Buldhana Bus Accident : अपघातातील जखमी आणि मृतांची यादी; नोकरीच्या शोधात निघाला तो परत आलाच नाही

बुलढाणा येथे मध्यरात्री भीषण अपघात झाला. या अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. बस पेटल्याने प्रवासी बसमध्येच होरपळले. यात स्त्रियांचा सर्वाधिक समावेश होता.

Buldhana Bus Accident : अपघातातील जखमी आणि मृतांची यादी; नोकरीच्या शोधात निघाला तो परत आलाच नाही
accidentImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 01, 2023 | 2:25 PM

स्वप्नील उमप, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, बुलढाणा : बुलढाण्यातील समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर आठ प्रवासी जखमी झाले आहेत. बसने पेट घेतल्याने या 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या अपघातातील जखमी आणि मृतांची यादी आली आहे. या अपघातात स्त्रिया आणि मुलेही दगावली आहेत. दगावणाऱ्यांमध्ये एका प्राध्यापकाचाही समावेश आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघातस्थळाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली आहे.

अपघातातील मृतांची नावे

निखिल पाथे (यवतमाळ) सृजन सोनोने (यवतमाळ) कैलास गंगावणे (शिरूर, पुणे) कांचन गंगावणे (शिरूर, पुणे) सई गंगावणे (शिरूर, पुणे)

हे सुद्धा वाचा

अपघातग्रस्तांची नावे

अवंती पोहनीकर, वर्धा संजीवनी गोटे, हिंगणघाट प्रथमेश खोडे, वर्धा श्रेया वंजारी, वर्धा राधिका खडसे, वर्धा तेजस पोकळे, वर्धा तनिषा तायडे, वर्धा शोभा वनकर, वर्धा वृषाली वनकर, वर्धा ओवी वनकर, वर्धा करण बुधबावरे, सेलू राजेश्री गांडोळे, आर्वी

मुलीला नागपूरला सोडून आले अन्…

या अपघातात निरगुडसर येथील गंगावणे कुटुंबीयांतील तिघांचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे संपूर्ण निरगुडसर गावावर शोककळा पसरली आहे. या अपघातात प्राध्यापक कैलास गंगावणे (वय 48 ), त्यांची पत्नी कांचन गंगावणे (वय 38) आणि मुलगी सई गंगावणे (वय 20) या तिघांचाही या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. पहाटे पहाटेच ही बातमी आल्याने गंगावणे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. मुळचे शिरूर येथील हे कुटुंब नोकरीच्या निमित्ताने निरगुडसर येथे राहत होते. निरगुडसर येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयात कैलास गंगावणे गेली 27 वर्ष प्राध्यापक म्हणून काम करत होते. गंगावणे यांच्या अपघाती निधनामुळे विद्यालयावर शोककळा पसरली आहे.

नागपूरहून पुण्याच्या दिशेने गंगावणे कुटुंब प्रवासासाठी विदर्भ ट्रॅव्हल्स बसने निघाले होते. गंगावणे कुटुंबीयांच्या मुलाला नागपूरमधील विधी महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता. त्याला महाविद्यालयात सोडून हे कुटुंबीय परतीच्या दिशेने निघाले होते. त्याच वेळेस त्यांच्यावर काळाने घाला घातला. सई गंगावणे ही अतिशय हुशार विद्यार्थीनी होती. तिला तिच्या गुणवत्तेवर आयुर्वेदिक महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळाला होता आणि ती वैद्यकीय शिक्षणाची विद्यार्थिनी होती. या तिघांचाही फोन लागत नसल्याची बाब लक्षात आली. त्यानंतर बसच्या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर कैलास गंगावणे यांचे मेव्हणे अमर काळे यांनी शोध सुरू केला.

accident list

accident list

गंगावणे कुटुंबीयांनी या अपघाताबाबत बुलढाण्याच्या पोलीस अधिक्षकांची संपर्क साधून तातडीने माहिती घेतली. नागपूरहून पुण्याकडे निघालेल्या प्रवाशांच्या यादीमध्ये या तिघांचेही नाव असून त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन अपघातस्थळी असल्याने हे तिघे या बसमधून प्रवास करत होते, अशा निष्कर्षाप्रत पोलीस आलेले आहेत. अपघाताच्या बातमीने निरगुडसर गावासह परिसरात शोककळा पसरली असून विद्यार्थ्यांचे अश्रुंचे अक्षरक्ष बांध फुटले आहेत. शोकसंदेश व्यक्त करुन विद्यालयास सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

कामाच्या शोधात जाताना मृत्यू

या अपघातात निखिल पाथे या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तो यवतमाळ जिल्ह्यातील बाबुळगाव तालुक्यातील गोंधळी या गावाचा रहिवासी आहे. तो कामाच्या शोधत पुण्याला जात होता, असे त्याचा भाऊ हर्षद याने सांगितले आहे. यवतमाळ जिल्ह्यातीलच वैशाली नगरातील सृजन सोनोने याचाही या अपघातात मृत्यू झाला आहे.

मुख्यमंत्री घटनास्थळी

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी जाऊन पोलिसांकडून अपघाताचा आढावा घेतला. तसेच जखमींची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. मृतांच्या कुटुंबीयांचेही सांत्वने केले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधला. समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांचा तज्ज्ञाकडून अभ्यास केला जाईल. त्यावर उपाययोजना करणार आहे, असं शिंदे यांनी सांगितलं.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.