नागपूर-मुंबई रेल्वे सेवा ठप्प, मोठी बातमी समोर, घटनास्थळी काय घडतंय?

नागपूर-मुंबई रेल्वे सेवा ठप्प झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अनेक गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. या गाड्यांमध्ये असणारे प्रवाशी मात्र यामुळे प्रचंड वैतागले आहेत.

नागपूर-मुंबई रेल्वे सेवा ठप्प, मोठी बातमी समोर, घटनास्थळी काय घडतंय?
Follow us
| Updated on: Jul 10, 2023 | 11:20 PM

अकोला : उत्तर भारतात पाऊस अक्षरश: धुमाकूळ माजवतोय. हिमाचल प्रदेशमधील महापुराचे दृश्य अंगावर काटे आणणारे आहेत. अनेक घरं या महापुराने उद्ध्वस्त केले आहेत. शेकडो चारचाकी गाड्या पुरात वाहून गेल्या आहेत. महापुराचे अतिशय थरारक असे दृश्य समोर येत आहेत. विशेष म्हणजे विदर्भातही आज एक अनपेक्षित घटना घडली आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकखाली असणारी वाळूच वाहून गेली आहे. त्यामुळे अनेक रेल्वे गाड्या रखडल्या आहेत. संबंधित मार्गाने जाणारी रेल्वे सेवाच या घटनेमुळे ठप्प झाली आहे. त्यामुळे अनेक प्रवासी त्रस्त झाले आहेत. प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. याशिवाय या घटनेमुळे प्रशासनापुढीलही आव्हान वाढलं आहे.

नागपूर-मुंबई रेल्वे सेवा ठप्प झाल्याची माहिती समोर आली आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरमध्ये पावसामुळे रेल्वे ट्रॅकखालील वाळू वाहून गेली आहे. त्यामुळे नागपूर आणि मुंबईला जाणाऱ्या रेल्वे गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. अकोल्यातील या घटनेमुळे 12 रेल्वे गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून युद्ध पातळीवर सर्व परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी काम सुरु आहे, अशी माहिती मिळत आहे.

‘या’ 12 गाड्या थांबवण्यात आल्या आहेत

  • भुसावळ वर्धा मेमू गाडी
  • अहमदाबाद हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस
  •  पुरी सूरत साप्तिहिक सुपरफास्ट एक्सप्रेस
  •  गोंदिया मुंबई विदर्भ सुपरफास्ट एक्सप्रेस
  • नागपूर पुणे त्रिसाप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस
  •  लोकमान्य टिळक टर्मिनस ज्ञानेश्वरी एक्सप्रेस
  • बिलासपूर हापा साप्ताहिक एक्सप्रेस
  • मडगाव नागपूर विशेष एक्सप्रेस
  • हिसार सिकंदराबाद सुपरफास्ट एक्सप्रेस
  • सूरत मालदा टाउन वीकली एक्सप्रेस
  • पुणे सांत्रागंछी हमसफर एक्सप्रेस
  • अमरावती मुंबई अंबा सुपरफास्ट एक्सप्रेस

संध्याकाळी सात वाजता पाऊस आला आणि…

अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर आणि मानकूर रेल्वे स्टेशनच्या दरम्यान रेल्वे रुळाखालची वाळू वाहून गेली. खरंतर संबंधित परिसरात सोमवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास कोसळला. त्यानंतर संबंधित घटना घडली. या पावसाचा थेट परिणाम रेल्वे वाहतुकीवर पडला आहे. नागपूर रेल्वे स्थानकावरही गेल्या चार तासांपासूनची गाडी थांबली आहे. त्यामुळे प्रवाशी त्रस्त झाले आहेत. दुसरीकडे रेल्वे प्रशासनाकडून युद्ध पातळीवर काम सुरु आहे. प्रवाशांना होणारा मनस्ताप लक्षात ठेवून प्रशासन काम करत आहे.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.