काँग्रेसमध्ये ठिणगी, विजय वडेट्टीवार VS नाना पटोले वाद शिगेला, लहान-मोठा नेता कोण? संघर्ष पेटला

महाराष्ट्रा काँग्रेसमधील शीतयुद्ध पुन्हा चव्हाट्यावर आलं आहे. काँग्रेसचे दोन दिग्गज नेते यावेळी आमनेसामने आले आहेत. "विजय वडेट्टीवार फार मोठे नेते नाहीत की मी त्यांच्यावर इथे प्रतिक्रिया द्यावी", अशी खोचक प्रतिक्रिया नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांना दिली. नाना पटोले यांचे हे बोल विजय वडेट्टीवार यांच्या चांगल्याच जिव्हारी लागल्याचं दिसत आहे.

काँग्रेसमध्ये ठिणगी, विजय वडेट्टीवार VS नाना पटोले वाद शिगेला, लहान-मोठा नेता कोण? संघर्ष पेटला
vijay wadettiwar and nana patole
Follow us
| Updated on: May 09, 2023 | 9:22 PM

नागपूर : महाराष्ट्र काँग्रेसमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यातील संघर्ष स्पष्टपणे समोर आला आहे. नाना पटोले यांनी विजय वडेट्टीवार एवढे मोठे नेते नाहीत. त्यांचा बंद खोलीत निर्णय घेऊ, असं नाना पटोले म्हणाले. त्यांची ही टीका विजय वडेट्टीवार यांना चांगलीच जिव्हारी लागली आहे. विजय वडेट्टीवार यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आपण विधीमंडळात नाना पटोले यांना सीनियर आहोत. आपण पाचवेळा निवडून आलो आहोत. तसेच आपला निर्णय घेण्याइतपत कुणीही मोठं नाही, असं प्रत्युत्तर विजय वडेट्टीवार यांनी दिलं.

खरंतर या दोन बड्या नेत्यांमधील वाद हा चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत स्थानिक पातळीवर झालेल्या आघाडीमुळे सुरु झाला. नाना पटोले यांनी चंद्रपूर बाजार समितीत स्थानिक पातळीवर भाजपसोबत हातमिळवणी केल्याने जिल्हाध्यक्ष देवराळ भोंगळे यांच्याविरोधात कारवाई केली. पण देवराळ भोंगळे यांच्याविरोधात करण्यात आलेल्या कारवाईविरोधात काँग्रेसमधील एक गट आक्रमक झालाय.

देवराळ भोंगळे हे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या विश्वासातील नेते आहेत. त्यामुळे नाना पटोले यांनी केलेल्या कारवाईनंतर वडेट्टीवार यांच्या नागपुरातील घरी चंद्रपूरच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत नाना पटोले यांनी केलेल्या कारवाईविरोधात चर्चा झाली. संबंधित प्रकरणी दिल्ली हायकमांडला तक्रार करण्याची चर्चा झाली. या सर्व प्रकारानंतर विजय वडेट्टीवार यांनी नाना पटोले यांना नाव न घेता जीभेवर संयम ठेवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर वाद पुढे वाढत गेला.

हे सुद्धा वाचा

नाना पटोले यांची तिखट प्रतिक्रिया

“आमच्या सगळ्या नेत्यांनी आपल्या जीभेवर संयम ठेवावा. आघाडी मजबूत होईल, असे प्रयत्न करावेत. तोडण्याची भाषा कुणीही करु नये. उलट जोडण्याची भाषा करावी. शब्दाला आणि लिहिण्याला मर्यादा असाव्यात”, असं विजय वडेट्टीवार म्हणाले. त्यावर नाना पटोले यांनी पत्रकारानी प्रश्न विचारला तेव्हा “त्याचं आम्ही एका बंद खोलीत निर्णय घेऊ. वडेट्टीवार इतका मोठा नाही की त्याच्यासाठी मी इथे उत्तर दिलं पाहिजे”, अशी तिखट प्रतिक्रिया त्यांनी दिली.

विजय वडेट्टीवार यांची सविस्तर प्रतिक्रिया

नाना पटोले यांच्या तिखट प्रतिक्रियेला विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिलं. प्रदेशाध्यक्षांनी माहिती घेऊन संयमानं वक्तव्य करायला हवं होतं, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली. पटोले यांच्या नजरेत मी लहान असेल. पण जनतेच्या नजरेत मी मोठा आहे, असंही वडेट्टीवार म्हणाले.

“मला वाटतं त्यांचा काही गैरसमज झालेला असावा. आघाडी टिकवायची असेल तर सर्वांनी संयमाने बोलावं एवढीच माझी भूमिका होती. ती काही कोणा नेत्या संदर्भात नव्हती. त्यांनी माहिती घेऊन बोलणं अपेक्षित होतं. मला वाटतं ते कदाचित चुकले असावेत”, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

“राहिला विषय कोण मोठा, कोण छोटा, त्यांच्या नजरेत मी छोटा असेल. कारण ते मोठे नेते आहेत. मी पाचवेळा आमदार म्हणून निवडून आलेलो आहे. त्यांच्या नजरेत मी लहान असेल, पण जनतेच्या नजरेत मी मोठाच नेते आहे. जनतेनेच मला मोठं केलं आहे. कुणी मला छोटा म्हणत असेल तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे”, असंदेखील वडेट्टीवार म्हणाले.

नाना पटोले म्हणाले, ‘बंद खोलीमध्ये निर्णय घेऊ’, वडेट्टीवार म्हणतात…

“निर्णय कोण कोणाचा करायचा हे कोणी ठरवतात ते वेळ आल्यावर आम्ही उत्तर देऊ. माझा निर्णय करण्यासंदर्भात इतका मोठा कोणी नाही”, अशा शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं.

नाना पटोले यांना सुनावलं

“गैरसमजातून दरी वाढेल अशाप्रकारचं कृत्य जबाबदार नेत्यांनी करु नये, अशी माझी अपेक्षा आहे. वाद वाढवण्यापेक्षा संपवता कसा येईल, ही भूमिका नेत्याकडून अपेक्षित असते. मला ज्या भाषेत नाना बोलले त्या भाषेत मलाही बोलता येतं. पण मी तसं बोलणार नाही. मी आमदार असताना ते दूध संघाचे संचालक होते. त्यांच्यापेक्षा मी विधीमंडळात सीनियर आहे”, अशा शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी नाना पटोले यांना सुनावलं.

“त्यांना वाटत असेल तर बाबा मी लहानच आहे. कारण ज्याच्या अंगी मोठेपण त्याला यातना कठीण आहेत. आम्ही लहान आहोत, आम्हाला यातना लहान आहेत. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत”, असं शेवटी विजय वडेट्टीवार म्हणाले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.