. जिथून हिंदुत्वाची भूमिका बाळासाहेबांनी मांडली होती. तिथूनच शिंदे गटाचा आपणच शिवसेना असल्याचा दावा करण्याची त्यांना ही संधी वाटते आहे.

उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात

3. निवडणुकांपूर्वी जनमानसात मेसेज

दसरा मेळाव्यात शिवसेनेच्या भूमिका स्पष्ट होत असत आणि त्याच अधिकृत असल्याचे शिक्कामोर्तब शिवसेना प्रमुख किंव पक्षप्रमुखांच्या भाषणातून होत असे. त्यामुळे दसरा मेळाव्यात घेतलेली भूमिका हीच शिवसेनेची अधिकृत भूमिका असे मानले जाई. शिवसेनेच्या फुटीनंतर दोन्ही बाजूंकडून एकमेकांना गद्दार ठरवण्याचा प्रयत्न होताना दिसतो आहे. दसरा मेळाव्यातून अधिकृतरित्या दुसऱ्या बाजूला गद्दार ठरवण्याची संधी दोन्ही शिवसेनेपुढे आहे. यातून जनमानसातही एक संदेश जाईल. हाही त्यामागचा उद्देश आहे.

4. पक्षावर, चिन्हावर दावा सांगण्याची सोय

दसरा मेळावा या दोन्हींपैकी जो घेईल, त्याला पक्षावर आणि चिन्हावर दावा करण्याची संधी मिळणार आहे. विधिमंडळात ज्या प्रमाणे एकनाथ शिंदे यांचाच गट अधिकृत गृहित धरण्यात आला, तसेच मुंबई महापालिकेने उद्या एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मेळाव्याची परवानगी दिली. तर कागदोपत्री दसरा मेळाव्याची परवानगी आपल्यालाच मिळाली ही दाखवण्याची संधीही दोघांना हवी असण्याची शक्यता आहे.

5. शक्तिप्रदर्शनाची संधी

महापालिका निवडणुकांपूर्वी होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मोठे शक्तिप्रदर्शनाची संधी दोन्ही बाजूंना असेल. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो न वापरता पक्ष चालवा आणि निवडणुका जिंकून दाखवा असे आव्हान उद्धव ठाकरेंनी दिले आहे. मात्र प्रत्यक्षात शिंदे गटाने आपणच शिवसेना असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी शक्तिप्रदर्शन करत शिवसेना आमचीच हे दाखवण्याचा दावा दोन्ही बाजूंचा असेल.

आता दोन्ही पक्षांचे दसरा मेळावे होतील, अशीच शक्यता असून त्यांच्या जागा नेमक्या काय असतील, याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.