प्रदेशाध्यक्षपद किंवा राज्यसभा घ्या, पण आमच्याकडे या; आशिष देशमुख यांना कोणी दिली एवढी मोठी ऑफर?

माजी आमदार आशिष देशमुख यांना काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. त्यामुळे ते कोणत्या पक्षात जाणार याची चर्चा रंगली आहे. देशमुख भाजपमध्ये जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, त्याबाबत त्यांनी अजून तसा विचार केलेला नाही.

प्रदेशाध्यक्षपद किंवा राज्यसभा घ्या, पण आमच्याकडे या; आशिष देशमुख यांना कोणी दिली एवढी मोठी ऑफर?
ashish deshmukhImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 30, 2023 | 12:51 PM

नागपूर : पक्षशिस्त मोडल्यामुळे काँग्रेसने आशिष देशमुख यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. त्यामुळे देशमुख कोणत्या पक्षात जाणार? अशी चर्चा रंगली आहे. आशिष देशमुख भाजपमध्ये जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे. मात्र, आज आठ दिवस झाले तरी त्याबाबतच्या कोणत्याच हालचाली होताना दिसत नाहीये. अशावेळी आशिष देशमुख यांना एक मोठी ऑफर आली आहे. एका बड्या राजकीय पक्षाने देशमुख यांना थेट पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद किंवा राज्यसभा स्वीकारण्याची ऑफर केली आहे. आमच्याकडे आला तर या दोन्ही पदांपैकी कोणतंही पद घ्या, असं या पक्षाने देशमुख यांना म्हटलं आहे. त्यामुळे देशमुख ही ऑफर स्वीकारणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी राव यांनी थेट आशिष देशमुख यांना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष पद किंवा राज्यसभा देण्याची ऑफर केसी राव यांनी दिली आहे. केसी राव यांनी देशमुख यांना भेटण्यासाठी बोलावलंही होतं. त्यामुळे देशमुख काल तेलंगणात गेले होते. काल दिवसभर ते केसी राव यांच्यासोबत होते. मला पक्षातून निलंबित करण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मला बोलावून घेतल्याचं आशिष देशमुख यांनीच सांगितलं.

हे सुद्धा वाचा

वडिलाांचा विचार घेईन

राव यांनी प्रदेशाध्यक्ष आणि राज्यसभा या दोन्ही पदाची ऑफर दिली आहे. पण मी अजून कोणताही विचार केलेला नाही. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी मी आधी माझ्या वडिलांचा आणि माझ्या कार्यकर्त्यांचा विचार घेईन. त्यानंतरच पुढे काय करायचं याची दिशा ठरवेल, असं देशमुख म्हणाले.

भाजप नेते ही भेटले

भाजपचे नेते सुद्धा माझ्या घरी येऊन मला भेटले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी सुद्धा माझी भेट झाली. माझ्या परिवारातील संबंध असल्याने मी भेटत असतो किंवा ते मला भेटत असतात. मात्र अजून मी कुठलाही विचार केलेला नाही. योग्य वेळी विचार करणार आणि नंतर कळविणार, असं त्यांनी स्पष्ट केले.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.