शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला महाविकास आघाडीच्या नेत्यांची हजेरी?; संजय राऊत म्हणाले…

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तोफ उद्या धडाडणार आहे. दसरा मेळाव्या निमित्ताने उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. (will maha vikas aghadi leaders attend shivsena dussehra rally?)

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला महाविकास आघाडीच्या नेत्यांची हजेरी?; संजय राऊत म्हणाले...
Sanjay Raut
Follow us
| Updated on: Oct 14, 2021 | 12:02 PM

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तोफ उद्या धडाडणार आहे. दसरा मेळाव्या निमित्ताने उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं असतानाच शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार का? असा सवाल केला जात आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा शिवसेनेचा दसरा मेळावा आहे, असं सांगत या मेळाव्याला महाविकास आघाडीच्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं नसल्याचंच राऊत यांनी अप्रत्यक्षपणे स्पष्ट केलं आहे.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दसरा मेळाव्यावर भाष्य केलं. आमची मुलुख मैदानी तोफ उद्या धडाडणार आहे. कोरोना नियमांचं भान ठेवून हा मेळावा होईल. शिवसेनेची रॅली ऐतिहासिक असते. शिवाजी पार्कवर ही रॅली होते. लाखो लोक उपस्थित राहत असतात. पण कोरोनामुळे दोन वर्ष रॅली झाली नाही. यावेळी शिवाजी पार्कवर मेळावा घेण्याचा विचार होता. पण हजारो लोक जमून कोरोना नियमांचा भंग होऊ शकतो. त्यामुळे षण्मुखानंदमध्ये मेळावा घेण्याचं ठरलं आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे रोखठोक मते मांडतील. देशाच्या, राज्याच्या राजकीय घडामोडींवर ते भाष्य करतील, असं राऊत म्हणाले. या मेळाव्याला महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार का? असा सवाल करताच हा मेळावा शिवसेनेचा असतो. तो शिवसेनेचा दसरा मेळावा आहे, असं त्यांनी सांगितलं.

तोंडाच्या वाफा दडवणं हे विरोधकांचं काम

देशात इंधनाचे दर वाढले आहेत. त्याबाबत विचारलं असता तो राक्षस 2024मध्ये आपल्याला जाळायचा आहे. त्याची सुरुवात उद्यापासून करू, असं सूचक विधान त्यांनी केलं. यावेळी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीका केली. चंद्रकांत पाटील बोलतात त्यांना बोलत राहू द्या. त्यांना कोणी गांभीर्याने घेत नाही. त्यांच्या बोलण्याने महाराष्ट्राला फरक पडत नाही. ते रोज बोलतात. बोलू द्या. विरोधी पक्षाचे काम आहे तोंडाच्या वाफा दवडणं. दवडू द्या, असा घणाघाती हल्लाही त्यांनी केला.

त्यांनाही उद्या उत्तर देऊ

राज्यातील काही लोकांना दोन वर्षात काही धंदा उरलेला नाही. राज्यात सध्या एक नाटक चळवळ सुरू झाली आहे. त्या नाटक चळवळीलाही उद्याच्या दसरा मेळाव्यातून उत्तर दिलं जाईल, असा टोला त्यांनी मनसेला लगावला.

संबंधित बातम्या:

मला चारचाकी परवडत नाही, चालत जाईन नाहीतर रांगत, शिवेंद्रराजेंच्या ‘दुचाकी’ टीकेवर उदयनराजेंचा भडका

दसरा सण मोठा…! झेंडूला सोन्याचा भाव, कल्याण फुलबाजारात खरेदीसाठी प्रचंड गर्दी

जावयाकडे गांजा सापडलाच नाही, गांजा आणि तंबाखूमधील एनसीबीला फरक कळतो की नाही?; नवाब मलिक यांचा सवाल

(will maha vikas aghadi leaders attend shivsena dussehra rally?)

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.