राज्यपाल भगत सिंह कोश्यारी 3 दिवसीय नागपूर दौऱ्यावर, अनेक भेटीगाठींचं नियोजन

महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी 3 दिवसीय नागपूर दौऱ्यावर आहेत. ते आज (11 जून) नागपुरात दाखल झाले.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी 3 दिवसीय नागपूर दौऱ्यावर, अनेक भेटीगाठींचं नियोजन
Follow us
| Updated on: Jun 12, 2021 | 4:15 AM

नागपूर : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी 3 दिवसीय नागपूर दौऱ्यावर आहेत. ते आज (11 जून) नागपुरात दाखल झाले. नागपूर विमानतळावर नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांच्यास जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, पोलीस आयुक्त अमीतेश कुमार यांनी त्यांचं स्वागत केलं. भगत सिंह कोश्यारी 11 ते 14 जून दरम्यान 3 दिवस नागपूरमध्ये असतील. या काळात ते अनेक भेटीगाठी करणार असून कार्यक्रमांनाही उपस्थित राहणार आहेत (Governor Bhagat Singh Koshyari on 3 days Nagpur tour).

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी 3 दिवसीय दौऱ्यानंतर 14 जूनला पुन्हा मुंबईत परतणार आहेत. या काळात ते विविध शिष्टमंडळाच्या भेटीगाठी घेणार आहेत. तसेच विविध सामाजिक उपक्रमात सहभागी होणार आहेत. या दौऱ्याबाबत राज्यपाल कार्यालयानेही ट्विट करत माहिती दिली.

यात म्हटलं, “राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे तीन दिवसांच्या भेटीसाठी नागपूर येथे आगमन झाले. विमानतळावर नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, पोलीस आयुक्त अमीतेश कुमार यांनी राज्यपालांचे स्वागत केले.”

8 महिन्यानंतरही विधान परिषद सदस्यांची नियुक्ती नाही, मुख्यमंत्र्यांची मोदींकडे राज्यपालांची तक्रार

दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून वादाचा विषय ठरत असलेल्या राज्यपालनियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासमोर मांडण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महाराष्ट्र सदनात झालेल्या बैठकीत यासंदर्भात माहिती दिली.

बैठकीत आम्ही पंतप्रधान मोदी यांच्यासमोर राज्यपालनियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा मांडला. महाविकासआघाडी सरकार रीतसर सत्तेत आले आहे, आमच्याकडे पूर्ण बहुमत आहे. आम्ही प्रथेप्रमाणे मंत्रिमंडळात ठराव करून सदस्यांची नावे मंजूर केली आहेत. त्यानंतर राज्यपालांना आमदारांची यादीही पाठवण्यात आली. मात्र, 8 महिने उलटूनही त्यावर निर्णय झालेला नाही. तेव्हा पंतप्रधानांनी यामध्ये लक्ष घालावे, अशी विनंती आम्ही केल्याचे अजित पवार यांनी म्हटले.

राज्यपालनियुक्त सदस्यांच्या नियुक्तीवरुन उच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली आहे. आम्ही या सदस्यांच्या नियुक्तीसाठी आवश्यक असलेल्या नियमावलीतील सर्व गोष्टींची पूर्तता केली आहे, असे अजित पवार यांनी सांगितले. त्यामुळे आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी महाविकासआघाडी सरकारने दिलेल्या 12 आमदारांच्या यादीला हिरवा कंदील दाखवणार का, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

हेही वाचा :

आठ महिन्यानंतरही विधान परिषद सदस्यांची नियुक्ती नाही, मुख्यमंत्र्यांची मोदींकडे राज्यपालांची तक्रार

राजभवनातून 12 आमदारांची यादी गहाळ, गुन्हा दाखल करा; शिवसेना नेत्याची मागणी

राज्यपालांनी 12 आमदारांच्या फाईलवर सही केली तर पेढे वाटू, संजय राऊतांचा टोला

व्हिडीओ पाहा :

Governor Bhagat Singh Koshyari on 3 days Nagpur tour

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.