मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावरील ईडीच्या कारवाईनंतर Fadnavis पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, मोदींच्या राज्यात…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तेवर ईडीने कारवाई केली आहे. या कारवाईनंतर शिवसेनेतून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. तर भाजपने कारवाईचं समर्थन केलं आहे.
नागपूर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्या मालमत्तेवर ईडीने कारवाई केली आहे. या कारवाईनंतर शिवसेनेतून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. तर भाजपने कारवाईचं समर्थन केलं आहे. मात्र, या कारवाईला 24 तास उलटून गेल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कॅमेऱ्यासमोर पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मोदी हे कधीच सूडाचं राजकारण करत नाहीत. त्यांच्या राज्यात तरी कोणतीही सेंट्रल एजन्सी सूडाच्या भावनेने राजकारण करत नाही. पण दरेकरांवर कशी कारवाई सुरू आहे. नसलेल्या गोष्टी कशा तयार होत आहेत. आमच्या सर्वांविरोधात यांचे वकील मंत्र्यांसोबत बसून कसे षडयंत्र करत आहेत या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत. त्या या नेत्यांनी पाहाव्यात. पण मला असं वाटतं केंद्र सरकार असेल अथवा राज्य सरकार असेल, कुणीही चुकीची कारवाई करू नये. कारवाई योग्यच झाली पाहिजे. पुन्हा एकदा विश्वासाने सांगतो, मोदींच्या राज्यात चुकीची कारवाई होऊच शकत नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.
मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्याची मालमत्ता जप्त
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तांवर काल ईडीने कारवाई केली आहे. ईडीने पुष्पक बुलियनमधील पुष्पक ग्रुप कंपनीची 6.45 कोटीची मालमत्ता जप्त केली आहे. निलांबरी प्रकल्पातील या 11 निवासी फ्लॅट जप्त करण्यात आले आहेत. श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे हे फ्लॅट्स आहेत. श्रीधर माधव पाटणकर हे या कंपनीचे मालक आहेत. पीएमएलए कायदा 2002 अंतर्गत 6 मार्च 2017पासून पुष्पक बुलियन आणि ग्रुप कंपनीजवर मनी लॉन्ड्रिंगची केस सुरू आहे. यापूर्वीही ईडीने पुष्पक बुलिनय कंपनीतील महेश पटेल, चंद्रकांत पटेल आणि त्यांच्या कुटुंबातील 21.46 कोटीची संपत्ती जप्पत केली आहे.
महाराष्ट्र झुकणार नाही
दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी या कारवाईनंतर केंद्र सरकारवर टीका केली होती. श्रीधर पाटणकर हे आमच्या कुटुंबातील सदस्य आहे. ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा रश्मी ठाकरेपर्यंत मर्यादित नाहीत. ते आमच्या सर्वांच्या कुटुंबाशी संबंधित आहेत. ईडीने त्यांच्यावर कारवाई केल्याची माहिती मिळाली आहे. झारखंड, तामिळनाडू, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात या ठिकाणीच जोरदार कारवाई सुरू आहे. गुजरात आणि इतर राज्यात ईडीने कार्यालय बंद केलेत वाटतं. गुजरातमध्ये सर्वात मोठा शिपयार्ड घोटाळा बाहेर आला. आतापर्यंत एकाही आरोपीला शिपयार्ड घोटाळ्यात अटक झाली नाही. त्यांची चौकशी झाली नाही. अभिषेक बॅनर्जी आणि त्यांच्या पत्नीलाही त्रासा दिला जात आहे. पण बंगाल आणि महाराष्ट्र झुकणार नाही, असा राऊत यांनी दिला होता.
संबंधित बातम्या:
कोण आहेत श्रीधर पाटणकर ज्यांची ठाण्यातली संपत्ती ED ने जप्त केलीय? मुख्यमंत्र्यांचे थेट नातलग?