यातनांची मालिका, भावनांचा काहूर, 21 महिन्यांच्या संघर्षानंतर नागपुरात देशमुख कुटुंब भावूक

अनिल देशमुखांना जामीन मिळवून देण्यासाठी कुटुंबियांना वर्षभरात खूप खस्ता खाव्या लागल्या. या काळात कुटुंब कोणत्या मानसिक स्थितीतून जात असेल याची कल्पना देखील करता येणार नाही.

यातनांची मालिका, भावनांचा काहूर, 21 महिन्यांच्या संघर्षानंतर नागपुरात देशमुख कुटुंब भावूक
Follow us
| Updated on: Feb 11, 2023 | 9:32 PM

नागपूर : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आज तब्बल 21 महिन्यांनंतर नागपुरात (Nagpur) दाखल झाले. त्यांचं आज नागपुरात दाखल होणं हे त्यांच्या कुटुंबियांसाठी खूप विशेष आहे. कारण मधल्या काळात देशमुख कुटुंबावर खूप मोठं संकट आलं. घरातले कर्तेधर्ते आणि ज्येष्ठ असलेले अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले. या आरोपांमुळे त्यांना तब्बल 13 महिन्यांपेक्षा जास्त काळ जेलमध्ये राहावं लागलं. देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांना या काळात प्रचंड संघर्ष करावा लागला. त्यामुळे देशमुख आज नागपुरात आपल्या राहत्या घरी दाखल झाले तेव्हा त्यांचे कुटुंबीय भावूक झालेले बघायला मिळाले.

अनिल देशमुखांना जामीन मिळवून देण्यासाठी कुटुंबियांना वर्षभरात खूप खस्ता खाव्या लागल्या. या काळात कुटुंब कोणत्या मानसिक स्थितीतून जात असेल याची कल्पना देखील करता येणार नाही.

आता देशमुखांना जामीन मिळाला आहे. ते काही दिवसांपूर्वी जेलमधून सुटले. त्यांना सुरुवातीला मुंबईबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली होती. पण कोर्टाने नंतर त्यांची मुंबईबाहेर जाण्याची विनंती मान्य केली. त्यामुळे अनिल देशमुख आज नागपुरात दाखल झाले.

हे सुद्धा वाचा

अनिल देशमुख यांचं नागपुरात येण्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा हर्ष निर्माण झाला. देशमुख येणार असल्याची बातमी कळताच नागपुरातील कार्यकर्त्यांनी पेढे वाटायला सुरुवात केली. कार्यकर्त्यांनी देशमुखांच्या स्वागतासाठी जंगी तयारी केली आणि तितक्याच उत्साहात स्वागतही केलं.

अनिल देशमुख नागपूर विमानतळावर दाखल झाले तेव्हा ढोल-ताशांच्या गजरात त्यांचं स्वागत करण्यात आलं. देशमुखांच्या रॅलीसाठी कार्यकर्त्यांनी जिप्सी फुलांनी सजवली होती.

विशेष म्हणजे अनिल देशमुख त्यांच्या सिव्हिल लाईन येथील निवासस्थानाबाहेर आले तिथे देखील त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. देशमुख यांच्यावर क्रेनच्या साहाय्याने फुलांचा वर्षाव करण्यात आला. क्रेनच्या साहाय्याने भला मोठा हार अनिल देशमुख यांच्या गळ्यात घालण्यात आला.

यानंतर अनिल देशमुख जिप्सीतून खाली उतरले. त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यांच्या कुटुंबियांकडून त्यांचं घराबाहेर स्वागत करण्यास सुरुवात झाली तेव्हा देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय भावूक झाले.

देशमुखांच्या पत्नी आरती देशमुख या जास्त भावूक झाल्या. त्यांना अश्रू अनावर झाले. यावेळी देशमुख आपल्या नातवंडांनादेखील भेटले. देशमुख नातवंडांना जवळ घेऊन भावूक झाले.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.