कुठे देवदर्शनावरून येत होते, तर कुठे नवस फेडून येत होते, चालकाला डुलकी लागली अन्… एकाच दिवसात 4 अपघात

राज्यात चार वेगवगेळ्या ठिकाणी अपघात झाला आहे. या अपघातात दोनजणांचा मृत्यू झाला आहे. तर 30 जण जखमी झाले आहेत. काही ठिकाणी विचित्र अपघात झाले आहेत. मात्र, जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं सांगण्यात आलं.

कुठे देवदर्शनावरून येत होते, तर कुठे नवस फेडून येत होते, चालकाला डुलकी लागली अन्... एकाच दिवसात 4 अपघात
Road accidentImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 01, 2023 | 2:31 PM

नागपूर : राज्यात आज एकाच दिवसात चार अपघात झाले. या चार अपघातात दोनजण ठार झाले तर 30 जण जखमी झाले आहेत. कोणी देवदर्शनाला जात होते, तर कोणी देवदर्शनावरून येत असताना हा अपघात झाला. एका अपघातात चालकाला डुलकी लागली तर एका अपघातात बस, कार आणि बाईकची एकमेकांना धडक बसल्याने विचित्र अपघात झाला. एका अपघातात शिवशाही बसने एका पादचाऱ्याला उडवलं. तर चौथ्या अपघातात देवदर्शनावरून येणारी बस उलटल्याने अपघात झाला.

नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर यात्रेकरूच्या ट्रॅव्हल्सचा अपघात झाला. या अपघातात 10 प्रवासी जखमी झाले. नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग मरारवाडी जवळ ट्रॅव्हल्स चालकाला डुलकी लागल्याने अपघात झाला. ट्रॅव्हल्स रस्त्याच्या खाली उलटल्याने 10 प्रवाशी जखमी झाले आहेत. आज पहाटे 5 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. जबलपूरकडून नागपूरकडे देव दर्शनावरून येत असलेल्या ट्रॅव्हल्सला हा अपघात झाला. या ट्रॅव्हल्समध्ये जवळपास 35 ते 40 यात्रेकरू होते. अपघातातील जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र मनसर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. 5 जणांना नागपूर मेडिकल येथे रेफर करण्यात आले असून 5 जणांवर मनसर येथे प्रथमोपचार सुरू आहेत. इतर प्रवाशी सुखरूप असल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

अकोल्यात विचित्र अपघात

अकोला-नांदेड महामार्गावर वाशिम शहरातील इव्हेंटो हॉटेल जवळ स्कूल बस, कार आणि बाईकचा तिहेरी विचित्र अपघात झाला. या अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.. वाशिम शहर वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिकचा तपास सुरू आहे.

शिवशाही बसने एकाला उडवले

परभणी शहरातील रेल्वे स्थानकासमोर हिंगोली येथून परभणीकडे येणाऱ्या शिवशाही बसने दिलेल्या धडकेत एका पादचारी महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सकाळी 11च्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, मृत महिलेची ओळख अजून पटली नसून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून सदर महिलेच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात येत आहे.

नवस करून येताना बस पलटली

हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेल्या सैलानी बाबांच्या दरग्यावर नवसासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा बुलडाणा तालुक्यातील ढासाळवाडी जवळच्या वळणावर सकाळी 11 वाजताच्या सुमारास वाहन पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात जवळपास 20 भाविक जखमी झाले असून त्यांच्यावर बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जालना जिल्ह्यातील काठोरा बाजार येथील हे सर्व भाविक असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर महिला आणि बालकांचा समावेश आहे. जखमींना ढासाळवाडी येथील नागरिक तसेच पोलीस प्रशासनाने तात्काळ रुग्णालयात हलविले आहे. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.