नागपुरात भिकाऱ्यांसाठी वसतिगृहाची निर्मिती, केंद्र सरकारकडून मदत
पहिल्या टप्प्यात नागपुरातील 150 भिक्षेकरूंना वसतिगृहात प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे भिकाऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे. (Nagpur Municipal Corporation will be constructed hostel for beggars)
नागपूर : नागपुरात भिकाऱ्यांसाठी वसतिगृहाची निर्मिती केली जाणार आहे. भिक्षेकरूंच्या पुनर्वसनासाठी नागपूर महापालिकेतर्फे या वसतिगृहांची निर्मिती केली जाणार आहे. यासाठी केंद्र सरकारकडून मदत केली जाणार आहे. यात पहिल्या टप्प्यात नागपुरातील 150 भिक्षेकरूंना वसतिगृहात प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे भिकाऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे. (Nagpur Municipal Corporation will be constructed hostel for beggars with the help of central government)
नागपुरात 1600 भिक्षेकरूंची नोंद
राज्यात हजारो भिक्षेकरु असून जे भिक मागून उदरनिर्वाह करतात. नुकतंच नागपूर महापालिकेने याबाबतचे सर्वेक्षण केले. यात नागपुरात 1600 भिक्षेकरूंची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने शहर भिक्षेकरू मुक्त करण्यासाठी, भिक्षेकरी वसतिगृहाची निर्मिती केली जाणार आहे.
भिक्षेकरूंना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व्यवसायिक शिक्षण
त्यासाठी देशभरातून 10 शहरांची निवड करण्यात आली आहे. त्यात नागपूर महापालिकेचा समावेश आहे. यानुसार नागपूर महापालिकेने रेल्वे स्टेशन, बसस्टॅाप, मिठा निम दर्गा, राजाबक्षा मंदिर, शनि मंदिर, यशवंत स्टेडियम, ताजबाग अशा विविध भागात 1600 भिक्षेकरूंचे सर्वेक्षण केलं आहे. या भिक्षेकरूंना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महापालिकेकडून कौशल्य विकास प्रशिक्षणांतर्गत व्यवसायिक शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. त्यामुळे त्यांना कामही मिळणार आहे.
फेसबुकवर मैत्री, नंतर प्रेम, गर्भवती होताच प्रियकर फरार, प्रेयसी त्याच्या घरी पोहचताच धक्कादायक माहिती उघडhttps://t.co/M6y8tGgcOL#Crime #Love #Cheat #CrimeNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 19, 2021
(Nagpur Municipal Corporation will be constructed hostel for beggars with the help of central government)
संबंधित बातम्या :
सात तासात 23 वेळा एकाच एटीएम कार्डचा वापर, मशीन हॅक करुन लाखो रुपये लंपास, सीसीटीव्हीत घटना कैद
नागपुरात लहान मुंलांमध्ये अँटिबॉडीज आढळल्या, तज्ज्ञ म्हणतात धोका कायम, पालकांनी मुलांची काळजी घ्यावी