आदित्य ठाकरे यांचा खूप जवळचा पदाधिकारी शिंदे गटात जाण्याची चर्चा

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा अतिशय जवळचा मानला जाणारा पदाधिकारी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे आगामी काळात काय-काय राजकीय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आदित्य ठाकरे यांचा खूप जवळचा पदाधिकारी शिंदे गटात जाण्याची चर्चा
Aaditya ThackerayImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 29, 2023 | 11:10 PM

मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले युवासेनेचे नेते राहुल कनाल हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे या चर्चांवर खासदार श्रीकांत शिंदे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. “ठाकरे गटाला आता अनेक धक्के बसणार”, अशी सूचक प्रतिक्रिया श्रीकांत शिंदे यांनी राहुल कनाल यांच्या प्रश्नावर दिली आहे. तर दुसरीकडे राहुल कनाल यांनी याबाबतच्या चर्चांवर एका वाक्यात उत्तर दिलं आहे. “मी माझा निर्णय लवकरच जाहीर करेन”, असं राहुल कनाल यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राहुल कनाल यांच्याबाबतच्या प्रश्नांना चांगलंच उधाण आलं आहे.

“एकनाथ शिंदे यांचा जनाधार आणि विश्वास दररोज वाढतोय. नवी माणसं रोज मोठ्या प्रमाणात एकनाथ शिंदे यांच्यासोबत जोडली जात आहेत. आमदार, खासदार, नगरसेवक यांचा मोठ्या प्रमाणात प्रवेश सुरु आहे”, अशी प्रतिक्रिया श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.

राहुल कनाल नाराज असल्याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. ते युवासेनेच्या कोअर कमिटीच्या व्हाट्सअॅप ग्रुपवरुन लेफ्ट झाले, अशी देखील माहिती समोर आली होती. संघटनेतील अंतर्गत कुरघोडींना कंटाळून ते व्हाट्सअॅप ग्रुपमधून बाहेर पडल्याची चर्चा होती.

हे सुद्धा वाचा

युवासेनेतले अमेल घोले, सिद्धेश कदम, समाधान सरवणकर यांनीही नाराजी व्यक्त करत युवासेना सोडली होती. त्यानंतर आता राहुल कनाल हे शिंदे गटासोबत जाणार असल्याच्या चर्चा समोर आल्या आहेत.

राहुल कनाल शिर्डी संस्थानचे विश्वस्त होते

महाविकास आघाडीचं सरकार असताना राहुल कनाल यांची शिर्डी संस्थानचे विश्वस्त म्हणून वर्णी लागली होती. या दरम्यान त्यांच्याशी संबंधित ठिकाणी आयकर विभागाने छापा टाकला होता. त्यानंतर ते राजकारणात फार सक्रिय नसल्याची चर्चा होती. पण नंतर ते वांद्रे पश्चिम विधानसभेसाठी तयारी करत असल्याची चर्चा समोर आलेली. आता ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील तर त्यांना विधानसभेच्या निवडणुकीचं तिकीट मिळतं का? ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले.
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले.
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'.
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा.
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?.
रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा
रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा.
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल.
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?.
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी.
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने.