शरद पवार यांच्याशी माझा आजही फोनवर संपर्क, प्रफुल्ल पटेल यांचा मोठा दावा; पडद्यामागे काय घडतंय?

लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत आपण सन्मानाने जागा घेणार आहोत. काही जणांनी समजू नये की आज आमच्याकडे अमूक जागा नाही, म्हणजे उद्याही ती जागा आमच्याकडे राहणार नाही. असा गैरसमज करू नये, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.

शरद पवार यांच्याशी माझा आजही फोनवर संपर्क, प्रफुल्ल पटेल यांचा मोठा दावा; पडद्यामागे काय घडतंय?
praful patelImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 04, 2023 | 7:10 AM

अमरावती | 4 सप्टेंबर 2023 : राष्ट्रवादी पक्षात फूट पडून दोन गट निर्माण झाले आहेत. दोन गट निर्माण होऊनही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीगाठी होत असतात. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होत असते. इतकेच नव्हे तर शरद पवार यांच्याशी माझे आजही बोलणे होते. मी त्यांच्या संपर्कात आहे, असा गौप्यस्फोटच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पक्ष फुटलेला असताना राष्ट्रवादीचे नेते एकमेकांच्या संपर्कात असून ते कुणाला शह आणि काटशह देत आहेत? पडद्यामागे नेमकं चाललंय काय? राष्ट्रवादीच्या या खेळीचा अर्थ काय? असे सवाल या निमित्ताने केले जात आहेत.

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल अमरावतीत आले होते. यावेळी त्यांनी हे मोठं आणि धक्कादायक विधान केलं आहे. मागील वेळी अमरावतीला शरद पवार यांच्या सोबत आलो होतो. आज अजित पवार यांच्या सोबत आलो आहे. आमचा पक्ष बळकट करण्यासाठी मी आलो आहे. अनेकांच्या मनात संभ्रम आहे की खरंच मी इकडे आलो? की शरद पवार यांनी मला पाठवले का? शरद पवार साहेब यांच्या बदल असलेला आदर आजही कायम आहे. आणि पुढेही राहील. शरद पवार माझे नेते होते आणि पुढेही राहतील, असं प्रपुल्ल पटेल यांनी सांगितलं.

शरद पवारांशी कौटुंबीक संबंध

शरद पवार यांनी मला1978 साली बोलवून घेतलं होतं. तेव्हापासून मी त्यांच्यासोबत आहे. त्यांचे आणि माझे आजही घरगुती संबंध आहेत. माझे आणि शरद पवार यांचे आजही फोनवर बोलणे होत असते, असा गौप्यस्फोट प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. पटेल यांनी हा गौप्यस्फोट करून एकप्रकारे भाजपलाच इशारा दिला असल्याचं सांगितलं जात आहे.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्रीपद घ्यायला हवे होते

2019 मध्ये राष्ट्रवादीला 54 आणि काँग्रेसला 44 जागा मिळाल्या होत्या. तेव्हा मुख्यमंत्रीपद आपण घ्यायला हवे होते. मागच्यावेळीही आपल्या शिवसेनेपेक्षा फक्त दोन जागा कमी होत्या. सत्तेसाठी आपण शिवसेनेसोबत गेलो. आपण संधी साधली आणि राज्याच्या विकासासाठी निर्णय घेतला होता, असं ते म्हणाले.

आम्हालाही कायद्याचा अभ्यास

आम्हालाही कायद्याचा अभ्यास आहे. जेव्हा निकाल येईल तो आमच्या बाजूने लागेल. पक्ष आम्हाला मिळेल. चिन्ह आम्हाला मिळेल. त्यांना नवीन पक्ष काढावा लागेल. अजित पवार कुठल्याही बाबतीत तडजोड करणारा माणूस नाही, असंही त्यांनी सांगितलं. त्यांच्या या विधानावरही तर्कवितर्क लढवले जात आहेत. काही जणांना वाटत हे तीन चाकी सरकार आहे. पण हे सरकार व्यवस्थित चालेल, असा दावाही त्यांनी केला.

राजकीय पोळी शेकू नका

मराठा समाजांच्या आरक्षणावर काहीजण आपली राजकिय पोळी शेकत आहेत. सगळ्यांची भूमिका स्पष्ट आहे. कायद्याच्या कचाट्यात आरक्षण अडकलं आहे. पण यासाठी सर्वांनी एकत्र यायला पाहिजे. आंदोलकांवर लाठीमार झाला. ज्यांनी चूक केली असेल त्यांच्यावर कारवाई करा. आता राजकारण करायला काल सगळेल लोक जालन्यात गेले. जायला काही हरकत नाही, असंही ते म्हणाले.

हे कसलं इंडिया?

यावेळी त्यांनी इंडिया आघाडीवरही टीका केली. कसलं इंडिया? कोण एकत्र आहे? त्यात पहिल्या मिटिंगला मी गेलो होतो. फक्त त्यात फोटो निघतात. जेवण करते गप्पा गोष्टी करतात आणि परत जातात. त्यांच्यात लोगोवरून मतभेद झाले म्हणून त्याचे अनावरण झाले नाही. हे एकत्र किती दिवस टिकतील हे काळच तुम्हाला सांगेल, असं हल्लाही त्यांनी चढवला.

राहुल गांधींना का उतरवत नाही

इंडिया आघाडीने ठराव घेतला जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे एकत्र लढायचं. जनतेने आधी मोदींना निवडून आणायचे ठरवले आहे. आम्ही पण विरोधात असताना पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात बोललो. नरेंद्र मोदी यांच्या विरोधात राहुल गांधी यांना का निवडणुकीत उतरवत नाही? असा सवाल त्यांनी केला.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.