VIDEO: मुंबईकरांना प्लाझ्मा देण्यासाठी युवा सेना धावली; वरळीत पहिली प्लाझ्मा वॉर रुम तयार
मुंबईत पहिल्या टप्प्यापेक्षा दुसऱ्या टप्प्यात कोरोना वेगाने वाढताना दिसत आहे. रुग्णांना बेड मिळत नाहीl, रेमडेसीविरची चणचण आहे. (yuva sena made first plasma war room in mumbai)
मुंबई: मुंबईत पहिल्या टप्प्यापेक्षा दुसऱ्या टप्प्यात कोरोना वेगाने वाढताना दिसत आहे. रुग्णांना बेड मिळत नाहीl, रेमडेसीविरची चणचण आहे. बेड्स, रेमडेसिवीरपासून ते प्लाझ्मासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना वणवण फिरावं लागत आहे. पण हे वेळेत मिळेल की नाही याचा काहीच भरवसा नाही. कोरोना रुग्णाना या काळात प्लाझ्मा सुद्धा जीवदान ठरत आहे, पण प्लाझ्माही सहजासहजी मिळत नाही. अशावेळी या रुग्णांना एक वॉररुम जीवदान ठरत आहे, वरळीत युवासेनेने प्लाझ्मा वॉर रुम तयार केली असून या वॉर रुममधून रुग्णांना मदतीचा हात दिला जात आहे. (yuva sena made first plasma war room in mumbai)
शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात ही वॉर रुम तयार करण्यात आली आहे. प्लाझ्मासाठीची ही राज्यातील पहिलीच वॉर रुम आहे. ज्या कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांना प्लाझ्मा हवा आहे, त्यांना युवा सेनेच्या या वॉर रुमच्या माध्यमातून प्लाझ्मा दिला जात आहे. सुरुवातीला जे कोरोना रुग्ण निगेटीव्ह झाले आहेत आणि ज्यांच्यात अँटीबॉडीज तयार झालेल्या आहेत त्यांना प्लाझ्मा देण्यास तयार केलं जातं. पण त्याची बॉडी स्क्रीनिग करुनच प्लाझ्मा काढला जातो. हे सगळं काम ही वॉररुम बघते. आतापर्यंत 30 जणांना प्लाझ्मा देऊन या वॉररुमने जीवदान दिल आहे, अशी माहिती युवासेना पदाधिकारी आकर्षिका पाटील यांनी दिली आहे.
बदलापूरपासून नालासोपाऱ्यापर्यंत सर्वांना मदत
रुग्णाच्या नातेवाईकांना कुठे जाऊ हे कळत नाही. कुणाला संपर्क करू हे कळत नाही. त्यासाठी ही वॉर रुम तयार केली आहे. वरळीत ही वॉर रुम असली तरी केवळ वरळी मतदारसंघापुरतं आमचं काम मर्यादित नाही. तर बदलापूर पासून ते नालासोपाऱ्यापर्यंत प्रत्येक अडलेल्या व्यक्तिला प्लाझ्मा देण्याचं काम आम्ही करत आहे. आमचा पहिला डोनर शुभम शिंदे हा 18 वर्षाचा तरुण आहे. त्याला आम्ही कन्विन्स केल्यानंतर त्याने प्लाझ्मा डोनेट केला, अशी माहितीही आकर्षिका पाटील यांनी दिली.
मुंबईत 5542 नवे कोरोना रुग्ण
दरम्यान, रविवारी दिवसभरात मुंबईत 5542 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. ही आकडेवारी एप्रिल महिन्यात दररोज आढळणाऱ्या रुग्णंख्येमधील सर्वांत कमी आहे. मुंबईत याआधी 31 मार्च या दिवशी 5394 नवे रुग्ण आढळले होते.
64 जणांचा मृत्यू
मुंबईमध्ये मागील काही दिवसांपूसन मृतांच्या संख्येतसुद्धा सातत्याने वाढ झाल्याचे नोंदवले गेले. आज मुंबईत एकूण 64 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. तसेच यापैकी 36 जण याआधीच कोणत्यातरी आजाराने ग्रस्त होते. ही माहिती मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. आजच्या एकूण मृतांमध्ये 28 महिलांचा समावेश असल्याचेसुद्धा मनपाने सांगितले. आजची आकडेवारी मिळून मुंबईमध्ये मृतांचा आकडा 12783 वर पोहोचला आहे. (yuva sena made first plasma war room in mumbai)
संबंधित बातम्या:
मुंबईला दीड लाख कोरोना लसींचा साठा मिळाला, पुढील 3 दिवस लसीकरणाचा मार्ग मोकळा
कोरोनाची दुसरी लाट ओसरतेय की हा लॉकडाऊनचा परिणाम ?, पाहा मुंबईतील आकडेवारी काय सांगते
(yuva sena made first plasma war room in mumbai)