Maharashtra Winter Session 2022 Live : वेठबिगारी आणि आरोग्याच्या प्रश्नांवरून विधानसभेत घमासान; सत्ताधारी-विरोधक आमनेसामने
Maharashtra Winter Session 2022 Live Updates : सत्ताधारी विरोधक आज पुन्हा आमनेसामने, हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवसही गाजणार?
मुंबई: नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील विविध प्रश्नांवर विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार चर्चा घडत आहे. आजही अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येण्याची चिन्हे आहेत. कोणत्या मुद्द्यावर विरोधक आज सत्ताधाऱ्यांना घेरतात आणि सत्ताधारी त्यांना कसे उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या अपडेट्ससह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आणि ताज्या बातम्यांचा आढावा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.
LIVE NEWS & UPDATES
-
आदित्य ठाकरे यांच्यावर राहुल शेवाळे यांच्याकडून आरोप, तर ठाकरे गटाचा शेवाळे यांच्या वक्तव्यावर आक्षेप
नवी दिल्ली :
आदित्य ठाकरे यांच्यावर राहुल शेवाळे यांच्याकडून आरोप
ठाकरे गटाचा शेवाळे यांच्या वक्तव्यावर आक्षेप
शेवाळे यांच्या वक्तव्याचा निषेध
लोकसभा कामकाजातून शेवाळे यांचे वक्तव्य वगळले
लोकसभा अध्यक्षांकडे ठाकरे गटाच्या खासदारांनी केली होती मागणी
खासदार विनायक राऊत यांची माहिती
-
कोरोनाबाबत उद्या दिल्ली सरकारची महत्वपूर्ण बैठक
नवी दिल्ली :
कोरोनाबाबत उद्या दिल्ली सरकारची महत्वपूर्ण बैठक
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बोलावली बैठक
केंद्र सरकारच्या आजच्या बैठकीनंतर दिल्ली सरकारची होणार बैठक
चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक वाढल्याने राजधानी दिल्लीमध्ये महत्त्वपूर्ण बैठक
-
-
भरधाव दुचाकीवर फोनवर बोलणं चालकाच्या जीवावर बेतलं
पिंपरी चिंचवड : या घटनेत स्कुलबसच्या चाकाखाली येऊन 29 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे,
हा अपघात पिंपळे गुरवच्या काटे पुरम,बॅडमिंटन हॉल च्या समोर घडला आहे,
ह्या अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे,
शैलेश गजानन जगताप अस अपघातात मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे.
-
युवा सेनेच्या अयोध्या पोळचं संतोष बांगरांना थेट आव्हान
लाईव्हसाठी
पुणे : संतोष बांगर हा चौथी नापास थोतांड माणूस आहे,
तो फक्त बोलू शकतो काही करू शकत नाही,
संजय राऊत तुमच्या सारखे खोके घेऊन गुवाहाटीला गेले नाही,
इतरांच्या कानाखाली आवाज काढतो म्हणून सतत पोकळ धमक्या देऊ नका,
संतोष बांगर यांनी फक्त अयोध्याच्या समोर येऊन दाखवावे.
-
यंदा 40 पेक्षा जास्त आमदारांचा आमदार निवासात मुक्काम
नागपूरच्या आमदार निवासाला नवा लूक
आमदार निवासच्या रुम, कँटीनचं मेकओव्हर
यापूर्वी पाच आमदारही आमदार निवासात राहत नव्हते
-
-
नगरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; जलसमाधी घेण्याचा प्रयत्न
आंदोलकांचा मुळा धरणात उडी घेत जलसमाधी घेण्याचा प्रयत्न
तीन ते चार आंदोलकांनी मुळा धरणात घेतल्या उडया
मात्र पोलिस आणि रेस्क्यूटीमने आंदोलकांना वेळीच बाहेर काढले
स्वाभिमानी संघटेनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे आणि ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्यासह 15 जणांना पोलिसांनी घेतल ताब्यात
-
पुण्यात फुकटच्या काजू कतलीसाठी तरुणाने केला गोळीबार
पुणे – सिंहगड रस्त्यावर असलेल्या फुलपरी स्वीट मॉलमध्ये तरुणाकडून गोळीबाराचा प्रयत्न,
एक किलो काजू कतली फुटक दिली नाही म्हणून गोळीबाराचा प्रयत्न,
सोमवारी संध्याकाळी 4 वाजताची घटना, सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद,
काजू कतलीसाठी गोळीबार केल्यानं पुण्यात खळबळ उडाली असून संशयिताचा शोध सुरू.
-
लवजिहाद विरोधी कायद्याच्या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीचा मोर्चा
नागपूर : लवजिहाद विरोधी कायद्याच्या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीचा मोर्चा
यशवंत स्टेडियमहून मोर्चा निघाला
विधानभवनकडे जायला रवाना
-
भारत जोडो यात्रेला पाठविलेल्या नोटिसीवर काँग्रेसचे प्रत्युत्तर
सोलापूर : भारत जोडो यात्रेला मिळणारे यश बघून भाजपच्या पायाखालची जमीन सरकली आहे.
आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक थांबवण्याऐवजी भारत जोडो यात्रा थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी दिले आहे पत्र
चीनसारख्या देशात कोरोना वाढत असल्याचे दिसतय तर सर्वात आधी आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर निर्बंध आणा
काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते प्रा. काकासाहेब कुलकर्णी यांची भाजपला सवाल
-
आदिवासी समाजाच्यावतीने महाआक्रोश मोर्चाचे आयोजन
नागपूर विधान भवनावर आदिवासी समाजाचा मोर्चा धडकणार
अधिसंख्या पदावर असलेल्या बोगस आदिवासी कर्मचाऱ्यांना हटवा
अनेक लोक आदिवासी समाजाला वनवासी शब्द प्रयोग करतात त्यावर बंदी घाला
आदी मागण्यांसाठी यशवंत स्टेडियम ते विधान भवन रोड झिरो माईल चौक असा मोर्चा निघणार
माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी मंत्री वसंत पुरके, तुलेशवर मरकाम यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे
-
कर्नाटक सीमावादावर रोहित पवार यांनी ट्विट करत केला हल्लाबोल
नागपूर : केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत झालेली बैठक सीमाप्रश्ना संदर्भात नव्हतीच,
केवळ कायदा-सुव्यवस्थे संदर्भात असल्याचं सांगत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारचा खोटारडेपणा उघड केला आहे.
आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी चुकीची माहिती देऊन महाराष्ट्राची दिशाभूल का केली?
रोहित पवारांचा ट्टीट करत शिंदे फडणवीस सरकारला सवाल.
-
मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक
विधानभवनाच्या पायर्यांवर उतरत जोरदार घोषणाबाजी
तिसर्या दिवशीही ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
घेतले खोके भूखंड ओके… भ्रष्टाचारी सरकारचा निषेध असो… खोके सरकार हाय हाय…
खोके घेऊन भूखंडाचा श्रीखंड खाणार्या मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो … भूखंड गैरव्यवहार प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा…
‘मित्रा’ चे लाड करणार्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा…मुख्यमंत्र्यांचा कारनामा द्यावाच लागेल राजीनामा…या सरकारचं करायच काय, खाली डोकं वर पाय…
मुख्यमंत्र्यांची खोलली पोल हल्लाबोल हल्लाबोल…छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणार्या राज्यपालाला हटवा..
ईडी सरकार हाय हाय…स्थगिती सरकार हाय हाय… अशा गगनभेदी घोषणा देत आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी सलग तिसऱ्या दिवशी विधानभवन परिसर दणाणून सोडला
आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरल्याचे पाहायला मिळाले
-
पुणे विमानतळ प्रशासनाचे महत्वाचे आवाहन
पुणे : पुणे विमानतळावर तीन तास आधी पोहोचा, लोहगाव विमानतळ प्रशासनाचे नागरिकांना आवाहन,
सणासुदीच्या काळात वाढलेल्या गर्दीमुळे चेकिंग साठी लागणारा वेळ वाचवण्यासाठी विमानतळावर तीन तास आधी पोहोचण्याचे प्रशासनाचे आवाहन,
गेला काही दिवसापासून पुणे विमानतळावर उड्डाणे वाढली असून प्रवाशांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे,
त्याच अनुषंगाने गैरसोय टाळण्यासाठी लोहगाव विमानतळ प्रशासनाकडून प्रवाशांना हे आवाहन करण्यात आला आहे,
त्यासोबतच जलद गतीने सुरक्षा तपासणी व्हावी यासाठी सात किलो पर्यंतची एकच बॅग जवळ ठेवा अशी सूचना देखील प्रवाशांना देण्यात आली आहे.
-
पुण्यातील ऐतिहासिक भिडेवाड्या संदर्भात आज मुख्यमंत्र्यांची बैठक
भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक बनवण्यासाठी त्यासोबतच तिथे पुन्हा मुलींची शाळा सुरू करण्यासाठी बैठकीत होणार चर्चा
छगन भुजबळ यांनी काल विधानसभेत मांडला होता मुद्दा
ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी यासाठी पुण्यात आंदोलन देखील सुरू केलं आहे
त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज तातडीची बैठक बोलावली आहे
या बैठकीत ऑनलाईन पुणे महापालिका आयुक्त आणि समता परिषदेचे प्रतिनिधी, वकील उपस्थित राहणार
-
आदिवासी विकास विभाग आयुक्त नयना गुंडे यांच्या नियुक्तीवर आदिवासी समाज आक्रमक
राज्यभरातून आदिवासी समाजातील नागरिक नागपूरकडे रवाना
आज नागपूरमध्ये काढणार भव्य मोर्चा
नयना गुंडे यांना आयुक्त पदावरून त्वरित हटवण्याची प्रमुख मागणी
तसेच बोगस आदिवासींना दिलेले संरक्षण देखील काढण्यात यावे
या दोन प्रमुख मागण्यासाठी आदिवासी संघटना आक्रमक
नाशिकमधून देखील हजारो नागरिक नागपूरकडे रवाना
आदिवासी विकास परिषदेचे प्रदेश अध्यक्ष जाधव यांनी दिली माहिती
-
कोरोनाबाबत आज केंद्रीय स्तरावर महत्वाची बैठक
नवी दिल्ली : आज कोरोना बाबत केंद्राची वरीष्ठ पातळीवर बैठक,
देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला जाईल,
चीन मधून येणारी विमान पर्यटक याबाबतही बैठकीत चर्चा होईल,
केंद्र सरकार खबरदारी घेत आहे, केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांची माहिती
-
पुणे महानगरपालिकेतील समाविष्ट गावांचा मुद्दा आज अधिवेशनात गाजणार
काँग्रेस आणि राष्ट्रवादी अधिवेशनात समाविष्ट गावांचा मुद्दा मांडणार
त्यासोबतच उरळीदेवाची आणि फुरसुंगी ही दोन गावे पुणे महापालिकेतच राहावी राष्ट्रवादीची आग्रही मागणी
त्यासोबतच इतर 34 गावांचा मुद्दा देखील प्रश्न उत्तरांमध्ये राष्ट्रवादी मांडणार
-
राज्याच्या राजकारणातली महत्वाची बातमी
छत्रपती संभाजीराजेंचे राजकारणात येण्याचे स्पष्ट संकेत
पुण्यात पुढच्या आठवड्यात स्वराज्य संघटनेचा मेळावा
राज्यात काल झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत स्वराज्य संघटनेचे 13 सरपंच आणि 89 सदस्य निवडून आले
त्याच मेळाव्यात करणार सत्कार संभाजीराजे भूमिका करणार जाहीर
संभाजीराजेच्या राजकीय भूमिकेकडे सगळ्यांच लक्ष
-
पुण्यातील कोरेगाव भीमा येथे होणाऱ्या शौर्य दिनाच्या निमित्ताने परिसरात मद्य विक्री बंद करण्याचे आदेश
31 डिसेंबर ते 1 जानेवारीपर्यंत मद्य विक्री राहणार बंद
कोरेगाव भीमा, लोणीकंद, शिक्रापूर, पेरणे फाटा या गावात मद्य विक्री बंदीचे आदेश
जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांचे आदेश
2018 साली झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आदेश काढण्यात आले
-
पुण्यात आज जैन समाजाचे व्यापारी दुकानं बंद ठेवणार
झारखंड राज्य सरकारने जैन धर्मियांच पवित्र तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळ जाहीर केल्यानं जैन धर्मीय आक्रमक
पुण्यात आज जैन समाजाचे व्यापारी दुकानं बंद ठेऊन निर्णयाचा करणार निषेध
व्यापारी महासंघातील जैन व्यापारी या भारत बंदमध्ये सहभागी होणार
फतेचंद रांका यांची माहिती…
-
विशाळगडावरील अतिक्रमणावरून कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक
कोल्हापूर : विशाळगडावरील अतिक्रमणावरून कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक,
गडावरील अतिक्रमण काढण्यासाठी आज ठाकरे गटाचे शिवसैनिक विशाळगडाकडे जाणार,
कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून कुदळ फावडे असं साहित्य घेऊन शिवसैनिक विशाळगडाकडे रवाना होणार,
जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्या नेतृत्वात ठाकरे गटाची मोहीम.
-
28 तारखेला पुण्यात संभाजी ब्रिगेडचं रौप्य महोत्सवी अधिवेशन
अधिवेशनाचं उद्घाटन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण करणार
समारोपाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि श्नीमंत छत्रपती शाहू महाराज राहणार उपस्थित
शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, शाहू महाराज संभाजी ब्रिगेडच्या व्यासपीठावर येणार
-
पोलीसांच्या कार्यालय परिसरातच दारूच्या बाटल्यांचा खच
पिंपरी चिंचवड : विविध भागात रस्त्यावर दारूच्या बाटल्यांचा खच आढळून आला,
मोटार परिवहन विभागाच्या परिसरात देशी दारुच्या बाटल्यांचा खच पडल्याचे चित्र,
चिंचवड कडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेलाच या दारूच्या बाटल्या पडलेल्या दिसल्या,
पोलिसांच्या कार्यालयाजवळच अशा बाटल्या पडल्याने पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह
सर्रास मद्यपान करणाऱ्यांवर कुणाचाही धाक राहिला नाही का ? असा सवाल उपस्थित केला जातोय.
-
आज सकाळी 9 ते 10.45 वाजेपर्यंत विधानसभेची बैठक
याच कालावधित नियमित बैठका होणार
त्यानंतर विधानसभेचं कामकाज सकाळी 11 वाजता सुरू होणार
-
अधिवेशनावर आजही मोर्चे धडकणार
हिवाळी अधिवेशनावर आजही काही मोर्चे धडकणार आहेत
विविध मागण्यांसाठी राजकीय पक्ष आणि समाजिक संघटनांचे मोर्चे धडकणार
झिरो मैल येथेच मोर्चे अडवले जाणार
मोर्चांच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळ परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त
-
विधिमंडळात शाईच्या पेनवर बंदी, दैनिक सामनाच्या अग्रलेखातून टीका
महाराष्ट्रातील सरकार मिंधे तर आहेच; पण आता ते धसका सरकारही बनले आहे.
शाईहल्ल्याच्या भीतीने विधिमंडळ आवारात शाईच्या पेनवर बंदी घालण्याचा सरकारचा निर्णय भेदरटच म्हणावा लागेल.
शाईवर बंदी घालण्यापेक्षा शाईफेक होणार नाही अशी आचरट विधाने मंत्री व सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी टाळली तर असे बंदीचे घाबरट निर्णय घेण्याची वेळ धसका सरकारवर येणार नाही!
Published On - Dec 21,2022 6:18 AM