AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिंहाच्या नव्हे उंदराच्या बिळाखाली येऊन दाखवलं, तुम्ही काय केलंत; राणेंच्या घरासमोर उभं राहून वरुण देसाईंचं ओपन चॅलेंज

Narayan Rane | भाजपचे कार्यकर्ते आमच्यावर दगडफेक करत आहेत. मात्र, पोलीस आमच्यावर लाठीमार करत आहेत. उद्धव ठाकरे आमचे दैवत आहेत. त्यांच्यासाठी आम्ही एक काय हजार लाठ्या खाऊ. भाजपच्या बांडगुळांना पळवून लावू, असे वरुण सरदेसाई यांनी म्हटले.

सिंहाच्या नव्हे उंदराच्या बिळाखाली येऊन दाखवलं, तुम्ही काय केलंत; राणेंच्या घरासमोर उभं राहून वरुण देसाईंचं ओपन चॅलेंज
वरुण सरदेसाई
| Edited By: | Updated on: Aug 24, 2021 | 12:12 PM
Share

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर मुंबईत युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार निदर्शने करण्यात आली. वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेचे कार्यकर्ते नारायण राणे (Narayan Rane) यांच्या जुहूतील निवासस्थानी जमले होते. यावेळी वरुण सरदेसाई यांनी आक्रमक शैलीत राणे कुटुंबीयांना आव्हान दिले. नितेश राणे यांनी आम्हाला इकडे येऊन दाखवा, असे आव्हान दिले होते. आम्ही उंदराच्या बिळासमोर आलो आहोत. पण त्यांनी काय केलं?, असा सवाल विचारत वरुण सरदेसाईंनी नितेश राणे यांना प्रतिआव्हान दिले.

भाजपचे कार्यकर्ते आमच्यावर दगडफेक करत आहेत. मात्र, पोलीस आमच्यावर लाठीमार करत आहेत. उद्धव ठाकरे आमचे दैवत आहेत. त्यांच्यासाठी आम्ही एक काय हजार लाठ्या खाऊ. भाजपच्या बांडगुळांना पळवून लावू, असे वरुण सरदेसाई यांनी म्हटले.

काय म्हणाले होते नितेश राणे?

नितेश राणे यांनी मंगळवारी सकाळी एक ट्विट केले होते. माझ्या कानावर आलेल्या माहितीनुसार, युवासेनेचे कार्यकर्ते आमच्या जुहू निवासस्थानाबाहेर जमणार आहेत. त्यामुळे एकतर मुंबई पोलिसांनी शिवसैनिकांना रोखावे. अन्यथा पुढे काय घडले त्यासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. सिंहाच्या हद्दीत पाऊल ठेवायची हिंमत करु नका. आम्ही तुमची वाट बघतोय, अशा शब्दांत नितेश राणे यांनी शिवसेनेला डिवचले होते.

नारायण राणेंच्या पुण्यातील मॉलवर शिवसैनिकांची दगडफेक

पुण्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयात कोंबड्या सोडल्या.  तसेच ‘नारायण राणे चोर है’, अशी घोषणाबाजी केली. याशिवाय, नारायण राणे यांच्या आर डेक्कन मॉलवरती शिवसैनिकांनी जोरदार दगडफेक केल्यामुळे याठिकाणी वातावरण चांगलेच तापले आहे. महिला शिवसैनिकांनी नारायण राणे यांच्या पोस्टरला जोडे मारले. नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांची माफी मागावी. अन्यथा नारायण राणे यांना पुण्यात फिरू देणार नाही, असे महिला शिवसैनिकांनी सांगितले. संबंधित बातम्या:

Varun Sardesai: कोण आहेत वरुण सरदेसाई ज्यांनी राणेंच्या विरोधात मुंबईत रणशिंग फुंकलंय? वाचा सविस्तर

मग त्यावेळेस मुख्यमंत्र्यांवर गुन्हा का दाखल झाला नाही? राणे म्हणतात, मी क्रिमिनल ऑफेन्स केलाच नाही

मोठी बातमी: शिवसैनिकांनी पुण्यातील भाजप कार्यालयात सोडल्या कोंबड्या

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.