Nagpur | 80 वर्षीय आजीची कर्करोगाशी झुंज, पाच मुलांनी सोडले वाऱ्यावर?; नातू करतो सेवा!

मुलांनी आपल्या जन्मदात्रीला कर्करोग झाल्याने दुर्लक्ष केले, असा आरोप राजेश बावनकुळे या आजीच्या नातवानं केला. मी माझ्या आजीची सेवा करत आहे. म्हणून मामा लोकांनी मलाच शिवीगाळ केल्याची तक्रार राजेशनं कुही पोलिसांत दिली आहे. पण, त्याच्या तक्रारीला पोलिसांनी केराची टोपली दाखविल्यानं राजेशशी पत्रकार परिषद घेतली.

Nagpur | 80 वर्षीय आजीची कर्करोगाशी झुंज, पाच मुलांनी सोडले वाऱ्यावर?; नातू करतो सेवा!
पत्रकार परिषदेत आजीची व्यथा सांगताना नातू.
Follow us
| Updated on: Dec 14, 2021 | 5:12 PM

नागपूर : प्रसव वेदनेने विव्हळत असतानाही, नवसृजनाच्या निर्मितीचा आनंद उपभोगनं, हा कोणत्याही स्त्रीच्या जीवनातील पारलौकिक असाच क्षण असतो. कुही येथील इंदिराबाई हटवार यांनी तर एक-दोन वेळा नव्हे तर सहा वेळा या सृजननिर्मितीचा आनंद उपभोगला. पाच मुले आणि एक मुलगी अश्‍या सहा अपत्यांना त्यांनी, प्रसव वेदना सहन करुन जगात आणले. मात्र याच अपत्यांनी वयाच्या 80 व्या वर्षी त्यांना कर्करोग झाल्याने वाऱ्यावर सोडून दिले.

अतिशय भयावह स्थितीमध्ये तिची आता मृत्यूसोबत झुंज सुरु आहे. धंतोली येथील जीवनछाया केअर सेंटरमध्ये सध्या तिची सुश्रृषा, तेथील कर्मचारी वर्ग करीत आहे. मात्र ज्यांना तिने जगात आणले, संगोपन केले. त्याच मुलांनी आपल्या जन्मदात्रीला कर्करोग झाल्याने दुर्लक्ष केले, असा आरोप राजेश बावनकुळे या आजीच्या नातवानं केला. मी माझ्या आजीची सेवा करत आहे. म्हणून मामा लोकांनी मलाच शिवीगाळ केल्याची तक्रार राजेशनं कुही पोलिसांत दिली आहे. पण, त्याच्या तक्रारीला पोलिसांनी केराची टोपली दाखविल्यानं राजेशनी पत्रकार परिषद घेतली.

आईचा सांभाळ करण्यासाठी लाटली शेती

अडीच वर्षांपूर्वी कुही तालुक्यातील पाचगावच्या इंदिराबाई यांना कंबरेला अतिशय घट्ट पातळ नेसत असल्यामुळे घाव झाला. त्यांनी दुर्लक्ष केलं. मग ती जखम चिघळत गेली. कर्करोगाने विळखा घातला. मरेपर्यंत आईचा सांभाळ करील असे लेखी हमीपत्र देणारा तिचा सर्वात लहान मुलगा अंकूश हटवार याने मात्र आईच्या वाट्याची एक एकर शेती घेतली. पण आईच्या वाट्याला आलेले दु:ख दूर करण्याचे कोणतेही प्रयत्न केले नाही.

उतार वयातील वेदना असह्य

उलट मुलांनी आईला घराच्या दूर एका खोलीत टाकून देण्यात आले. गेल्या अडीच वर्षांपासून ही आई, कंबरेवरची ही जीवघेणी जखम, त्यातून होणारी महाभयंकर वेदना एकटीने सहन करीत होती. मात्र नंतर तिला नैसर्गिक विधीसाठी देखील उठता येत नव्हते. जिने मायेच्या ओलाव्याने या पुत्राचे मल-मूत्र साफ केले. त्याला ओल्यातून कोरड्यात झोपवले. त्याने आपल्या आईला औषधोपचारही केले नाही. ती जखम कर्करोगात परिवर्तित होत गेली. आता त्या सहा अपत्यांच्या जन्मदात्रीकडे जगण्यासाठी नव्हे, तर या वेदनेतून सुटण्यासाठी, अवघे काहीच दिवस शिल्लक असल्याचे जीवनछाया केअर सेंटरमधील तज्ज्ञ सांगतात.

Nagpur ZP : दिव्यांग प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम, दोन हजार लाभार्थ्यांची तपासणी

MLC election | बावनकुळेंचे गडकरी वाड्यावर कांचनताईंकडून औक्षण; नितीनजींनी दिल्लीवरून केला अभिनंदनाचा फोन

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.