नाईटलाइफ कल्चर बदलले | बार, पब, परमिटरुम, रेस्टॅारंटसाठी आली नवीन नियमावली

राज्यात रात्रीचे कल्चर बदलले आहे. या बदललेल्या संस्कृतीवर समाजातील सुज्ञ नागरिकांकडून टीका केली जात आहे. यामुळे नागपूर पोलिसांनी बार, पब, परमिटरुम आणि रेस्टॅारंटसाठी नियमावली जाहीर केली आहे. यानुसार सर्वांसाठी वेळेची मर्यादाही घातली गेली आहे.

नाईटलाइफ कल्चर बदलले | बार, पब, परमिटरुम, रेस्टॅारंटसाठी आली नवीन नियमावली
वांद्रे येथे क्षुल्लक कारणातून क्लब कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये हाणामारी
Follow us
| Updated on: Apr 06, 2023 | 8:27 AM

सुनील ढगे, नागपूर : नाईट कल्चरसंदर्भात समाजातील सुज्ञ नागरिकांकडून नेहमी तक्ररी केले जाते. रात्रभर सुरु असणारा धांगडधिंगाविरोधात सामाजिक संघटनांकडून आवाजही उठवला जातो. समाजातील बदललेल्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली जाते. या सर्वांची दखल पोलिसांनी घेतली आहे. आता पोलिसांनी नाईट कल्चरसंदर्भात नवीन नियमावली जाहीर केली आहे. यामुळे सर्व काही तुम्हाला वेळेच्या मर्यादेत करावे लागणार आहे. वेळेची मर्यादा पाळली नाही तर पोलिसांकडून आता कारवाई केली जाणार आहे. यामुळे बार, पब, परमिटरुम, रेस्टॅारंटमध्ये जाताना नियमांचे पालन करा, अन्यथा कारवाईला समोरे जा, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

काय आहे नियमावली

नागपूर पोलिसांनी बार, पब, परमिटरुम आणि रेस्टॅारंटसाठी नियमावली जाहीर केली आहे. नव्या नियमानुसार नागपुरातील नाईटलाइफ कल्चरची वेळ बदलली आहे. नाईटलाइफ आता रात्री दीड वाजेपर्यंतच करता येणार आहे. रात्री दीड नंतर सेवा दिली तर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. बार, पब, परमिटरुम आणि रेस्टॅारंटसाठी ही नियमावली असणार आहे. तसेच २५ वर्षांखालील व्यक्तीला मद्य देण्यास मनाई करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

का केली नियमावली

मागील आठवड्यात नागपूरमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यानुसार नागपुरातील वर्धा रोडवरील नाईट क्लबच्या बाहेर मध्यरात्री एका मुलीने क्लबबाहेर प्रवेशासाठी धिंगाणा घातला. क्लबमध्ये प्रवेश न दिल्यास कपडे काढण्याची धमकी दिली. क्लबच्या बाऊन्सर्सने मुलीला समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु ती ऐकत नसल्याने पोलिसांना बोलवले गेले. परंतु पोलीस येण्यापूर्वी ती मुलगी घटनास्थलावरुन फरार झाली होती. या प्रकारनंतर नागपुरातून संतप्त प्रतिक्रिया आला. नागपूर शहरातील पब चर्चेत आले होते. यामुळे पोलिसांनी आता नियमावली केली आहे. तसेच शहरातील हुक्का पार्लरची चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहे.

ड्रग्जमुळे चर्चेत

गेल्या काही दिवसांपासून नागपूर शहर आणि परिसरात गुन्हेगारीच्या वाढत्या प्रमाणामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातय काही दिवसांपूर्वी ड्रग्ज प्रकरणी काही युवकांना पोलिसांनी अटक करण्यात आली होती. ड्रग्जप्रकरणी नागपूरमधील जरीपटका पोलिसांनी एका अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला अटक केली होती. नागपूर पोलिसांकडून काही दिवसापूर्वीच ड्रग्ज प्रकरणी काही तरुणांना ताब्यात घेतले होते. त्यावेळेपासून नागपूर शहरात ड्रग्ज येते कुठून असा सवाल जनसामान्यांमधून केला जात आहे. आता पुन्हा अभियांत्रिकीचा विद्यार्थी ड्रग्ज प्रकरणात सापडल्याने नागपूरसह परिसरात खळबळ उडाली आहे. या सर्व प्रकारामुळे शहरातील हुक्का पार्लरची चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहे.

मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.