उड्डाणानंतर पायलटच्या छातीत जोराची कळ, नागपूर विमानतळावर परदेशी विमानाचं इमर्जन्सी लँडिंग
मस्कतवरुन बांगलादेशकडे जाताना पायलटला छातीत दुखू लागलं. त्यामुळे कोणताही वेळ न दौडता, या विमानाचं लँडिंग नागपूर विमानतळावर करण्यात आलं.
नागपूर : पायलटच्या छातीत दुखू लागल्याने विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. हे विमान मस्कतहून ढाक्याला निघालं होतं. मात्र पायलटला त्रास होऊ लागल्याने या विमानाचं नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. बिमान एयरलाईन्स (Biman Bangladesh) बांगलादेशचं हे विमान आहे.
मस्कतवरुन बांगलादेशकडे जाताना पायलटला छातीत दुखू लागलं. त्यामुळे कोणताही वेळ न दौडता, या विमानाचं लँडिंग नागपूर विमानतळावर करण्यात आलं.
या विमानात 126 पॅसेंजर आहेत. सकाळी 11 वाजून 40 मिनिटांच्या सुमारास हे विमान नागपूर विमानतळाच्या धावपट्टीवर उतरवण्यात आलं. त्यानंतर दुसरा पायलट हे विमान घेऊन पुढील प्रवासाठी निघणार आहे.
नेमकं काय घडलं?
बांगलादेश एअरलाईन्सचं विमान मस्कतवरुन सुटलं होतं. हे विमान बांगलादेशकडे निघालं होतं. थोडा प्रवास केल्यानंतर हे विमान नागपूर हवाई क्षेत्रात आलं. त्यादरम्यान पायलटच्या छातीत दुखू लागलं. त्यामुळे नागपूर विमानतळ क्षेत्र प्रशासनाशी संपर्क साधून, विमानाच्या इमर्जन्सी लँडिंगसाठी विचारणा केली. त्यावेळी नागपूर विमानतळ प्रशासनाकडून ग्रीन सिग्नल देण्यात आला. त्यानंतर विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं.
Maharashtra: An international flight of Biman Bangladesh, carrying 126 passengers, made a medical emergency landing at Nagpur airport after a sudden deterioration in the health of the pilot of the aircraft.
— ANI (@ANI) August 27, 2021
संबंधित बातम्या
‘काबुलमध्ये युक्रेनी विमानाचं अपहरण’, रशियन मीडियाचा दावा
Viral Video : फ्लाइट अटेंडंटसोबत गैरवर्तन, प्रवाशाला चक्क विमानातच टेप लावून बांधलं