VIDEO: विनामास्क फिरताना रोखलं, महिलेकडून क्लीनअप मार्शललाच मारहाण

मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट होत आहे. तरीही अजून काही जण बेफिकीरपणे वागत आहेत. मास्क वापरण्याबाबत कडक निर्बंध लागू करुनही अनेकांना त्याच्याशी देणंघेणं नसल्याचं दिसतंय. मास्क न लावल्यामुळे दंड ठोठावणाऱ्या मुंबई मार्शल महिलेला, एका महिलेने मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे (woman beat Mumbai clean-up marshal woman after ask for fine).

VIDEO: विनामास्क फिरताना रोखलं, महिलेकडून क्लीनअप मार्शललाच मारहाण
महिलेची दादागिरी, तोंडाला मास्क नाही, तसाच रिक्षा प्रवास, वरुन क्लीनमार्शलला शिविगाळ आणि मारहाण
Follow us
| Updated on: Mar 19, 2021 | 8:17 PM

मुंबई : मुंबईत रिक्षा प्रवास करणाऱ्या एका महिलेने क्लीनअप मार्शल महिलेला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित घटना ही कांदिवली लिंक रोड परिसरातील असल्याचा दावा केला जातोय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत महिला क्लीनअप मार्शल महिलेला मारहाण करताना स्पष्टपणे दिसत आहे (woman beat Mumbai clean-up marshal woman after ask for fine).

व्हिडीओत नेमकं काय दिसतंय?

व्हिडीओत एक महिला विना मास्क रिक्षा प्रवास कराताना दिसते. ही रिक्षा महावीर नगर सिग्नल जवळ पोहोचते. यावेळी तिथे असलेल्या क्लीनअप मार्शलची तिच्याकडे नजर जाते. त्यानंतर ते महिलेकडे 200 रुपयांचा दंड मागतात. यावरुन संबंधित महिला प्रचंड चिडते. ती क्लीनअप मार्शलला शिवगाळ करायला लागते. त्यापुढे जाऊन ती महिला क्लीनअप मार्शलला मारहाण करते. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झालाय. संबंधित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चारकोप पोलिसांनी या व्हिडीओचा तपास करायला सुरुवात केली आहे.

नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना दंड

कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईत तर कोरोनाचं संक्रमण प्रचंड वेगाने वाढत आहे. कोरोनाची साखळी तुटावी यासाठी प्रशासनाकडून मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आलाय. मात्र, तरीही लोकांकडून नियमांचं उल्लंघन होत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेकडून क्लीनअप मार्शलची नेमणूक करण्यात आली आहे. हे क्लीनअप मार्शल शहरातील विविध भागात, चौकाचौकावर, गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी मास्क घातलं आहे की नाही? याची पाहणी करतात. याशिवाय जे नागरिक मास्कचा वापर करत नाही त्यांच्याकडून दंड वसूल करण्याचं काम क्लीनअप मार्शलकडून केलं जात आहे.

व्हिडीओ बघा :

क्लीनअप मार्शल मारहाणच्या घटना याआधीही घडल्या

दरम्यान, क्लीनअप मार्शलला मारहाण करण्याच्या घटना याआधी देखील घडल्या आहेत. याआधी देखील क्लीनअप मार्शल आणि मुंबईकर यांच्यात दंड वसूल करण्यावरुन बाचाबाची आणि हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे (woman beat Mumbai clean-up marshal woman after ask for fine).

हेही वाचा : जालन्यात कोरोनाचा एकही बळी जाता कामा नये, विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करा; आरोग्यमंत्री टोपेंच्या सूचना

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.