अत्यंविधीसाठी 75 हजार ठेवलेत… व्हॉट्सॲप स्टेट्स ठेवला… लग्नाचे कपडे घातले…. लग्नाच्या वाढदिवशीच दाम्पत्याने संपवलं जीवन

Couple Marriage Anniversary Tragedy : नागपूरात लग्नाच्या वाढदिवशी पती पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अंत्यविधीसाठी 75 हजार ही या दामप्त्याने बाजूला ठेवले. यामुळे नातेवाईक हळहळले आहेत.

अत्यंविधीसाठी 75 हजार ठेवलेत... व्हॉट्सॲप स्टेट्स ठेवला... लग्नाचे कपडे घातले.... लग्नाच्या वाढदिवशीच दाम्पत्याने संपवलं जीवन
लग्न वाढदिवशीच आत्महत्या
Follow us
| Updated on: Jan 07, 2025 | 4:57 PM

नागपूरात लग्नाच्या वाढदिवशी पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवून या दाम्पत्याने आत्महत्या केली. या दाम्पत्याने लग्नाच्या वाढदिवशी लग्नाचे कपडे परिधान केले. आर्थिक परिस्थितीमुळे दोघांनी आत्महत्या केली. परिस्थितीला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडिओ बनवून व्हॉट्सॲप स्टेटसवर ठेवला आणि त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. जारील ऊर्फ टोनी ऑस्कर मॉनक्रिप आणि पत्नी ॲनी जारील मॉनक्रिप अशी आत्महत्या केलेल्या दाम्पत्याची नावे आहेत.

दोघांचा प्रेमविवाह, पण यामुळे निराशा

टोनी आणि ॲनी जारील मॉनक्रिप असे या दाम्पत्याचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांनी प्रेमविवाह केला होता. दोघांचा पण संसार सुखी होता. पण त्यांना मुलेबाळं नव्हते. दोघांना आयुष्यात नैराश्य आले होते. दोघेही त्यामुळे मनाने खचले होते. कोरोनानंतर टोनीची नोकरी गेली. तेव्हापासून टोनी नैराश्यात गेला. गेल्या दोन वर्षांपासून टोनी कामाच्या शोधात होता. त्यातच मुलबाळं होत नसल्याने दोघे निराशेत गेले. दोघांचा एकमेकांना आधार होता.

हे सुद्धा वाचा

घटनेने सर्वांना धक्का

पती-पत्नी उदास राहत होते. मुलं नसल्याने त्याच विचारात ते असत. नातेवाईक त्यांची समजूत काढत होते. सर्वच बाजूनी निराश झाल्याने ते गेल्या दोन महिन्यांपासून निराशेच्या गर्तेत गेले. त्यांना जीवनात काहीच रस नसल्याचे वाटत होते. नातेवाईकांनी त्यांची अनेकदा समजूत घातली. दोन महिन्यांपासून दोघे आत्महत्येचा विचार करत होते.

ख्रिसमसनंतर दोघेही निराश होते. दोघांनीही लग्नाच्या वाढदिवशी आत्महत्या केली. लग्न वाढदिवशी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दोघांनी जेवणही केले नाही. सकाळपासून दोघांनी काहीही खाले नाही. अंत्यविधीसाठी घरात 75 हजार रुपये ठेवले. चिठ्ठीत आत्महत्या करण्याचे नमूद करत दोघांनी नातेवाईकांची माफी मागितली. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मार्टीननगरात ही दुर्दैवी घटना घडली.

नातेवाईकांना फोन करून केली विचारपूस

टोनी आणि ॲनीने सोमवारी रात्री नातेवाईकांना फोन केला. त्यांची विचारपूस केली. सर्व काही सुरळीत असल्याचे भासवले. पती-पत्नीने घरात दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. सकाळचे 10 वाजले तरी दोघेही बाहेर न दिसल्याने शेजाऱ्यांनी दरवाजा वाजवला. पण प्रतिसाद मिळाला नाही. खिडकीतून डोकावून पाहिले असता दोघेही गळफास लावलेल्या अवस्थेत दिसले.

'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.