जिल्हा परिषद शिक्षक | बदल्या करण्याची योग्य वेळ नाही, शिक्षकांची राज्य सरकारकडे मागणी
शिक्षकांनी आता होणाऱ्या बदल्यांना विरोध केला आहे. सध्या शैक्षणिक सत्र सुरु असल्यामुळे बदल्या करु नका. यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांना हे त्रासदायक ठरणार आहे, अशी त्यांची भूमिका आहे.
मुंबई : शिक्षकांनी आता होणाऱ्या बदल्यांना विरोध केला आहे. सध्या शैक्षणिक सत्र सुरु असल्यामुळे बदल्या करु नका. यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांना हे त्रासदायक ठरणार आहे. कारण शिकवण्याची घडी आणि समजून घेण्याची घडी बसत नाही. याचा बदल जेवढा परिणाम शिक्षकांवर चांगला होत नाही, तेवढाच वाईट परिणाम हा विद्यार्थ्यांवर होतो, यामुळे शैक्षणिक सत्र सुरु असताना, अचानकमध्ये करण्यात येणाऱ्या बदल्यांना आमचा विरोध असल्याचं, शिक्षकांनी म्हटलं आहे.
नवीन वर्षाच्या सुरुवातीला शिक्षक विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थी शिक्षकांना समजून घेत असतात, तितक्यात मध्येच अशी बदली झाली, तर निश्चितच याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होतो, म्हणून नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला, या बदल्या शैक्षणिक दर्जा खालावणाऱ्या ठरतील, असं शिक्षकांनी म्हटलं आहे.तर या बदल्या मे महिन्यात करा, अशी मागणी शिक्षकांनी सरकारकडे केली आहे.
तसेच नवीन वर्षी, जानेवारी आणि फ्रेब्रुवारी महिन्यात जिल्हा परिषद शिक्षक संवर्ग १ पदाच्या अंतर्गत बदल्या देखील होवू शकतात. पण या बदल्यांवरुन शिक्षकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येते आहे. यामागे देखील एक कारण आहे, कारण बदल्यांआधी या शिक्षकांना रिक्त गावांची यादी दाखवण्यात येणार नाही. अनेक शिक्षक रिक्त जागांची यादी पाहूनच बदलीचं ठिकाण ठरवतात.
संवर्ग १ च्या यादीत ५३ वर्ष वया पुढील असलेल्या शिक्षकांचा,तसेच दिव्यांगांचा देखील समावेश आहे. शिक्षक ज्यांचं वय ५३ आहे किंवा ते दिव्यांग आहेत, अशा शिक्षकांच्या यापूर्वी बदल्या होत नसत, पण यावेळेस त्यांचा देखील समावेश करण्यात आल्याने शिक्षकांमध्ये नाराजी आहे.
यात शहीद सैनिक पत्नी, गंभीर आजार असलेले शिक्षक, घटस्फोटीत, गंभीर आजारा अशांचा देखील यात समावेश आहे.पण या शिक्षकांची देखील बदली होणार आहे, आणि त्यांना देखील रिक्त याद्या दाखवल्या जाणार नसल्याचं सांगण्यात येत आहे. सरकारच्या या धोरणावर शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शालेय शिक्षण विभागाने सरकारवर अन्याय केल्याची भावना शिक्षकांमध्ये आहे. रिक्त जागा जाहीर करा, आणि बदल्या या मे महिन्यात करा, अशी मागणी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांनी केली आहे.