Nagpur Court कागदोपत्री बनविले हिंदू मुलीला मुस्लीम, ती हिंदूच असल्याचा कोर्टाचा निर्वाळा, वाचा काय आहे प्रकरण?
तरुणानं तीचं कागदोपत्री धर्मपरिवर्तनही केलं. याची माहिती होताच ती जागी झाली. कोर्टात धाव घेतली. आता ती हिंदूच असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिला आहे.
नागपूर : अमरावतीतील एका तरुणानं घराशेजारी असलेल्या मैत्रिणीचा गैरफायदा घेतला. तिच्याकडून गोडीगुलाबीनं कागदपत्र मागून घेतले. तीनं माझ्याशी लग्न केलं आहे, असं प्रमाणपत्र तयार केलं. त्यानंतर तीचं कागदोपत्री धर्मपरिवर्तनही केलं. याची माहिती होताच ती जागी झाली. कोर्टात धाव घेतली. आता ती हिंदूच असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिला आहे.
लग्न झाल्याचं खोटं प्रमाणपत्र
आमीरची एका तरुणीशी मैत्री होती. त्यांचे ऐकमेकांच्या घरी जाणेयेणे होते. आमीरनं तिला लग्नाची मागणी घातली. तिने प्रस्ताव धुळकावला. तीनं त्याच्या घरी जाणेयेणे बंद केले. आमीरच्या बहिणीनं तिला विनंती केली. म्हणून तीनं माघार घेतली. 2012 मध्ये लायसन्स काढून देण्यासाठी तिच्याकडून काही कागदपत्र मागितले. तीनं रेशनकार्ड, छायाचित्र, महाविद्यालयाचे ओळखपत्र सारं काही दिलं. त्या कागदपत्राच्या आधारे आमीरनं तिच्याशी लग्न झाल्याचं खोटे प्रमाणपत्र मिळविले. तिच्या धर्मपरिवर्तनाचे प्रमाणपत्रही तयार केले.
तरुणीला कुटुंब न्यायालयाचा दिलासा
ही बाब तिच्या लक्षात आली. तेव्हा तिच्या पायाखालची वाळूच घसरली. कुटुंबीयांना तीनं ही माहिती दिली. आमीरविरुद्ध पोलिसांत तक्रार नोंदविली. आमीरचे त्रास वाढतच होते. शेवटी तीनं कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली. मी अविवाहित असून, लग्नाचे प्रमाणपत्र खोटे असल्याचं सांगितलं. 30 ऑगस्ट 2018 रोजी एक निर्णय देण्यात आला. त्यानुसार कुटुंब न्यायालयानं पीडितेला दिलासा दिला. या तरुणीचे आमीरसोबत लग्न झाले नाही. ती अविवाहित आहे, असे न्यायालयानं जाहीर केलं. त्या निर्णयाविरोधात आमीरनं उच्च न्यायालयात अपील दाखल केले. ते अपील उच्च न्यायालयानं फेटाळून लावलं. जुनाच निर्णय कायम ठेवला. उच्च न्यायालयात न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूपकर व गोविंद सानप यांनी हा निर्णय दिला. त्यामुळं तरुणीला दिलासा मिळाला.