सर्वात मोठी बातमी ! बेडूक कितीही फुगला तरी… भाजपच्या खासदाराची पहिल्यांदाच एकनाथ शिंदे यांच्यावर उघड उघड टीका
वारकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. कोणताही लाठीचार्ज झालेला नाही. खरं पाहिलं तर हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असताना गजानन महाराजच्या पालखी तेरा जणांचा अपघाती मृत्यू झाला होता. वारकऱ्यांकडून त्यावेळी रस्ता रोको करण्यात आला होता.
वाशिम : राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे अशी जाहिरात काल शिंदे गटाने वर्तमानपत्रांमध्ये दिली होती. या जाहिरातीतील मजकूर भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तुलना करण्यात आली आहे. तसेच एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत. बाकी कोणी नाही, असंही या जाहिरातीतून अप्रत्यक्षपणे सूचवून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्वही एकप्रकारे नाकारण्यात आलं आहे. त्यामुळे भाजप खासदार अनिल बोंडे यांनी थेट आणि उघडपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर उघडपणे टीका केली आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटात मोठी ठिणगी पडल्याचं दिसून येत आहे.
भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी मीडियाशी संवाद साधताना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच निशाणा साधला आहे. बेडूक किती फुकला तरी हत्ती बनत नाही, अशा शब्दात अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सर्व्हेच्या जाहिरातीवर कडवट प्रतिक्रिया व्यक्त केयली आहे. बोंडे यांनी एक प्रकारे शिंदे यांची बेडकाशीच तुलना केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शिंदे चांगले मुख्यमंत्री आहेत. मात्र त्यांना त्याच्या आजूबाजूलचे चुकीचे सल्ले देत आहे, असं सांगतानाच शिंदे यांना ठाणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र वाटायला लागलाय, असा हल्लाबोलही अनिल बोंडे यांनी केला आहे.
हा सर्व्हे कोणी केला?
देवेंद्र फडणवीस हे सर्व समाजासाठी काम करतात. ते एक भाजपमधील नेते आहेत. त्यांच नाव खेड्यापाड्यासह इतर ठिकाणी निघत असते. त्यामुळे हा सर्व्हे नेमका केला कोणी? तो ठाण्यापुरत मर्यादित होता का? की महाराष्ट्राचा होता? असा सवाल करतानाच पुढच्या काळात शिवसेनेला वाटचाल करायची असेल तर भाजप आणि जनतेच मन दुखून स्वतःला पुढे करून चालणार नाही. टिमकी वाजून सल्ले देणारे असतील तर त्यांचं कल्याण होणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
200 जागा निवडून येणार
यावेळी त्यांनी बच्चू कडू यांच्या विधानावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. एकनाथ शिंदे यांनी जो उठाव केला तो हिंदूवादावर केला आहे. ते स्वतः वारंवार सांगत आहेत. हिंदुसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा वर्ग मोठा आहे. त्यासाठी एकनाथ शिंदे यांनी हा उठाव केला आहे. देशभक्तीसाठी, महाराष्ट्र हितासाठी हा उठाव होता, असं सर्वजण मानतात. पण आता शिंदेंना लोकप्रियता वाढली असल्याचा समज झाला असेल तर त्यांचंच नुकसान होणार आहे, असं सांगतानाच ठाकरे सरकार पाच वर्ष राहिलं असतं तरी भाजपच्या 200 हून अधिक जागा निवडून आल्या असत्या. आता आमचं सरकार अडीच वर्ष राहणार असून आमच्या अजूनही 200च्यावर जागा निवडून येतील, असं ते म्हणाले.
खोट्या बातम्या पसरवल्या
खोट्या बातम्या पसरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची एक टीम आहे. खर म्हणजे आळंदीमध्ये गोधळ होऊ नये म्हणून नियम घालून दिला. प्रत्येक वारीमध्ये 75 लोक जातील. यात काही लोकांना घुसविले. जणीपूर्वक हुज्जत घातली, असा दावा त्यांनी केला.