‘आव्हाड पागल झाले आहेत’, महाविकास आघाडीच्या बड्या नेत्याचीच सडकून टीका

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर सडकून टीका केलीय. "तो काय म्हणतो, त्याचं त्याला कळत नाही, तो भांबवला आहे. त्याच्यामुळे आम्ही त्याच्याबद्दल बोलत नाहीत. तो पागल सारखा झाला आहे", अशा खोचक शब्दांमध्ये विजय वडेट्टीवार यांनी टीका केली.

'आव्हाड पागल झाले आहेत', महाविकास आघाडीच्या बड्या नेत्याचीच सडकून टीका
jitendra awhad
Follow us
| Updated on: Dec 21, 2023 | 8:45 PM

चंद्रपूर | 21 डिसेंबर 2023 : सरकारकडून करण्यात आलेल्या निधी वाटपावरुन महाविकास आघाडीत नाराजीनाट्य असल्याची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना महत्त्वाचं आवाहन केलं होतं. कारण विरोधी पक्षातील काही मोजक्याच नेत्यांना निधी मिळाला आहे. त्यामुळे आव्हाड यांनी संताप व्यक्त केला. “विरोधी पक्षातील काही नेत्यांना श्रीखंड, तर काही नेत्यांना पिठलं-भाकरी मिळालं. काही ठरावीक मोठ्या नेत्यांनाच निधी मिळाला. 90 टक्के आमदारांना निधी मिळालाच नाही. विरोधी पक्षाच्या ज्या नेत्यांना निधी मिळाला त्यांनी तो घेऊ नये. एकत्रित राहायचं आहे, सर्वांनी एकसारखं राहायला हवं”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याबाबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी आव्हाडांवर सडकून टीका केली.

“तो काय म्हणतो, त्याचं त्याला कळत नाही, तो भांबवला आहे. त्याच्यामुळे आम्ही त्याच्याबद्दल बोलत नाहीत. तो पागल सारखा झाला आहे. काय बोलावं? आम्ही काही कुणाच्या दालनात जाऊन पैसे मागितले नाहीत. विजय वडेट्टीवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात आम्हाला थोडे-थोडे पैसे मिळाले. आम्हाला 26-27 कोटी मिळाले, जे मिळाले असतील ते. पण तसे पैसे जयंत पाटील यांनाही मिळाले. त्यांच्याबद्दल का नाही म्हणाले आव्हाड? जयंत पाटील, राजेश टोपे यांना मिळाले. आपल्या पक्षाच्या आमदारांवर करायला पाहिजेत ना आरोप, मग आमच्यावर का करतो?”, असे सवाल विजय वडेट्टीवार यांनी केले.

‘आव्हाडांनी राग तिकडे काढावा’

“आम्ही काही कुणाच्या दालनात जाऊन पैसे मागितले नाहीत. बाकीच्यांनी प्रस्ताव पाठवला, तसा आम्हीही प्रस्ताव पाठवला. त्यांना वाटलं विरोधी पक्षाला काही दिलं पाहिजे, नेत्यांना दिले पाहिजेत, ते दिले. पहिले देखील असंच व्हायचं. आम्ही मात्र थोडे दिलदार होतो, 5 कोटी दिले तर आम्ही इतरांना 2 कोटी द्यायचो. पण त्यांनी आता विरोधी आमदारांना निधी द्यायचाच नाही आणि समतोल विचाराच्या गोष्टी करायचा, हा त्यांचा ढोंगपणा आहे. त्यांच्या डोक्यात काय घुसलं आहे, ते मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या मतदारसंघाला लावून आव्हाडांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे त्यांचा राग आहे. तो राग तो आमच्यावर काढतो. त्यांनी तो राग तिकडे काढावा”, असं प्रत्युत्तर विजय वडेट्टीवार यांनी दिलं.

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.