हर घर दस्तक अभियान, दोन दिवसांत 15 हजारांवर लसीकरण, महापालिकेचा उपक्रम
नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला गती देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरात हर घर दस्तक अभियांन राबविले जात आहे. याअंतर्गत दहाही झोनमधील घर भेटीत आतापर्यंत पहिला आणि दुसरा असे एकूण 15 हजार 316 लसीकरणाचे डोस देण्यात आले आहेत. यात 18 वर्षावरील 9 हजार 640 नागरिकांना पहिला डोस तर 5676 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला. हर घर दस्तक […]
नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला गती देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरात हर घर दस्तक अभियांन राबविले जात आहे. याअंतर्गत दहाही झोनमधील घर भेटीत आतापर्यंत पहिला आणि दुसरा असे एकूण 15 हजार 316 लसीकरणाचे डोस देण्यात आले आहेत. यात 18 वर्षावरील 9 हजार 640 नागरिकांना पहिला डोस तर 5676 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला.
हर घर दस्तक मोहिमेअंतर्गत मनपा आरोग्य विभागाच्या चमूने मंगळवारी दहाही झोनमधील 37 हजार 327 घरी भेटी तर आतापर्यंत 85 हजार 593 घरी भेटी दिल्या. भेटीदरम्यान 18 वर्षावरील एकही डोस न घेतलेले 8919 नागरिक आढळून आले. यापैकी पात्र नागरिकांना लसीचा पहिला पहिला डोस देण्यात आला. आसीनगर झोनमध्ये सर्वाधिक 3326 नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला तर हनुमाननगर झोनमध्ये सर्वाधिक 2899 नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला.
या अभियानांतर्गत आरोग्य विभागाचे कर्मचारी प्रामुख्याने आशा वर्कर प्रत्येक नागरिकांच्या घरी भेटी देत आहेत. भेटीतून कुटुंबातील लसीकरण झाले किंवा नाही याबद्दल माहिती घेत आहेत. याशिवाय लसीकरणाचा टक्का कमी असलेल्या भागात शिबिरेदेखील आयोजित करण्यात येत आहेत. तसेच मोहिमेला गती देण्यासाठी आशा वर्कर, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्थाद्वारे नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व सांगून लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. त्यामुळे मोहिमेत शहरातील जास्तीत जास्त नागरीकांनी सहभागी होऊन लसीकरणासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.
शाळा, कॉलेज, धार्मिक स्थळांची तपासणी
नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी 4 प्रतिष्ठानांवर कारवाई करुन 31 हजारांचा दंड वसूल केला. पथकाने 33 मंगल कार्यालय, 19 मंदिरे, 11 मस्जिद, 32 शाळा व कॉलेज आणि अन्य 15 धार्मिक स्थळांची पाहणी करून एकूण 110 स्थळांची तपासणी केली. त्यांनी मनपाच्या लसीकरणाबद्दल नियमांची माहिती दिली. उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.
मास्कशिवाय फिरणाऱ्यांवर कारवाई
नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी बुधवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार 21 नागरिकांविरुध्द कारवाई केली. त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये 500 प्रमाणे 10 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही महिन्यात शोध पथकांनी 41,616 नागरिकांविरुध्द कारवाई करुन आतापर्यंत 1,91,67 हजारांचा दंड वसूल केला आहे.
नागपुरात सुरू होणार वैमानिक प्रशिक्षण, विभागीय आयुक्तांची माहिती
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी पुढे यावे, मनपाचे आवाहन : निवडणूक आयोगाद्वारे विशेष सवलत