Chandrapur : लेक आजारी, गावाला पुराचा विळखा; बापाने 4 किलोमीटर जंगलात पायपीट करुन रुग्णालय गाठलं
पुलावरून नदीच्या पुराचे पाणी वाहत असेल तर तिथून वाहने नेऊ नका असे आवाहन वारंवार प्रशासन आणि सर्व स्तरातून करण्यात येतं आहे. पुराचे पाणी पुलावरून वाहत असताना वाहने घेऊन जाणे किती धोकादायक आहे
चंद्रपूर – जुलै महिन्यात मुसळधार पाऊस (Heavy rain) झाल्यानंतर पावसाने विश्रांती घेतली होती. परंतु मागच्या चार दिवसांपासुन सुरु झालेल्या पावसाने पुन्हा राज्यात (Maharashtra Rain Update) थैमान घालायला सुरुवात केली आहे. चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात जुलै महिन्यात आणि आता सुध्दा अतिवृष्टी सुरु असल्यामुळे लोकांना गावाच्या बाहेर दळणवळण किंवा अन्य कारणासाठी अवघड झालं आहे. गोंडपीपरी तालुक्यातील आडवळणाचा आर्वी गावात दीड वर्षाची चिमुकली तापाने फणफणत होती. त्यावेळी तिला रुग्णालयात न्यायला रस्ता नव्हता. तसेच चिमुकलीची तब्येत देखील ढासळत होती. त्यामुळे तिच्या आई वडिलांनी चार किलोमीटर जंगलातून वाट काढत रुग्णवाहिका गाठली. त्यानंतर मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता
राजधानी मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये सतत मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे विदर्भात रेड अलर्ट जारी करण्यात आला असून मुंबईत आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये पावसाची शक्यत व्यक्त करण्यात आली आहे. त्याशिवाय, विदर्भातही मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, वाशीम आणि यवतमाळसह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
ट्रक चालक करीत पुराच्या पाण्यातून थरार
पुलावरून नदीच्या पुराचे पाणी वाहत असेल तर तिथून वाहने नेऊ नका असे आवाहन वारंवार प्रशासन आणि सर्व स्तरातून करण्यात येतं आहे. पुराचे पाणी पुलावरून वाहत असताना वाहने घेऊन जाणे किती धोकादायक आहे हे आपण अनेक व्हिडीओच्या माध्यमातून पाहिले आहे. तसेच हे विविध दुर्घटनांच्या व्हिडिओच्या माध्यमातून सतत समोर येत असते. नागपूर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी एक स्कॉर्पिओ अशीच पुराच्या पाणीत वाहून गेल्याने सहा जणांचा मृत्यू झाला होता. तरी अनेक जण जीव धोक्यात टाकून पुराचे पाणी वाहत असलेल्या पुलावरून वाहने नेण्याचे धाडस करत असतात. नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यात सांड नदीला पूर आले आहे. तरी काही ट्रक चालक सांड नदीच्या पुलावरून पुराचे पाणी वाहत असताना ट्रक नेण्याचा जीवघेणा धाडस करत असल्याची माहिती मिळाली आहे.