वाढदिवसाचा केक कापताना जपून… या तरुणाच्या बाबतीत जे घडलं ते तुमच्याही सोबत घडू शकतं

वर्ध्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. वाढदिवसाच्या दिवशी केक कापत असताना आगीचा भडका उडाल्याने एका मुलाच्या कानाला आणि नाकाला जखमा झाल्या आहेत. नशीब बलवत्तर म्हणजे या घटनेतून तो बालंबाल बचावला आहे.

वाढदिवसाचा केक कापताना जपून... या तरुणाच्या बाबतीत जे घडलं ते तुमच्याही सोबत घडू शकतं
Birthday Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 19, 2023 | 3:05 PM

वर्धा : अपघात आणि दुर्घटना या सांगून येत नसतात. कधी कोणती घटना घडेल याचा नेम नसतो. आणि अशा दुर्घटनेचे काय परिणाम होईल याचा अंदाजही नसतो. कधी कधी अशा दुर्घटना जीवावर बेतणाऱ्याही असतात. तर काही दुर्घटनेतून अनेकजण आश्चर्यकारकरित्या वाचलेले असतात. काही दुर्घटना या अचानक घडलेल्या असतात तर काही चुका या निव्वळ मानवी चुकांमुळे होत असतात. त्यामुळे प्रत्येकवेळी जपून राहणे हाच त्यावर एकमेव पर्याय आहे. दुर्घटना होऊ द्यायच्या नसतील तर सावधगिरी बाळगणं महत्त्वाचं आहे. वर्धा येथेही एका तरुणाला अशीच एक दुर्घटना अत्यंत महागात पडली आहे. नशीब बलवत्तर म्हणून तो या दुर्घटनेतून थोडक्यात बचावले.

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ वर्ध्यातील असल्याचं सांगितलं जातंय. या व्हिडीओत एक तरुण केक कापताना दिसत आहे. त्याचा वाढदिवस असल्याने तो प्रचंड खुशीत होता. त्याच्यासाठी केक आणलं होतं. केकवर मेणबत्या लावण्यात आल्या होत्या. तो केक कापणार होता. त्यापूर्वी त्याने अंगावर स्प्रे मारला अन् अचानक आगीचा भडका उडाला.

हे सुद्धा वाचा

ही आग मोठी होती. त्यामुळे या बर्थडे बॉयचं नाक आणि कान भाजलं. त्याच्या नाकाला आणि कानाला किरकोळ दुखापत झाली आहे. या घटनेनंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. पण जखमी अधिक गंभीर नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. केक कापत असताना स्प्रे मारल्यामुळे ठिणगी उडाल्याने भडका उडाल्याचं बोलल जातंय.

नेमकं काय घडलं?

हा मुलगा घराच्या बाहेर वाढदिवस साजरा करत असल्याचं दिसत आहे. बाहेर एक बाकडा ठेवण्यात आला होता. या बाकड्यावर एक दो नव्हे तर 8 केक ठेवण्यात आले होते. प्रत्येक केकवर मेणबत्या पेटवण्यात आल्या होत्या. यावेळी आजूबाजूचे लोक मोठ्या प्रमाणावर जमले होते. बच्चे कंपनीही मोठ्या प्रमाणावर होती. काही जण उभे होते, तर काही जण बसलेले होते. हा मुलगा वाढदिवसाचा केक कापण्यासाठी आला. त्यावेळी सर्वांनीच जल्लोष करत एकच कल्ला केला. त्यानंतर केक कापण्यासाठी त्याने हातात चाकू घेतला.

अन् स्प्रे मारण्यास सुरुवात

तितक्यात बाकड्यापासून थोड्या अंतरावर असलेल्या त्याच्या त्याच्या सात आठ मित्रांनी त्याच्या अंगावर स्प्रे मारण्यास सुरुवात केली. त्यामुळे तो केकजवळ मानखाली घालून उभाच राहिला. मित्रांचं स्प्रे मारणं सुरूच होतं. स्प्रेचा फव्वारा मोठा होता. त्याचा पेटलेल्या मेणबत्तीशी संपर्क आला आणि अचानक आग भडकली. या तरुणाच्या तोंडाला आग लागली. त्यामुळे तो एकदमच सैरभैर झाला आणि तात्काळ त्याने आग विझवली.

अचानक आग लागल्याने सर्वच घाबरून गेले. सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकली. आग लागताच पोरांनी पळ काढला. तर काही जणांनी तात्काळ बर्थडे बॉयकडे जाऊ त्याला सावरले आणि तात्काळ त्याला दवाखान्यात घेऊन गेले. त्यांच्या कानाला आणि नाकाला भाजल्याचं सांगितलं जात आहे. त्याचा चेहरा सुरक्षित असल्याचं सूत्रांनी सांगितलं. मात्र हा व्हिडीओ वर्ध्याचाच असल्याबाबतची पृष्टी होऊ शकली नाही.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.