आमदारांच्या बायकांचा सध्या एकच तगदा, विचारतात ‘हा’ प्रश्न; बच्चू कडू यांनी सांगितली आतली बात

आम्ही काम करून स्वत:च्या मेहनतीने लाथ मारू तिथे पाणी काढतो. त्यामुळे दुर्लक्ष करावं किंवा सोबत घ्यावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण दुर्लक्ष केलं म्हणजे आमचा पक्ष बुडणार असं नाहीये, असं माजी मंत्री, आमदार बच्चू कडू म्हणाले.

आमदारांच्या बायकांचा सध्या एकच तगदा, विचारतात 'हा' प्रश्न; बच्चू कडू यांनी सांगितली आतली बात
bacchu kadu Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 12, 2023 | 4:13 PM

अमरावती : वर्ष होऊन गेलं तरी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपचे आमदार मंत्रिपदाची आस लावून आहेत. दुसरीकडे आठ दिवस उलटूनही राष्ट्रवादीच्या उपमुख्यमंत्र्यांसह नऊ मंत्र्यांना खाते देण्यात आलेले नाही. त्यामुळे राष्ट्रवादीतही अस्वस्थता आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार फक्त आज होईल, उद्या होईल सांगून प्रत्येक दिवस ढकलला जात आहे. आमदारही मुख्यमंत्र्यांच्या फोनची वाट पाहत आहेत. मंत्रीपदाची आस लावून असलेल्या या आमदारांची माजी मंत्री बच्चू कडू यांनी खिल्ली उडवली आहे.

बरेचजण फोनची वाट पाहत आहेत. आम्ही त्या दिवशी बसलो होतो. दोन खासदार होते. तुला फोन आला का? असं ते एकमेकांना विचारत होते. एकजण खोटे बोलला, म्हणाला, मला फोन आला. त्यामुळे चार पाच खासदार दिल्लीला पळाले. त्याला फोन आला आणि आम्हाला का नाही आला? असा प्रश्न त्यांना पडला. जशी निकालाची आपण वाट पाहतो. तशीच आमदार फोनची वाट पाहत आहेत. प्रत्येकाला वाटतं मंत्री झालो पाहिजे. भरत गोगावले हे त्यापैकी एक आहे. चांगल्या कॉलची कुणीही वाट पाहतं. फोनची वाट पाहण्यात वाईट काय?, असा सवाल बच्चू कडू यांनी केला. ते मीडियाशी संवाद साधत होते.

हे सुद्धा वाचा

तुम्ही तर लई कष्ट केले ब्वा

मुख्यमंत्री फोन करतात की नाही करत? सर्वजण फोनची वाट पाहत आहेत. बऱ्याच जणांचा यज्ञ सुरू आहे. बायकोही विचारते. काहो फोन येणार आहे का तुम्हाले? मला नाही विचारलं. काही आमदारांना त्यांची बायको विचारत असेल. तुमचं काही जमत नाही का? तुम्ही तर लई कष्ट केले ब्वा. लै मेहनत केली. गुवाहाटीला गेले. तिकडे गेले. बदनाम झाले. फोन आला नाही तर कसं कराल? असं आमदाराची बायको आमदारांना विचारत आहे, अशी कोपरखळीही त्यांनी लगावली.

अनैसर्गिक युती

काँग्रेस फोडण्यापेक्षा येणारे स्वत: तयार आहेत. तलवार घेऊन थोडी येतात लोकं. राजकारणात नवीन पॅटर्न आला आहे. पूर्वी धोतर होतं. आता पँट आली. तसं हा पॅटर्न बदलणार आहे. सुरुवात उद्धव ठाकरे यानी केली. विचाराची अनैसर्गिक युती केली. त्याचा शेवट भाजप करत आहे. या पाच वर्षातील ही राजकारणातील मोठी उलाढाल आहे. ती लोकांना पचनी पडत नाहीये, असं चिमटा त्यांनी काढला.

ट्रेलर होता आता पिक्चर झाला

पक्षाला वाटतं भाजप असो कोणी असो. माझा पक्ष वाढला पाहिजे असं वाटतं. मी सत्तेत आलो पाहिजे. विचाराची सांगड आणि सत्ता दोन तिरावर गेल्या आहेत. पूर्वी एका काठावरून जात होते. सत्तापण सोबत जात होती. आता सत्ता आणि विचारात सांगड बसत नाहीये. त्यामुळे प्रत्येकजण आपलं आपलं पाऊल टाकत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन मुख्यमंत्री होऊ शकतो. आमची तर केंद्रात सत्ता आहे. आम्ही त्याही पेक्षा पॉवरफूल आहे, असं त्यांना वाटतंय. तो ट्रेलर होता आता पिक्चर झाला, असं ते म्हणाले.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.