Maharashtra Winter Session 2022 Live : आज पुन्हा विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने; अजित पवार यांच्याकडून अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी
Maharashtra Winter Session 2022 Live Updates : आज पुन्हा विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने येणार; विधानसभेतील घमासानकडे राज्याचं लक्ष
मुंबई: राज्य हिवाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्या निलंबनाचे आज सभागृहात पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. तसेच दिशा सालियन प्रकरणाचा तपास एसआयटीकडे देण्यात आला आहे. सीबीआयनेही आपण या प्रकरणाचा तपास केला नसल्याचं म्हटलं आहे. त्याचेही पडसाद सभागृहात उमटताना पाहायला मिळू शकतात. चीनमध्ये अजूनही कोरोनाचा कहर कायम आहे. भारतात विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रत्येकाची थर्मल टेस्टिंग करण्यात येत आहे. या मोठ्या बातम्यांसह महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या न्यायालयीन लढ्याच्या अपडेट्ससह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आणि ताज्या बातम्यांचा आढावा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.
LIVE NEWS & UPDATES
-
पाईपलाईन फुटल्याने पाणी नाही
नवी मुंबईतील वाशी विभागात कालपासून पाणी नाही
पाण्याची पाईपलाईन फुटल्या कारणाने पाणी नाही
टँकरमधून पाणी भरण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी
टँकरमधून पाणी भरण्यासाठी नागरिकांची उडाली झुंबड
-
येत्या गुरुवारी पुणे शहरातील बहुतांश भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार
पुणे :
– गुरुवारी पुणे शहरातील बहुतांश भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार,
– कोथरूड आणि चांदणी चौक परिसरातील पाण्याच्या लाईनच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद राहणार,
– शुक्रवारी कमी दाबाने आणि उशिरा पाणीपुरवठा होणार,
– महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची माहिती
-
-
जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकाची आत्महत्या
परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील धारासुर तांडा येथील घटना
विठ्ठल रत्नपारखे असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव
घटनेमुळे शिक्षण क्षेत्रामध्ये एकच खळबळ
आत्महत्येचे कारण मात्र अस्पष्ट
विद्यार्थ्यांना बिस्किट खाण्यासाठी शंभर रुपये दिले
त्यानंतर गळफास लावून केली आत्महत्या
-
ठाकरे गटाच्या आमदारांची बैठक
रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये 6 वाजता होणार बैठक
उद्धव ठाकरे, संजय राऊत आमदारांना मार्गदर्शन करणार
आज सभागृहात उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा मुद्दा मांडला होता
आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे काय कानमंत्र देणार ?
-
साईंचरणी हिरेजडित सोन्याचा मुकूट दान
युरोप येथील अनिवासी भारतीय भाविकाकडून दान
२८ लाख रुपये किमतीचा ३६८ ग्राम वजनाचा मुकुट साईचरणी दान
किनारी सुबिर पटेल येथील भाविकाकडून सुंदर नक्षीकाम असलेला हिरेजडीत मुकूट दान
साईबाबा संस्थानचे मुख्य लेखाधिकारी कैलास खराडे यांची माहिती
-
-
उद्धव ठाकरेंच्या मागणीला काँग्रेसचा पाठिंबा
नागपूर : उद्धव ठाकरेंनी आज सभागृहात जो मुद्दा मांडला तो अतिशय योग्य होता,
प्रश्न सोडवेपर्यंत तो प्रदेश केंद्रशासित प्रदेश करा,
काँग्रेसचीसुद्धा तीच भूमिका आहे,
अशोक चव्हाणांनी केलं स्पष्ट,
मुख्यमंत्री महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर ठोस भूमिका घेत नाहीत,
अशोक चव्हाणांचा मुख्यमंत्र्यांना टोला.
-
कोल्हापुरात शिक्षकावर कोयत्याने हल्ला
कोल्हापुरात शिक्षकावर कोयत्याने हल्ला
कोल्हापूरच्या कदमवाडी परिसरातील घटना
शिक्षकाला शाळेतून बाहेर बोलवून केला हल्ला
शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनेच हल्ला केल्याचा संशय
हल्ल्यात शिक्षक गंभीर जखमी खाजगी रुग्णालयात उपचार सुरू
संजय सुतार असं हल्ल्यात जखमी झालेल्या शिक्षकाचे नाव
संजय सुतार संस्कार शिक्षण मंडळाच्या सुसंस्कार हायस्कूल मधील शिक्षक
-
विधानसभेतील तमाशा बंद करा; राजू शेट्टी यांनी टोचले राज्यातील नेत्यांचे कान
माझी खासदार राजू शेट्टी यांची सत्ताधारी आणि विरोधकांवर घणाघाती टीका
येणाऱ्या काळामध्ये जनताच या सर्व नेत्यांना त्यांची जागा दाखवून देईल
राज्यातील नेत्यांनी जनतेच्या हिताचे निर्णय घ्यावेत, एकमेकांवर चौकशी लावणे, आरोप करणे बंद करा
-
शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला खरा भाव मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक
नंदुरबार : सीसीआयने कापसाचे दर कमी केल्याने खरेदी बंद पाडत संतप्त शेतकऱयांचा रस्ता रोको,
नंदुरबार तालुक्यातील पळाशी कापुस खरेदी केंद्राबाहेर शेतकऱयाचा रस्ता रोको,
शेतकऱयांच्या रस्ता रोको मुळे तासाभरापासुन शेवाळी नेत्रंग महामार्गावरील वाहतुक ठप्प,
शेतकऱयांच्या रस्ता रोकोमुळे वाहनांच्या महामार्गवर दोन किलोमीटरच्या रांगा.
-
जळगावमध्ये गॅस टँकर आणि कारचा भीषण अपघात
जळगावमधील पारोळा नजीक विचखेडा गॅस टँकर आणि कारचा भीषण अपघात
अपघातात कारधील डॉक्टर सहअभियंता जागीच ठार
तर दोन जण गंभीर जखमी
एम एस एर्थो स्पेशालिस्ट डॉ. निलेश मंगळे, आणि नगरपालिका अभियंता कुणाल सौपुरे
अशी अपघातात ठार झालेल्यांची नावं आहेत.
-
एकनाथ खडसे आणि खडसे कुटुंबियांची एसआयटी मार्फत चौकशी करा
खडसे कुटुंबियांनी 400 करोड रूपयांचा घोटाळा केल्याचा, आ. चंद्रकांत पाटील यांचा लक्षवेधीद्वारे अधिवेशनात आरोप
एकनाथ खडसे यांच्या सौभाग्यवतींच्या नावे असणाऱ्या 33 हेक्टर 41 आर जमिनीवरून उत्खनन करून 400 कोटींचा घोटाळा करण्यात आला
मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या आरोपाने खळबळ
-
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवन परिसरात दाखल
उद्धव ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत, अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर आणि संजय पोतनीस
उद्धव ठाकरे सभागृहाच्या कामकाजात भाग घेणार
उद्धव ठाकरे सीमावादावरून राज्य सरकारला घेरणार
-
महाराष्ट्र एकीकरण समितीची आज कोल्हापुरात धरणे आंदोलन
कोल्हापूर : महाराष्ट्र एकीकरण समिती पदाधिकारी कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते रॅलीने कोल्हापुरात जाणार,
कागल येथून रॅलीने आंदोलन कोल्हापुरात दाखल होणार,
महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून एकीकरण समितीचे होतंय,
थोड्याच वेळात होणार रॅलीला सुरुवात.
-
विधानभवन परिसरात सत्ताधाऱ्यांचही आंदोलन
दाऊदशी संबंधित महिलेला पाठिशी घालणाऱ्या युवासेनेच्या नेत्यावर कारवाई करा
हातात फलक घेऊन सत्ताधारी आमदारांचे विधान भवनाच्या पायरीवर जोरदार आंदोलन
सत्ताधाऱ्यांकडून भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणा
-
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानसभेच्या कामकाजात भाग घेणार
दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरे विधानसभेच्या कामकाजात भाग घेणार
उद्धव ठाकरे सीमावादाचा प्रश्न विधानसभेत मांडणार
कामकाजात सहभागी होण्यापूर्वी आमदारांशी करणार चर्चा
-
सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ भक्तांची प्रचंड गर्दी
नाताळ आणि ईयर एंडच्या सुट्ट्यांमुळे भाविक मोठ्या प्रमाणात धार्मिक पर्यटनाकडे वळले
अक्कलकोटमध्ये भक्तांची दर्शन रांग मुरलीधर मंदिर ते विरक्त मठापर्यंत गेली
दर्शन रांगेमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत
मंगळवारपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील लॉज पर्यंटकांमुळे हाऊस फुल्ल
-
आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत बदनामी केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल
उस्मानाबाद : आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत यांची बदनामी, 4 जणावर गुन्हा नोंद,
उस्मानाबाद जिल्ह्यातील भुम पोलिस ठाण्यात बदनामीकारक मजकूर सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्याविरोधात गुन्हा नोंद,
आरोग्यमंत्री सावंत यांचा खेकडा, हफकीनसह अन्य जोक वापरून मिम्स करुन केल्या पोस्ट,
तालुका प्रमुख बालाजी गुंजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद.
-
बच्चू कडू उद्यापासून आंदोलन करणार
नागपूर : प्रधानमंत्री आवास योजनेतील निकषात बदल करण्याचा मागणी साठी बच्चू कडू उद्यापासून करणार आंदोलन,
कच्च्या मातीच्या पालघरात राहून करणार अधिवेशनाला लावणार हजेरी,
बच्चू कडूचे अनोखे आंदोलन.
-
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत थांबलेल्या नागपुरातील हॉटेल परिसरातील गाड्यांची पोलिसांकडून तपासणी
डॉग स्कॉड आणि बीडीडीएस पथकांनं केली तपासणी
उद्धव ठाकरे आज विधानसभेत जाण्याची शक्यता
कालच उद्धव ठाकरे नागपूरात दाखल झालेत
-
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा ठराव विधानसभेत मांडण्याची गरज नाही, कामगार मंत्री सुरेश खाडे यांचं मोठं विधान
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा या आधी ठराव झाला होता
आम्ही सगळे मराठी भाषिकांबरोबर आहोत, त्यामुळे नव्याने ठराव मांडण्याची गरज नाही
मंत्री सुरेश खाडे यांचं वक्तव्य
कर्नाटकला महाराष्ट्रातील एकही गावं आपण देणार नाही
सांगली जिल्ह्यातील एकही गावं कर्नाटकात जाणार नाही
-
आईला झालेला कॅन्सर बरा व्हावा म्हणून चितेजवळ जादूटोण्याचा प्रयत्न
पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत घडला प्रकार
चितेजवळ जादूटोणा करणाऱ्या दोन तृतीयपंथीना केली होती अटक
पेटत्या चितेसमोर अघोरी पुजा केल्याने कॅन्सर दुसऱ्याच्या शरीरात जातो असा समज करून घेतल्याने केली होती पूजा
जादुटोणा करण्यामागील कारण आले समोर
लक्ष्मी निबाजी शिंदे आणि मनोज अशोक धुमाळ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे, दोन्ही तृतीयपंथी
-
पुण्यात शरद पवारांनी बोलवली बैठक, ज्येष्ठ वारकऱ्यांसोबत चर्चा
शरद पवारांनी जाणून घेतली वारकऱ्यांची भूमिका
राजकारणासाठी वारकऱ्यांचा सुरु असलेल्या वापराबाबत बैठकीत चर्चा
सुषमा अंधारे यांच्यावक्तव्यांमुळे वारकरी संतप्त
सुषमा अंधारेंचा वाद राज्यात चर्चेत असल्याच्या घटनेनंतर पार पडली बैठक
वारकरी संप्रदायाबाबतच्या साहित्याचा खरा प्रचार व्हावा – शरद पवार यांचे वक्तव्य
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सकाळी 9 :30 वाजता दिल्लीला जाणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत एका कार्यक्रमात होणार सहभागी
वीर बाल दिवस या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीला जात आहेत
दिल्लीवारीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही एकनाथ शिंदे भेटण्याची शक्यता
-
महाराष्ट्र एकीकरण समितीच आज कोल्हापुरात धरणे आंदोलन
धरणे आंदोलनात महाविकास आघाडीसह शिंदे गटही सहभागी होणार
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर केलं जाणार धरणे आंदोलन
कर्नाटक प्रशासनाकडून निवेदन स्वीकारला जात नसल्याने महाराष्ट्र एकीकरण समितीची कोल्हापुरात धाव
सर्व पक्षीयांनी एक दिवस महाराष्ट्र बंद ठेवण्याची एकीकरण समितीची मागणी
-
आईला झालेला कॅन्सर बरा व्हावा म्हणून चितेजवळ जादूटोण्याचा प्रयत्न
पुणे : पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत घडला प्रकार,
चितेजवळ जादूटोणा करणाऱ्या दोन तृतीयपंथीना केली होती अटक,
पेटत्या चितेसमोर अघोरी पुजा केल्याने कॅन्सर दुसऱ्याच्या शरीरात जातो असा समज करून घेतल्याने केली होती पुजा,
जादुटोणाकरण्यामागीलकारण आले समोर,
लक्ष्मी निबाजी शिंदे आणि मनोज अशोक धुमाळ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे, दोन्ही तृतीयपंथी.
-
पावणेतीन लाख शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित
नाशिक : ऑक्टोबरच्या पावसाने अडीच लाख हेक्टर पिके पाण्यात,
दोन महिने उलटले तरी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा कायम,
अवकाळी पावसाचा जिल्ह्याला बसला होता मोठा फटका.
-
पुणेकरांवर येणार पुन्हा मास्क लावण्याची वेळ
पुणे जिल्ह्यात कोरोना वाढतोय
पुणे जिल्ह्यात कोरोनाचे 42 ॲक्टीव्ह रुग्ण
इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पुण्यात रुग्ण अधिक
अकोला जिल्ह्यात कोरोनाचे 15 ॲक्टीव्ह रुग्ण
तर, ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे 10 ॲक्टीव्ह रुग्ण
-
ठाकरे गटाचे नाशिकच्या देवळाली गावात मेळावा घेत शक्तिप्रदर्शन
नाशिक : ठाकरे गटाचे 12 माजी नगरसेवक शिंदे गटात दाखल झाल्यानंतर ठाकरे गट ऍक्शन मोडवर
शिवसेनेची सुरवात देवळाली गावातून त्यामुळे पहिला मेळावा हा देवळाली गावात
निष्ठावान शिवसैनिक याच भागाचं प्रतिनिधित्व करतात, मात्र तेच शिंदे गटात गेल्याने ठाकरे गटाला बसला होता हादरा
मेळाव्यासाठी शेकडो शिवसैनिक हजर
-
अधिवेशनाच्या उर्वरित काळात पुण्याचे प्रश्न मार्गी लागणार का?
पहिल्या आठवड्यात पुण्यातील प्रश्नासंदर्भात कोणताही निर्णय झाला नाही
रिंगरोड प्रकल्पाच भूसंपादन संथ गतीने सुरू आहे,
वाहतूक कोंडी, पुणे शहराला वाढीव कोट्याची मागणी,
पुरंदरचं नियोजित विमानतळ, प्रॉपर्टी कार्ड अशा विषयावर चर्चा होणं अपेक्षित आहे
हे प्रश्न सुटले पाहिजेत अशी पुणेकरांची अपेक्षा आहे
-
विरोधी पक्ष अधिवेशनात फेल ठरला; प्रवीण दरेकर यांचा हल्लाबोल
आतापर्यंत ठाकरे गटाची फळी काय झोपली होती का?, संजय राऊत येणार म्हणजे काय बॉम्ब घेऊन येणार की मिसाईल घेऊन येणार?
विरोधी पक्ष पूर्ण अधिवेशनात फेल ठरला
सुषमा अंधारेंची वायफळ बडबड सुरु आहे, त्यांनी तोंडावर लगाम घालावा, अशी त्यांना सूचना आहे
संजय राऊत काय म्हणातात याला अर्थ नाही, कुठल्याही प्रकरणात चौकशी मागू शकतं किंवा देऊ शकतो, प्रवीण दरेकर यांचा पलटवार
-
नागपुरात ‘मास्क सक्ती’, सर्व शासकीय कार्यालयांना जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र
चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक पुन्हा सुरू झाल्याने भारतात आतापासूनच खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे
केंद्राने महत्त्वाचे निर्देश दिल्यानंतर आता राज्यसरकारही सतर्क झाले आहे
याच पार्श्वभूमीवर आता नागपूरमध्ये शासकीय कार्यालयात मास्क सक्ती करण्यात आली आहे
जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी या संदर्भात एक पत्रक काढले आहे.
-
उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे नागपुरात
उद्धव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, वरून सरदेसाई हे सर्व एका विशेष विमानाने नागपुरात दाखल
कर्नाटक आणि विदर्भाच्या प्रश्नावरून सरकारला घेरणार
संजय राऊत पत्रकार परिषद घेऊन मोठा गौप्यस्फोट करणार, राऊतांच्या पत्रकार परिषदेकडे देशाचं लक्ष
-
हिवाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस, विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष
जयंत पाटील यांचं निलंबन, दिशा सालियनप्रकरणाची एसआयटी चौकशी आदी मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक होणार
आजही विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधक घोषणाबाजी करणार असल्याची सूत्रांची माहिती
खासदार राहुल शेवाळे यांनी केलेल्या गंभीर आरोपांचे पडसादही विधानसभेत उमटणार
Published On - Dec 26,2022 6:14 AM