Voting begins | भंडारा गोंदिया झेडपी निवडणूक, मतदानाला सुरुवात; विदर्भातील 38 नगरपंचायतींसाठी मतदान

भंडारा जिल्हा परिषदेच्या 5 जागांपैकी 39 जागांसाठी 345 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर गोंदिया जिल्हा परिषदेच्या 53 जागांपैकी 43 जागांसाठी 243 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. तसेच 38 नगरपंचायतीच्या 541 जागांसाठी 2332 उमेदवारांच्या भाग्याचा फैसला मशीनमध्ये बंद होणार आहे.

Voting begins | भंडारा गोंदिया झेडपी निवडणूक, मतदानाला सुरुवात; विदर्भातील 38 नगरपंचायतींसाठी मतदान
गोंदिया जिल्ह्यातील कोरनी मतदार केंद्रावर मतदान करताना मतदार.
Follow us
| Updated on: Dec 21, 2021 | 10:47 AM

नागपूर : विदर्भातील भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्हा परिषदेच्या जागांसाठी आज सकाळी साडेसात वाजता मतदानास सुरुवात झाली. थंडी असल्यानं सकाळी मतदान मतदानासाठी फारसे उत्सुक दिसले नाहीत. 11 वाजतानंतर मतदान मतदानासाठी घराबाहेर पडतील, असे चित्र आहे. शिवाय विदर्भातील 38 नगर पंचायतीच्या जागांसाठीही आज सायंकाळी साडेपाच वाजतापर्यंत मतदान होत आहे.

भंडाऱ्यात 345, तर गोंदियात 243 रिंगणात

भंडारा जिल्हा परिषदेच्या 5 जागांपैकी 39 जागांसाठी 345 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर गोंदिया जिल्हा परिषदेच्या 53 जागांपैकी 43 जागांसाठी 243 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. तसेच 38 नगरपंचायतीच्या 541 जागांसाठी 2332 उमेदवारांच्या भाग्याचा फैसला मशीनमध्ये बंद होणार आहे. गडचिरोलीत सर्वाधिक 9 नगरपंचायतीसाठी मतदान होत आहे. 554 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ओबीसी जागा वगळता ही निवडणूक होत आहे. ओबीसी जागांवरील आरक्षण संपुष्ठात आले आहे. आता 18 जानेवारी 2022 रोजी तेथे खुल्या प्रवर्गासाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळं 21 डिसेंबरला पहिला टप्पा तर 18 जानेवारीचा दुसरा टप्पा राहील. 19 जानेवारी रोजी मतमोजणी होईल.

विदर्भातील नगरपंचायतींसाठी मतदान

अमरावती जिल्ह्यात दोन नगरपंचायतीच्या 30 जागांसाठी 122 उमेदवार रिंगणार आहेत. भंडाऱ्यात तीन नगरपंचायतीच्या 39 जागांसाठी 167 उमेदवार आपले भाग्य आजमावत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात सहा नगरपंचायतीच्या 82 जागांसाठी 330 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गोंदिया जिल्ह्यात तीन नगरपंचायतीच्या 45 जागांसाठी 197 उमेदवार उभे राहणार आहेत. नागपूर जिल्ह्यात दोन नगरपंचायतीच्या 26 जागांसाठी 99 उमेदवार आपले भाग्य आजमावत आहेत. वर्धा जिल्ह्यात चार नगरपंचायतीच्या 54 जासांसाठी 233 उमेदवार निवडणुकीसाठी उभे आहेत. यवतमाळ जिल्ह्यात सहा नगरपंचायतीच्या 84 जागांसाठी 475 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. बुलडाणा दोन नगरपंचायतीच्या 26 जागांसाठी 95 उमेदवार रिंगणार आहेत. वाशीम जिल्ह्यात एका नगरपंचायतीच्या 13 जागांसाठी 59 उमेदवार निवडणुकीत आपले भाग्य आजमावत आहेत. या सर्व जागांसाठी मतदान सुरू आहे.

तिरंगी लढतीचे चित्र

भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. भंडारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 39 जागांसाठी मतदान होत आहे. गोंदियात जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 43 जागांसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरुद्ध राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल असा सामना आहे. नाना पटोले आणि प्रफुल्ल पटेल या दोन्ही नेत्यांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक आहे. दोन्ही जिल्ह्यात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीत तिरंगी लढतीचे चित्र आहे.

Nagpur | बालमित्र लग्नानंतर भेटला, नोकरीसाठी केली मदत, शारीरिक सुखाची मागणी आणि…

Feeling very cool | नागपूरकरांनाे काश्मीर, उटी, शिमल्याचा आनंद घ्या, पारा नीचांकी 7.8 डिग्रीवर

Nagpur Accident | दोन वर्षानंतर घराबाहेर पडला, शाळेत जाताना वाहनाने चिरडले; आठ वर्षीय बालकाचा घात झाला

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.