Devendra Fadnavis: राऊतांनी वारंवार विदर्भात यावं, त्यांना सुबुद्धी सूचेल, देवेंद्र फडणवीसांचा चिमटा
Devendra Fadnavis: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांनी वारंवार विदर्भात यावं.
नागपूर: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांनी वारंवार विदर्भात यावं. विदर्भातील हवा चांगली आहे. त्यांना सुबुद्धी सुचेल, असा चिमटा देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. शिवसेना नेते संजय राऊत विदर्भ दौऱ्यावर जात आहेत. राऊत यांचा विदर्भातील तिसरा दौरा आहे. विदर्भात शिवसेना (shivsena) मजबूत करण्यासाठी शिवसेनेने सर्व लक्ष केंद्रीत केलं आहे. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही लवकरच विदर्भाच्या दौऱ्यावर येणार आहेत. शिवसेनेने थेट विदर्भावर लक्ष्य केंद्रीत केल्याने भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. त्यामुळे फडणवीस यांनी थेट राऊतांवर हल्ला चढवला आहे. त्यामुळे राऊत यांच्या विदर्भ दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना राऊतांवर हल्ला चढवला. नागपूरच्या मातीत, वातावरणात एक वेगळंपण आहे. ते नागपूरला आले तर त्यांना सुबुद्धी येईल, असा टोला फडणवीस यांनी लगावला. यावेळी त्यांनी पोलखोल यात्रेवर झालेल्या हल्ल्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कितीही हल्ले केले तरी पोलखोल थांबणार नाही. पोलिसांनी संरक्षण दिलं तर पोलिसांचीही पोलखोल केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.
वसुली रॅकेटमुळे बदल्या का?
काल काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. आज सकाळी या बदली आदेशांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यावरही फडणवीसांनी टीका केली. वसुली रॅकेटमुळे अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या का? त्याचं कारण समोर आलं पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
हिंदूंना टार्गेट केलं जातंय
अचलपूर दंगली प्रकरणी भाजपपच्या शहराध्यक्षांना अटक करण्यात आली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अमरावती राज्यात इंग्रजांचं राज्य चालायचं, तसं पोलिसांचं राज्य चाललं आहे. विशेषत: लांगूलचालन हे सरकारचे मंत्री करत आहेत. त्यामुळे परिस्थिती वाईट होत आहे. लांगूलचालनामुळे दोन समाज एकमेकांच्याविरोधात उभे राहत आहेत. हिंदुंना टार्गेट करण्याचं काम अमरावतीत होतंय. पोलिसांनी जात, धर्म न पाहता कारवाई केली पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.
आपवाले बकवास करतात
यावेळी त्यांनी आम आदमी पार्टीरवरही टीका केली. आम आदमी पार्टी काहीही म्हणतात त्यांना काही बेस नाही. ते बकवास करणारे आहेत. त्यांच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही, अशी टीका त्यांनी केली.
संबंधित बातम्या:
Nanded : बहारों फुल बरसाओ… लग्नसराईनं फुलांचाही रुबाब वाढला, कोरोनानंतर प्रथमच सुगीचे दिवस