सत्तेची ऑफर न स्वीकारण्या इतके शरद पवार कच्च्या गुरुचे चेले नाहीत; चंद्रकांत पाटलांचा पलटवार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना केंद्र सरकारने सत्ता स्थापन करण्याची ऑफर दिली होती, या राष्ट्रवादीच्या विधानावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. (chandrakant patil reaction on central government offer to ncp)

सत्तेची ऑफर न स्वीकारण्या इतके शरद पवार कच्च्या गुरुचे चेले नाहीत; चंद्रकांत पाटलांचा पलटवार
चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप
Follow us
| Updated on: Oct 13, 2021 | 11:48 AM

नागपूर: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना केंद्र सरकारने सत्ता स्थापन करण्याची ऑफर दिली होती, या राष्ट्रवादीच्या विधानावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. केंद्र सरकारने महाराष्ट्रात सत्तेची दिलेली ऑफर न स्वीकारण्या इतके शरद पवार कच्च्या गुरुचे चेले नाहीत, असा पलटवार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना हा पलटवार केला आहे. राष्ट्रवादीचं नाचता येईना अंगण वाकडे असं सध्या चालू आहे. तुम्ही आमच्याबरोबर सरकार बनवा अशी ऑफर केंद्राने पवार साहेबांना दिली होती तर ती ऑफर न स्वीकारण्या इतके पवार साहेब कच्च्या गुरूचे चेले नाहीत. केंद्रामध्ये सरकार असलेल्या पार्टीबरोबरच सत्ता स्थापन करण्याला त्यांनी प्राधान्य दिलं असतं. त्यामुळे आता सर्वसामान्य माणसाला हे काय म्हणतात त्याचे काय अर्थ होतात हे कळतं, असा टोला पाटील यांनी लगावला.

काही झालं तरी केंद्रावरच खापर

कोळश्याच्या टंचाईवरूनही त्यांनी आघाडी सरकारवर टीका केली. काही झालं तरी त्याचं खापर किंवा दोष केंद्राकडे देऊन मोकळे होतात. कोळसा कमी आहे, केंद्राने कोळसा दिला नाही, असं सांगितलं जात आहे. पण पावसामुळे कोळसा कमी मिळेल. कोळश्याचा स्टॉक करून ठेवा हे केंद्राने आधीच सांगितलं होतं हे ते सांगणार नाहीत. केंद्राच्या इशाऱ्यानंतरही कोळश्याचा साठा करण्यात कमी पडलो हेही ते सांगणार नाहीत, अशी टीका पाटील यांनी केली.

म्हणून फडणवीस म्हणाले…

मला मुख्यमंत्री असल्यासारखंच वाटतं असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसांच्या बोलण्याचा नेहमीप्रमाणे चुकीचा अर्थ लावला आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आजही जनता ते मुख्यमंत्री असल्यासारखीच अपेक्षा करते. जे त्यांना मराठवाड्याच्या दौऱ्यात जाणवलं. गावागावत लोक म्हणत होते, साहेब तुम्ही असायला हवे होते. यावरून त्यांना आजही मला लोकांमध्ये गेल्यावर मीच मुख्यमंत्री आहे असं वाटतं. कारण लोकांना उद्धव ठाकरेंकडून अपेक्षा नाहीये. ते बाहेर पडणार नाहीत हे त्यांनी गृहितच धरलंय. प्रत्येक वेळेला जीवाचा आकांत करून फडणवीसच फिल्डवर आहेत. त्यामुळे साहेब तुम्ही मुख्यमंत्री नसले तरी मुख्यमंत्रीच वाटता, असं लोकं म्हणत आहेत. त्या संदर्भानेच फडणवीसांनी ते विधान केलंय, असं पाटील म्हणाले.

संपर्क यात्रेत काय सांगणार?

आमची कोअर कमिटी आमची संघटना लोकशाही तत्वावर चालते. दरमहा आम्ही बसतो. काल आमचे प्रभारी आले होते सीटी रवी. त्यामुळे आमची चर्चा अधिक लांबली, असं त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क यात्रा काढणार आहे. त्यावरही त्यांनी टीका केली. आता त्यांच्यावर जनसंपर्क यात्रा काढण्याची वेळ आली आहे का? सत्ताधारी पक्षाने जनसंपर्क यात्रा काढावी? बरं हे जनसंपर्क यात्रेत काय सांगणार आहेत? पूरग्रस्तांना मदत दिली नाही हे सांगणार की कोव्हीडच्या काळात काहीच मदत केली नाही हे सांगणार?, असा सवालही त्यांनी केला.

काही तरी मिळवण्यासाठी नाराजी

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार नाराज असल्याची चर्चा आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. महाविकास आघाडीतील नाराजी काही तरी ताटात आणखी पाडून घेण्यासाठी असते. त्यामुळे त्यावरून काही तरी निष्कर्ष काढण्यात अर्थ नाही, असा टोला त्यांनी हाणला.

संबंधित बातम्या:

दसरा मेळावा साजरा करताना सरकारचे निर्बंध कुठे लपून बसतात, अमेय खोपकरांचा शिवसेनेवर घणाघात 

Sanjay Raut | जिल्हा परिषद निवडणुकीतील अपयशानंतर संजय राऊत अ‍ॅक्शन मोडमध्ये

VIDEO: हो… तुम्ही सांगायचे मी करायचे, आपला दसरा आपली परंपरा!!, पंकजा मुंडेंचं समर्थकांना दसऱ्याचं आवतन; व्हिडीओ व्हायरल

(chandrakant patil reaction on central government offer to ncp)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.