Love Attack एकीशी संबंध, दुसरीशी घरोबा, लग्नानंतर आले विघ्न

लग्नापूर्वी सागरनं एका तरुणीसोबत संबंध ठेवले होते. ती त्याच्या लग्नानंतर बेलतरोडी पोलीस ठाण्यात पोहचली. गेली चार वर्षे सागरनं माझं लैंगिक शोषण केलं, असं आता तीचं म्हणणंय.

Love Attack एकीशी संबंध, दुसरीशी घरोबा, लग्नानंतर आले विघ्न
प्रेमाची अनोखी कहानी
Follow us
| Updated on: Dec 03, 2021 | 12:39 PM

नागपूर : ही गोष्ट आहे एका अभियंत्याची. सागर सदाफल (वय 30) असं त्याच नाव. मनीषनगरातला राहणारा. सागरचं लग्न धुमधडाक्यात पार पडलं. पण, या त्याच्या नव्या संसारात दुसरचं अघटित घडलं.

लग्नापूर्वी सागरनं एका तरुणीसोबत संबंध ठेवले होते. ती त्याच्या लग्नानंतर बेलतरोडी पोलीस ठाण्यात पोहचली. गेली चार वर्षे सागरनं माझं लैंगिक शोषण केलं, असं आता तीचं म्हणणंय.

लग्नापूर्वीच केली मौजमजा

एक मार्च 2018 पासून तो माझ्या संपर्कात होता. त्यानं लग्नाचं आमिष दाखविलं म्हणून मी त्याच्यासोबत वाहवत गेली. आम्ही लग्नापूर्वीच मौजमजा केली. पण, सागरनं मला 30 मार्च 2021 पासून टाळणं सुरू केलं. त्यानं दिलेल्या आणाभाकांची त्याला आठवण करून दिली. मात्र, तो काही ऐकेचिना. म्हणून मला पोलिसांचा दट्ट्या आणावा लागला, असं तीचं म्हणणंय.

पोलिसांनी ठोकल्या बेळ्या

होय, आधी एकीशी मौजमजा केली आणि आता दुसरीशी लग्न केलं, हे सागरला मान्य करावं लागलं. पोलिसांनी सागरला बेळ्या ठोकल्या. म्हणून मौजमजा करताना आपण तारुण्यात वाहवत तर जाणार नाही ना याची खबरदारी घेणं आवश्यक आहे. हेरणारे सावज ओळखले पाहिजे.

कचरा फेकण्यावरून दोघींमध्ये फ्रिस्टाईल

दुसऱ्या एका घटनेत, विनोबा भावेनगरात दोन महिलांमध्ये कचरा फेकण्यावरून वाद झाला. गीता बारापात्रे व नाझू कांबळे अशी या महिलांची नावे आहेत. माझ्या घरासमोर कचरा कशाला फेकते. तुला कचरापेटीत कचरा टाकता येत नाही का, असा तो वाद होता. यावरून दोघींमध्ये तुंबड शब्दफेक झाली. एकमेकींना अश्लील शिविगाळ करण्यात आली. त्यानंतर दोघीही हातापायावर आल्या. शेवटी यशोधरनगर पोलिसांत तक्रार पोहचली. दोघींनाही समज देऊन पोलिसांनी घरी पाठविले. त्यावर समाधान न झाल्यानं नाझू कांबळे या महिलेविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Love breakup लग्नापूर्वीच प्रेमाची ताटातूट, 14 वर्षांनंतर पुन्हा आले एकत्र, अन् नको ते करून बसले

Nagpur Corona चिंतेत भर, 13 पॉझिटिव्ह-53 सक्रिय, तीन आठवड्यांतील उच्चांक

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.