Flowers Exhibition | नागपुरात रंगीबेरंगी फुलांची बाग फुलली!
गुलाबी थंडीत नागपूरकरांसाठी एक संधी चालून आली. रंगीबेरंगी फुलं पाहण्यासाठी कासारच्या पठारात जाण्याची गरज नाही. हिस्लाप कॉलेज परिसरात फुलांची प्रदर्शनी भरली आहे. आणखी काही दिवस ही प्रदर्शनी सुरू राहणार आहे.
नागपुरातील सिव्हिल लाईन्स येथील हिस्लाप कॉलेजच्या आवारात १८ वी पुष्पप्रदर्शनी भरली. या प्रदर्शनात देशी-विदेशी फुलांच्या रोपट्यांसह रानफुले, हायब्रीड रोपटे तसेच फुलांच्या विविध प्रजाती आहेत. पाहुयात या फुलांची एक झलक.