Devendra Fadnavis: वसुली रॅकेटमुळे पोलिसांच्या बदल्या केल्या का?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल
Devendra Fadnavis: राज्याच्या गृहखात्याने मुंबई-ठाण्यातील काही पोलिसांच्या बदल्या केल्या. त्यानंतर लगेचच आज सकाळी या बदल्यांना स्थगिती दिली आहे.
नागपूर: राज्याच्या गृहखात्याने मुंबई-ठाण्यातील काही पोलिसांच्या बदल्या केल्या. त्यानंतर लगेचच आज सकाळी या बदल्यांना स्थगिती दिली आहे. त्यावरून आता राजकारण रंगताना दिसत आहे. या बदली प्रकरणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. वसुली रॅकेटमुळे अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राज्य सरकारने रात्री पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करून सकाळी त्याला स्थगिती दिल्याच्या प्रकरणावरून वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान, फडणवीस यांनी शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांच्या विदर्भ दौऱ्यावरही टीका केली आहे. विदर्भातील (vidarbha) माती आणि वातावरण चांगलं आहे. त्याचा गुण राऊतांना लागेल. त्यांनी वारंवार विदर्भात यावं, त्यांना सुबुद्धी सूचेल, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस हे मीडियाशी संवाद साधत होते. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश परत घेण्याचं काय कारण आहे हे समजलं पाहिजे. प्रशासकीय चुक झाली, की मागच्या वेळेस 10 डिपींचे बदली आदेश थांबवले. नंतरचा बदली घोटाळा सीबीआयच्या स्कॅनरमध्ये आहे. बदली घोटाळ्यात ते आलं. आताही तसा काही प्रकार आहे का? हे समजलं पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
म्हणून दोन समाज एकमेकांसमोर
यावेळी त्यांनी अचलपूर दंगलीवरून सरकारवर टीका केली. तसेच या प्रकरणी भाजपच्या शहराध्यक्षाला झालेल्या अटकेचाही त्यांनी निषेध नोंदवला. अमरावतीत इंग्रजांचं राज्य चालायचं तसं पोलीसांचं राज्य चाललंय. त्या ठिकाणी लांगूलचालन सरकारचे मंत्री करत आहेत. त्यातून परिस्थिती आणखी वाईट होत आहे. या लांगूलचालनमुळे दोन समाज एकमेकांपुढे उभे ठाकतायत. त्यामुळे आज जी परिस्थिती आहे. तिथे हिंदू समाजाला टार्गेट करण्याचं काम सुरु आहे म्हणून तणाव वाढतोय. पोलिसांनी हे थाबंवावं, असं आवाहन त्यांनी केलं.
पोलिसांची पोलखोल करू
महाविकास आघाडीची पोलखोल आम्ही रोज करतोय. ज्यांची पोलखोल होतेय ते अस्वस्थ आहेत. अस्वस्थ होऊन ते आमच्या रथावर हल्ले करतायत. त्यांनी कितीही हल्ले केले तरी आम्ही पोलखोल करणे थांबवणार नाही. पोलिसांनी त्यांना संरक्षण दिलं तर पोलीसांचीही आम्ही पोलखोल करू, असा इशाराही त्यांनी दिला.
संबंधित बातम्या:
Devendra Fadnavis: राऊतांनी वारंवार विदर्भात यावं, त्यांना सुबुद्धी सूचेल, देवेंद्र फडणवीसांचा चिमटा